जिजामाता पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेज येथे आनंदनगरी संपन्न
सोनपेठ शहरातील विटा रोड त्रिमूर्ती नगर येथील जिजामाता पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेज येथे आनंदनगरी उत्साहात संपन्न झाली,याप्रसंगी उद्घाटक उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण व व प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख गणपत कोटलवार खाजगी कारणास्तव अनूपस्थीत राहीले या कारणाने उपस्थित माजी जिल्हा ग्राहक संरक्षण परीषद अशासकीय सदस्य तथा संपादक किरण स्वामी यांच्या हस्ते आनंदनगरी रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले.यावेळी संस्था सचिव प्रा. डॉ.मुंजाभाऊ धोंडगे व सौ.विद्याताई धोंडगे यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य अजय सर व पालक महिला उपस्थित होत्या, याप्रसंगी माता सरस्वती व या जिजाऊ प्रतीमेचे पुजन किरण स्वामी यांच्या हस्ते तर दिपप्रज्वलन प्राचार्य अजय सर व पालक महिला यांच्या हस्ते करुन माता सरस्वती व मा जिजाऊ यांच्या प्रतिमेस उपस्थीतांनी पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच बाल आनंदनगरी ची रिबीन सौ.आश्विनीताई चव्हाण यांच्या हस्ते कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य अजय सर बोलताना इयत्ता पाचवी इयत्ता अकरावी च्या विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावून सर्व विद्यार्थ्यांनी आनंदनगरी चा आस्वाद घेतला आनंद नगरी चे आयोजन शिक्षणासोबतच व्यवहारिक ज्ञान मुलांना व मुलींना प्राप्त व्हावे या उदात्त हेतूने आयोजन करण्यात आले होते. आनंद नगरीत पालक महीला व पालक उपस्थित राहून आनंद द्विगुणित केल्याबद्दल गणेश जयतपाळ सर तसेच सर्व शिक्षक यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.तर सुत्रसंचालन रंगनाथ गागर्डे यांनी केले.





No comments:
Post a Comment