Friday, April 1, 2022

सोनपेठ येथील दुय्यम निबंधक श्रीमती श्रध्दा कनकुटे हिने केली लाचेची मागणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

सोनपेठ येथील दुय्यम निबंधक श्रीमती श्रध्दा कनकुटे हिने केली लाचेची मागणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

सोनपेठ (दर्शन):-

सोनपेठ दुय्यम निबंधक श्रीमती श्रध्दा कनकुटे हिने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली आहे.सदर लोकसेवकावर परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.लाचेची मागणी केल्याने संबधीत अधिकाऱ्यावर सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.एका ४० वय वर्ष तक्रारदाराने परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे ३ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती.सोनपेठ दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक श्रीमती श्रध्दा कनकुटे यांनी तक्रारदार यांनी खरेदी केलेली शेती त्यांच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ही रक्कम स्वतः स्विकारण्याची संमती दिली.मात्र प्रत्यक्षात लाचेची रक्कम स्विकारली नाही. लाचेची मागणी केल्याचे सिध्द झाल्याने संबधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस उपअधिक्षक बीडवे, पोलिस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली धुतराज, पोलिस कर्मचारी हनमंते, घाग, तारे, कदम, चट्टे, धबडगे, दंडवते यांच्या पथकाने कारवाई केली. शुक्रवार १ एप्रिल रोजी सोनपेठ पोलिस ठाण्यात दुय्यम निबंधक श्रीमती श्रध्दा कनकुटे हिच्या वरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

No comments:

Post a Comment