सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री.धनंजय मुंडे यांचा परभणी जिल्हा दौरा
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.30 एप्रिल 2022 रोजी रात्री सोईनूसार शासकीय विश्रामगृह परभणी येथे आगमन व मुक्काम करतील. रविवार दि.1 मे 2022 रोजी सकाळी 7.55 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथून मोटारीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमकडे प्रयाण. सकाळी 7.59 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे आगमन, सकाळी 8 वाजता मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 8.35 वाजता परभणी जिल्हा ऐतिहासिक आभासी सहल-चित्रमालिकेचे प्रदर्शनाचे उदघाटनास उपस्थित (स्थळ-स्टेडियम हॉल, परभणी), सकाळी 8.45 वाजता जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत महिला व बाल विकास भवन इमारतीचे भूमिपूजन (स्थळ-जिल्हा ग्रंथालय कार्यालयाजवळ वसमत रोड परभणी), सकाळी 9 ते 9.30 वाजेपर्यंत राखीव (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी), सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत खरीप हंगाम 2022 नियोजन बैठक (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी), सकाळी 10.30 ते 11 वाजेपर्यंत पाणी टंचाई आढावा बैठक (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी), सकाळी 11 वाजता रमाई आवास घरकुल (ग्रामीण) निर्माण समिती बैठक (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी), दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत राखीव, दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत राष्ट्रवादी पक्ष कार्यालय आढावा बैठक, दुपारी 3 ते 3.30 वाजेपर्यंत श्री.नृसिंह फिल्म प्रोडक्शन आयोजित कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ-बी.रघुनाथ सभागृह, परभणी), सोयीनूसार परभणी येथून मोटारीने पंढरी निवासस्थान परळीकडे प्रयाण करतील.
-*-*-*-*-


No comments:
Post a Comment