Tuesday, July 2, 2019

वसंतराव नाईक हे सामान्यांचे हित करणारे नेते - परमेश्वर कदम

वसंतराव नाईक हे सामान्यांचे हित करणारे नेते - परमेश्वर कदम

सोनपेठ (दर्शन) :-हरित क्रांती ही महाराष्ट्राची गरज होती, त्यामधून शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांचा विकास होणार आहे हे लक्षात घेऊन हरित क्रांती करणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कार्य केले, ते सामान्यांचे हित करणारे नेते होते असे मत हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम यांनी व्यक्त केले.
शहरातील कै.र. व. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  व महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वररा कदम हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरूवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. शिवाजी अंभुरे, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मुकुंदराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रा. दिलिप कोरडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयास ग्रंथ भेट दिली. यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
आपले हक्काचे साप्ताहिक सोनपेठ दर्शन
जाहिराती व बातम्या साठि संपर्क मो.9823547752.
संपादक किरन रमेश स्वामी.

No comments:

Post a Comment