Monday, July 15, 2019

कै.राजीव गांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे आरोग्य तपासणी;दैनंदिन काळजी घेणे ही आरोग्याची गुरुकिल्ली - डाॅ.मन्मथ महाजन

कै.राजीव गांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक  आश्रम शाळा खडका येथे आरोग्य तपासणी;दैनंदिन काळजी घेणे ही आरोग्याची गुरुकिल्ली - डाॅ.मन्मथ महाजन

सोनपेठ (दर्शन) :-

 सोनपेठ तालुक्यातील कै. राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ.मन्मथ महाजन यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन काळजी घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी  कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी  संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     खडका येथील कै. राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी  संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. व्ही. महाजन, औषधनिर्माता शेख आलिम, परिचारिका मुंडे एस. पी. यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले. या शिबिरात निवासी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी  शाळेचे मुख्याध्यापक  सोनकांबळे, वस्तीगृह अधिक्षक माने, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

आपले हक्काचे साप्ताहिक सोनपेठ दर्शन
जगात जर्मनी भारतात परभणी जील्ह्यातिल
रोखठोक बातम्या व जाहिराती साठि संपर्क
मो.9823547752.

No comments:

Post a Comment