विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय - शिवाजी मव्हाळे
खडका येथे वसंतराव नाईक जयंती व पालकसभा उत्साहात
सोनपेठ (दर्शन) :-
कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय असुन पालकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांनी केले.
खडका येथील कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. त्या अनुषंगाने पालकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सोनकांबळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पुढे बोलताना शिवाजी मव्हाळे यांनी सांगितले की, वसंतराव नाईक हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हरित क्रांतीचे प्रणेते पंचायतराज चे जनक व अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे कार्य मोलाचे आहे.भटक्या विमुक्त लोकांना शिक्षणाच्या माध्यमातून पुढे आणण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्था काम करत आहे.या संस्थेच्या माध्यमातून खडका येथील कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा नवीन भव्य इमारत, सुसज्ज सोयी सुविधा, परिपूर्ण वसतिगृह व अनुभवी तज्ञ शिक्षकवृंद या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहोत.निवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा प्रयत्नशील असून अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश करून लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पालकांशी सुसंवाद साधत त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सोनकांबळे यांनी केले. यावेळी सुत्रसंचलन सहशिक्षक जालमिले यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षक महाजन यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते .
आपले हक्काचे साप्ताहिक सोनपेठ दर्शन
जाहिराती व बातम्या साठि संपर्क मो.9823547752.
संपादक किरन रमेश स्वामी.
No comments:
Post a Comment