मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका पत्रकार संघ अध्यक्षांचा मेळावा व पुरस्कार सोहळ्याला उपस्थित रहा
मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख.
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ अध्यक्षांचा मेळावा आणि आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण समारंभ शुक्रवार दिनांक ६ मे २०२२ रोजी परभणी जिल्ह्यात गंगाखेड येथील राजेश्वर फंग्शन हाॕल,संत जनाबाई मंदिर रोड येथे होणार आहे.या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य विश्वस्त एस एम देशमुख तर उद्घाटक विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि आयबीएन लोकमत वाहिनीचे लोकप्रिय अँकर विलास बडे यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडत आहे.आमदार मा. श्री. रत्नाकर गुट्टे सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत.
गंगाखेड तालुका पत्रकार संघाने राज्यस्तरीय मेळावा घेण्याची तयारी दाखवल्यानंतर परिषदेचे राज्य व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी गंगाखेडला भेट देऊन
गंगाखेड तालुका पत्रकार संघ अध्यक्ष पिराजी कांबळे व स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि नियोजित कार्यक्रमाच्या जागेची पाहणी केली.गंगाखेडमधील सुसज्ज सभागृहात हा कार्यक्रम करण्याचे नियोजन असून येणार्या तालुका अध्यक्षांची आणि पुरस्कार्थींची उत्तम व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती स्थानिक पदाधिकारी यांनी दिली. गंगाखेडचा हा कार्यक्रम दोन सत्रात होईल.उद्घाटनाच्या सत्रात पुरस्कार वितरण समारंभ होईल तर भोजनोत्तर दुपारच्या सत्रात परिषदेची दिशा आणि पत्रकार चळवळीवर परिषदेचे पदाधिकारी मार्गदर्शन करतील.कोरोना नंतरच्या काळात परिषदेचा पहिलाच भव्य असा कार्यक्रम होत असल्याने कार्यक्रमास राज्यातील सर्व तालुका आणि जिल्हा अध्यक्षांनी उपस्थित राहावे असे आवाहन राज्य उपाध्यक्ष सुरेश नाईकवाडे व गंगाखेड तालुका अध्यक्ष पिराजी कांबळे यांनी केले आहे.







No comments:
Post a Comment