पालकमंत्री श्री.धनंजय मुंडे यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 10 एप्रिल 2022 रोजी गिरवली ता. अंबाजोगाई येथून मोटारीने पिंपळदरी ता. गंगाखेड येथे दुपारी 2 वाजता आगमन व श्री संत मोतीराम महाराज कलशारोहन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 3 वाजता पिंपळदरी येथून परळी वैजनाथकडे मोटारीने प्रयाण करतील.
सोमवार दि. 11 एप्रिल 2022 रोजी पंढरी निवासस्थान परळी वैजनाथ येथून मोटारीने परभणी येथे दुपारी 2 वाजता आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीस उपस्थिती. नंतर शासकीय विश्रामगृह परभणी येथे राखीव. रात्री 8:30 वाजता देवगिरी एक्सप्रेस रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करतील.
-*-*-*-*-

No comments:
Post a Comment