Monday, April 18, 2022

सोनपेठ ग्रामीण रुग्णालय येथे भव्य तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन

सोनपेठ ग्रामीण रुग्णालय येथे भव्य तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ ग्रामीण रुग्णालय येथे भव्य तालुकास्तरीय आरोग्य मेळावा शुक्रवार दि.२२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ०४ वाजेपर्यंत.नियोजित शिबिरासाठी सोनपेठ शहर, तालुका व परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जास्तीत जास्त रुग्णांना प्रवृत्त करून शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे हे शिबीर राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय मार्फत केंद्र शासन यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आयोजित केले आहे. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना सर्व तज्ञ (स्पेशालिष्ट) डॉक्टरांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात या एकमेव उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. शिबिराची वैशिष्ट्ये या शिबिरात ग्रामीण रुग्णालय सोनपेठ व जिल्हा रुग्णालय, परभणी येथील तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येईल.वैद्यकिय रुग्णांची रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, तपासणी व उपचार केले जातील व आरोग्य शिक्षण देण्यात येईल. शल्यचिकित्सा पात्र रुग्णांची तपासणी करून हायड्रोसील (अंडवृष्टी), हर्निया, अपेंडिक्स गर्भ पिशवीच्या कॅन्सरचे निदान व पुढील उपचार, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येतील. शस्त्रक्रिया सुसज्ज शस्त्रक्रियागृहात व मुलतज्ञाच्या देखरेखेखाली होतील.शस्त्रक्रियेनंतर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व औषधोपचार करण्यात येईल. विविध राष्ट्रीय कार्यक्रम व कुटुंब कल्याण कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात येईल. उपस्थितांसाठी (ABDM) अंतर्गत युनिक हेल्थ आयडी तयार करून देण्यात येईल. पात्र नागरिकांसाठी (AB-PM-JAY) अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड देण्यात येईल.तज्ञ स्पेशालिस्ट डॉक्टर्स फिजिशियन, सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, नेत्र तज्ञ, दंत चिकित्सक, भुल तज्ञ व इतर तज्ञ.आयोजन व मार्गदर्शन डॉ. बाळासाहेब नागरगोजे जिल्हा शल्यचिकित्सक परभणी.डॉ.राहुल गित्ते,जि.प.आरोग्य अधिकारी,परभणी.आयोजन व व्यवस्थापक वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय सोनपेठ.तालुका आरोग्य अधिकारी तालुका सोनपेठ.

No comments:

Post a Comment