शहेजाद भैय्या उर्फ लाला यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
पाथरी / सोनपेठ (दर्शन) :-
विश्वशांती सेवाभावी संस्था पाथरीचे सचिव शहेजाद भैय्या उर्फ लाला यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी पाथरी शहरात साजरा करण्यात आला.
शहेजाद भैय्या उर्फ लाला हे सतत समाज कार्याल अग्रेसर असतात. त्यांनी कोरोना काळातही गोरगरीब जनता, गरजू, रूग्ण यांच्यासाठी भरपूर कार्य केले. मोफत अन्नछत्र चालविले.दि.1 एप्रिल त्यांचा वाढदिवस असल्याने पाथरी शहरात विविध कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले होते. यामध्ये पाथरी शहरातील गरजू महिलांना साडी वाटप, वीट भट्टीवरील कामगारांना टरबूज, फळे आदींचे वाटप करण्यात आले.तसेच कामगारांना मोतीचूर लाडूचेही वाटप करण्यात आले.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाथरी बस स्टॅड परिसरात थंड पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली. यावेळी आबेद लाला शेख, अनंत वाकणकर, बालाजी लांडे, चक्रधर चिंचाणे, सय्यद रईस, पि.के. ब्रदर्स, सचिन कांबळे, गजानन उंबरकर, शेख वाजेद लाला, मुखीद लाला, बाळू तांबे आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment