Sunday, April 3, 2022

"शिवभोजन थाली" चा दुसरा वर्धापन दिन गरजवंतांना मोफत भोजन वाटप करुन साजरा

"शिवभोजन थाली" चा दुसरा वर्धापन दिन गरजवंतांना मोफत भोजन वाटप करुन साजरा




सोनपेठ (दर्शन):-

सोनपेठ शहरातील कै.शंकरराव चव्हाण व्यापारी संकुल येथील दुकान क्रमांक सहा दत्तकृपा भोजनालय येथे "शिवभोजन थाली" चा दुसरा वर्धापन दिनानिमित्त गरजवंतांना मोफत भोजन वाटप करुन साजरा करण्यात आला,याप्रसंगी माजी जिल्हा ग्राहक संरक्षण परीषद अशासकीय सदस्य तथा संपादक किरण रमेश स्वामी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव शिल्पाचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,यावेळी संचालक बालाजी मारोतराव बागडे व ज्ञानेश्वर बहादुर सह मित्र परिवार व लाभार्थी आदिंनी शिव शिल्पास पुष्प अर्पण करून अभिवादन करुन,लाभार्थी व गरजवंतांना "शिवभोजन थाली"चा दुसरा वर्धापन दिनानिमित्त मोफत भोजन वाटप करुन साजरा करण्यात आला, संचालक बालाजी मारोतराव बागडे यांच्याशी बोलताना या भोजनालयात जेम तेम काही महीनेवारी सदस्यांचा तसेच गेली दोन वर्ष शासनाच्या या "शिवभोजन थाली" च्या माध्यमातून लाभार्थी व गरजवंतांना शासनाच्या दराने भोजन वाटप करताना जो आशीर्वाद मिळतो त्यापैक्षा दुसरा आनंद नाही असे सांगितले तसेच आत्तापर्यंत जे सहकार्य मा.तहसीलदार,नायब तहसीलदार तसेच अधिकारी व कर्मचारी बांधवांसह मित्र परिवार यांचे लाभले तसेच सहकार्य सदैव राहु द्या अशी इश्वर चरणी प्रार्थना करुन,सर्व उपस्थीतांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment