सोनपेठ रोटरी क्लबला जीएसटीचा महामंत्र देतो - रो. मोहन देशपांडे ; सोनपेठ रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न
सोनपेठ (दर्शन):- सोनपेठ शहरातील मारवाडी बालाजी मंदिर येथे रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा थाटामाटात संपन्न झाला यावेळी अध्यक्षपदी माजी अध्यक्ष रो.प्रदीप गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक रो. मोहन देशपांडे (माजी प्रांतपाल), प्रमुख उपस्थिती इंजि.रो.चंद्रकांत लोमटे (उपप्रांतपाल व माजी सचिव), रो.संजय आढे (जिल्हा समन्वयक), नूतन अध्यक्ष किरन चौलवार, नुतन सचिव रो.बालमुकुंद सारडा आदी मान्यवरांनी वृक्षाला पाणी घालून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली प्रथम सर्व उपस्थित व्यापारी बांधव व पत्रकार बांधवांचे शब्दसुमनांनी स्वागत करून, सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान कु.कृष्णाई राठोड व चिं.सुबोध रणेर यांचा करण्यात आला, या प्रसंगी सा.सोनपेठ दर्शन रोटरी विशेषांकाची सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते संपादक किरण स्वामी यांच्या उपस्थितीत विमोचन करण्यात आले.नवीन रोटरीयन यांना रोटरी पीन व पुष्पगुच्छ देऊन रो.मोहन देशपांडे यांनी स्वागत केले यामध्ये रो.माजी आमदार व्यंकटराव कदम, रो.केदार वलसेटवार, रो.भगवान मस्के, रो.अशोक धम्रे, रो.प्रशांत पांपटवार यांचे स्वागत करण्यात आले, विशेष योगदाना बद्दल रोटरीयन यांचे स्वागत करण्यात आले यामध्ये रो.परमेश्वर कदम, रो.प्रा.रो.डॉ.वसंत सातपुते, रो.नागनाथ सातभाई रो.संतोष रणखांब, रो.विठ्ठल जायभाये आदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.मावळते अध्यक्ष रो.प्रदीप गायकवाड यांनी नूतन अध्यक्ष रो.किरण चौलवार यांना कॉलर चार्टर, हमर देऊन तर मावळते सचिव चंद्रकांत लोमटे यांनी नूतन सचिव रो.बालमुकुंद सारडा यांना पदभार सुपूर्त केला याच प्रसंगी सर्व रोटरीयन यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नुतन अध्यक्ष रो.किरन चौलवार यांनी मनोगत व्यक्त करताना पुढील वर्षी विविध उपक्रम राबवणार असल्याचा मानस व्यक्त केला. मावळते अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी मागील वर्षीचा अहावाल वाचन केले. प्रांतपाल यांचा संदेश उपप्रांतपाल चंद्रकांत लोमटे यांनी वाचन केला. माजी प्रांतपाल मोहन देशपांडे यांचा परिचय प्राचार्य वसंत सातपुते यांनी करून दिला. प्रमुख मार्गदर्शक रो. मोहन देशपांडे यांनी समारोप प्रसंगी रोटरी क्लब बद्दल सर्व स्वअनुभव कथन करुन प्रथम रोटरी क्लब सोनपेठचे रोपटे लावताना रफिक भाई शेख यांच्या नावाचा गौरव करून प्रथम अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर प्रेमाकर शेटे यांच्या आठवणीला उजाळा दिला व रोटरी क्लबला जीएसटी हा महामंत्र दिला जी म्हणजे गुड चागले म्हनायला शिका, एस म्हनजे होय म्हनायला शिका व टि म्हणजे थँक्स धन्यवाद व्यक्त करत राहा असे सांगुन सखोल मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन रो.प्रमोद गावरस्कर यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डाँ.विठ्ठल जायभाये यांनी केले या सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
No comments:
Post a Comment