प्रभू वैद्यनाथाचे हजारो शिवभक्तांनी घेतले पहाटे स्पर्श दर्शन
शिवसेनेचे नेते अभयकुमार ठक्कर यांच्या पाठपुराव्यास यश
परळी / सोनपेठ (दर्शन):-
मागील दोन वर्षापासून कोरोना प्रार्दुभाव असल्याने वैद्यनाथ प्रभूंचे पारंपारिक स्पर्श दर्शन प्रशासनाने बंद ठेवले होते. शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांनी गुढीपाडव्यापासून शिवभक्तांना स्पर्श दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाला मागणी केली होती.आज गुढीपाडव्यापासून सर्व निर्बंध पूर्णपणे कमी केल्यानंतर वैद्यनाथ प्रभूंचे स्पर्श दर्शन पुन्हा सुरू झाले असून आज शनिवार दिनांक 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्या निमित्त शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांच्यासह तमाम शिवभक्तांनी प्रभू वैद्यनाथाचे पहाटे पाच वाजता दर्शन घेतले.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी शहरातील ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिर शिवभक्तांसाठी दर्शनाकरिता यापूर्वीच खुले करण्यात आले होते. परंतू प्राचीन परंपरेनुसार श्रीं चे स्पर्श दर्शन घेता येत नव्हते. शासनाने सर्व निर्बंध दुर करून स्पर्श दर्शन सुविधा आज एका आदेशाद्वारे सुरू केली आहे. दरम्यान आज सकाळी विशेष म्हणजे आजच तब्बल दोन वर्षानंतर स्पर्शदर्शन सुरू करण्यात आले असून आज शनिवारी पहाटे पाच वाजता शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक प्राचार्य अतुल दुबे नगर परिषदेचे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे माजी नगरसेवक संजय कुकडे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख नागनाथराव पवार मोहन परदेशी, सामाजिक कार्यकर्ते दिनेश लोंढे यांच्या सह हजारो शिवभक्तांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी राज्यावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे आणि आगामी वर्ष राज्यातील जनतेसाठी आरोग्यदायी ठरावे यासाठी देवाकडे साकडे घातले.

No comments:
Post a Comment