Monday, April 4, 2022

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या मळी युक्त पाण्यामुळे पशुपक्षी यांच्या मरण यातना सुरूच,मासे,कुत्र्यांनंतर आता मोर ही गतप्राण

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या मळी युक्त पाण्यामुळे पशुपक्षी यांच्या मरण यातना सुरूच,मासे,कुत्र्यांनंतर आता मोर ही गतप्राण





सोनपेठ (दर्शन):-

सोनपेठ तालुक्यातील परळी वैजनाथ तालुक्यातून वान नदी इंजेगाव,नाथ्रा तसेच सोनपेठ तालुक्यातील धार डिघोळ, डिघोळ,निमगाव,खपाट पिंपरी,गवळी पिंपरी ते सोनपेठ पासून गोदावरी गंगेस वाणी संगम येथे मिळते,गेली अनेक महिन्यापासून वैद्यनाथ साखर कारखान्याच्या मळी युक्त पाण्यामुळे पशुपक्षी यांच्या मरण यातना सुरूच आहेत,
वैदनाथ साखर कारखान्याने वाण नदीत मळी युक्त घाण पाणी सोडल्यामुळे वाण नदीतील पाणी दुषीत झाल्यामुळे नदितील सर्व मासे मरून गेले तसेच मेलेले मासे खाल्यामुळे दोन कुत्रे ही मेले नुकताच वाण नदि पात्रात राष्ट्रीय पक्षी असलेल्या एका मोर ही गतप्राण झालेला दिसून येतो आहे.जनता जनार्धन तक्रार करत आहे त्या प्रकारे सखोल चौकशी करुन कारवाई होतांना दिसत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा वैद्यनाथ साखर कारखान्याचे मळी युक्त पाणी वान नदित प्रदुषीत करणे सुरुच आहे.जनतेला जायचे पाणी या भर उन्हाळ्यात विकत घेऊन पीतील तर जनावरांना व पक्षी यांना पर्यायच नाही म्हणून वान नदि दुषीत करणार्या ज्या ज्या शक्ती त्या सरकारी असो व निम सरकारी अथवा राजकीय त्यांना तमाम पशू पक्ष्यांच्या वतिने तमाम जनतेचा तळतळाट मात्र लागल्या शिवाय राहणार नाही.असे तमाम वान नदि तिरावरील जनतेतून बोलल्या जात आहे.

No comments:

Post a Comment