महात्मा बसवेश्वर यांना सर्व धर्मीय अभिवादन उपक्रमात सहभाग नोंदवावा-सुभाषअप्पा नित्रुडकर
सोनपेठ येथील अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ मराठवाडा अध्यक्ष सुभाषअप्पा नित्रुडकर यांनी प्रती वर्षी प्रमाणे अक्षय तृतीया सकल मानव जातीचे उद्धारक महामानवांचे महामानव विश्वगुरु महात्मा बसवेश्वर यांच्या ८९१ व्या जयंती निमित्य तालुक्यातील व शहरातील सर्व धर्मीय सर्व संघटना आणि सर्व मित्र मंडळांना अवाहन केले आहे कि दि.३ मे२०२२ महात्मा बसवेश्वर यांना सर्व धर्मीय अभिवादन उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.तालुका अध्यक्ष विनोद चीमनगुंडे, बसलिंगअप्पा मोडीवाले,रामेश्वर अप्पा महाजन,उमेशअप्पा नित्रुडकर व्हाईस चेअरमन सोनपेठ नागरी सहकारी बैंक, कोंडीबा ऐकलारे,उमाकांत कोल्हेकर,भीमाशंकर शिंदे, राजाभाऊ चौडे,नागनाथ कोटुळे,माजी नगरसेवक अमृत महालिंग स्वामी, किरण स्वामी संपादक साप्ताहिक सोनपेठ दर्शन व सदाशिव कोल्हेकर आदी प्रमुखानच्या आवाहनावरून महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्य तालुक्यातील व शहरातील सर्व धर्म सर्व संघटना आणि सर्व मित्र मंडळांना अवाहन केले आहे.दि. ३ मे २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक,नित्रुडकर कॉम्प्लेक्स येथे अभिवादन सभेचे आयोजन ठीक सकाळी १० वाजता केले असून यासाठी तमाम वीरशैव समाज बांधव, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड,इकरा मित्र मंडळ,जन सेवा मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, अल कुरेश सेवा भावी संस्था, जय हो मित्र मंडळ, लहुजीनगर मित्र मंडळ, भीमगड मित्र मंडळ, संभाजीनगर मित्र मंडळ, गणेशनगर मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, सोनखेड मित्र मंडळ, गोपीनाथ मुंडे मित्र मंडळ, सोनपेठ तालुका मराठी पत्रकार संघ, शिवकृपा मित्र मंडळ, मौलाना मित्र मंडळ, विठ्ठल मंदिर विकास मित्र मंडळ, चिंतामणी प्रतिष्ठान, जय सेवालाल मित्र मंडळ, आदर्श तांडा मित्र मंडळ, हरी ओम मित्र मंडळ, हॅपी थॉट्स मित्र मंडळ, सोमेश्वर मित्र मंडळ, चिंतामणी मित्र मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटी भीमगड सोनपेठ आदींनी उपस्थिती दर्शवून महामानव विश्व गुरु महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन सर्व धर्म समभावाने करण्याचे आयोजन केले आहे.असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ मराठवाडा अध्यक्ष सुभाषअप्पा नित्रुडकर यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment