Saturday, April 30, 2022

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर मुख्य शासकीय समारंभ

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन
प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर मुख्य शासकीय समारंभ

परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त रविवार दि. 1 मे 2022 रोजी परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम  येथे सकाळी 8 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन परभणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
    या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या  दृष्टीने कृपया बँग सोबत आणू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
           महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.
-*-*-*-*-

Friday, April 29, 2022

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका पत्रकार संघ अध्यक्षांचा मेळावा व पुरस्कार सोहळ्याला उपस्थित रहा

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका पत्रकार संघ अध्यक्षांचा मेळावा व पुरस्कार सोहळ्याला उपस्थित रहा

मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख.
उद्घाटक माजी मुख्यमंत्री
मा.देवेंन्द्रजी फडणवीस.
प्रमुख उपस्थिती
लोकमतचे अॕकर
विलासजी बडे.
स्वागताध्यक्ष
आ.रत्नाकरजी गुट्टे.
राज्य उपाध्यक्ष
सुरेशजी नाईकवाडे.
गंगाखेड तालुका अध्यक्ष
पिराजी कांबळे.

 गंगाखेड / सोनपेठ (दर्शन) : - 

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ अध्यक्षांचा मेळावा आणि आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण समारंभ शुक्रवार दिनांक ६ मे २०२२ रोजी परभणी जिल्ह्यात गंगाखेड येथील राजेश्वर फंग्शन हाॕल,संत जनाबाई मंदिर रोड येथे होणार आहे.या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य विश्वस्त एस एम देशमुख तर उद्घाटक विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि आयबीएन लोकमत वाहिनीचे लोकप्रिय अँकर विलास बडे यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडत आहे.आमदार मा. श्री. रत्नाकर गुट्टे सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत.
गंगाखेड तालुका पत्रकार संघाने राज्यस्तरीय मेळावा घेण्याची तयारी दाखवल्यानंतर परिषदेचे राज्य व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी गंगाखेडला भेट देऊन
गंगाखेड तालुका पत्रकार संघ अध्यक्ष पिराजी कांबळे व स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि नियोजित कार्यक्रमाच्या जागेची पाहणी केली.गंगाखेडमधील सुसज्ज सभागृहात हा कार्यक्रम करण्याचे नियोजन असून येणार्या तालुका अध्यक्षांची आणि पुरस्कार्थींची उत्तम व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती स्थानिक पदाधिकारी यांनी दिली. गंगाखेडचा हा कार्यक्रम दोन सत्रात होईल.उद्घाटनाच्या सत्रात पुरस्कार वितरण समारंभ होईल तर भोजनोत्तर दुपारच्या सत्रात परिषदेची दिशा आणि पत्रकार चळवळीवर परिषदेचे पदाधिकारी मार्गदर्शन करतील.कोरोना नंतरच्या काळात परिषदेचा पहिलाच भव्य असा कार्यक्रम होत असल्याने कार्यक्रमास राज्यातील सर्व तालुका आणि जिल्हा अध्यक्षांनी उपस्थित राहावे असे आवाहन राज्य उपाध्यक्ष सुरेश नाईकवाडे व गंगाखेड तालुका अध्यक्ष पिराजी कांबळे यांनी केले आहे.



सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री.धनंजय मुंडे यांचा परभणी जिल्हा दौरा

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री.धनंजय मुंडे यांचा परभणी जिल्हा दौरा
परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.30 एप्रिल 2022 रोजी रात्री सोईनूसार शासकीय विश्रामगृह परभणी येथे आगमन व मुक्काम करतील. रविवार दि.1 मे 2022 रोजी सकाळी 7.55 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथून मोटारीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमकडे प्रयाण. सकाळी 7.59 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे आगमन, सकाळी 8 वाजता मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 8.35 वाजता परभणी जिल्हा ऐतिहासिक आभासी सहल-चित्रमालिकेचे प्रदर्शनाचे उदघाटनास उपस्थित (स्थळ-स्टेडियम हॉल, परभणी), सकाळी 8.45 वाजता जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत महिला व बाल विकास भवन इमारतीचे भूमिपूजन (स्थळ-जिल्हा ग्रंथालय कार्यालयाजवळ वसमत रोड परभणी), सकाळी 9 ते 9.30 वाजेपर्यंत राखीव (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी),  सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत खरीप हंगाम 2022 नियोजन बैठक (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी), सकाळी 10.30 ते 11 वाजेपर्यंत पाणी टंचाई आढावा बैठक (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी), सकाळी 11 वाजता रमाई आवास घरकुल (ग्रामीण) निर्माण समिती बैठक (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी), दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत राखीव, दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत राष्ट्रवादी पक्ष कार्यालय आढावा बैठक, दुपारी 3 ते 3.30 वाजेपर्यंत श्री.नृसिंह फिल्म प्रोडक्शन आयोजित कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ-बी.रघुनाथ सभागृह, परभणी), सोयीनूसार परभणी येथून मोटारीने पंढरी निवासस्थान परळीकडे प्रयाण करतील.
-*-*-*-*-

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम 

परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.30 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.15 वाजता परभणी रेल्वेस्थानक येथे आगमन व मोटारीने सावली शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी 7.30 ते 10.45 वाजता सावली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत शिक्षण विभागाची आढावा बैठक (जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी), दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, दुपारी 12.45 ते 5.45 वाजेपर्यंत सावली शासकीय विश्रामगृहात आगमन व राखीव.  सायंकाळी 5.45 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथून मोटारीने वसमत रोडवरील विष्णु जिनिंग मैदानाकडे प्रयाण, सायंकाळी 6 ते 7.30 वाजेपर्यंत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त युगप्रवर्तक महोत्सव 2022 कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- विष्णू जिनिंग मैदान, वसमत रोड, परभणी). सायंकाळी 7.30 वाजता विष्णू जिनिंग मैदान, वसमत रोड, परभणी येथून मोटारीने वसमतकडे प्रयाण करतील.
रविवार दि.1 मे 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता सावली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सायंकाळी 7.45 वाजता सावली शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने परभणी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण, रात्री 8 वाजता परभणी रेल्वेस्थानक येथे आगमन व रात्री 8.22 वाजता परभणी येथून देवगिरी एक्सप्रेस रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करतील.
-*-*-*-*-

Thursday, April 28, 2022

महात्मा बसवेश्वर यांना सर्व धर्मीय अभिवादन उपक्रमात सहभाग नोंदवावा-सुभाषअप्पा नित्रुडकर

महात्मा बसवेश्वर यांना सर्व धर्मीय अभिवादन उपक्रमात सहभाग नोंदवावा-सुभाषअप्पा नित्रुडकर

सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथील अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ मराठवाडा अध्यक्ष सुभाषअप्पा नित्रुडकर यांनी प्रती वर्षी प्रमाणे अक्षय तृतीया सकल मानव जातीचे उद्धारक महामानवांचे महामानव विश्वगुरु महात्मा बसवेश्वर यांच्या ८९१ व्या जयंती निमित्य तालुक्यातील व शहरातील सर्व धर्मीय सर्व संघटना आणि सर्व मित्र मंडळांना अवाहन केले आहे कि दि.३ मे२०२२ महात्मा बसवेश्वर यांना सर्व धर्मीय अभिवादन उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.तालुका अध्यक्ष विनोद चीमनगुंडे, बसलिंगअप्पा मोडीवाले,रामेश्वर अप्पा महाजन,उमेशअप्पा नित्रुडकर व्हाईस चेअरमन सोनपेठ नागरी सहकारी बैंक, कोंडीबा ऐकलारे,उमाकांत कोल्हेकर,भीमाशंकर शिंदे, राजाभाऊ चौडे,नागनाथ कोटुळे,माजी नगरसेवक अमृत महालिंग स्वामी, किरण स्वामी संपादक साप्ताहिक सोनपेठ दर्शन व सदाशिव कोल्हेकर आदी प्रमुखानच्या आवाहनावरून महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्य तालुक्यातील व शहरातील सर्व धर्म सर्व संघटना आणि सर्व मित्र मंडळांना अवाहन केले आहे.दि. ३ मे २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक,नित्रुडकर कॉम्प्लेक्स येथे अभिवादन सभेचे आयोजन ठीक सकाळी १० वाजता केले असून यासाठी तमाम वीरशैव समाज बांधव, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड,इकरा मित्र मंडळ,जन सेवा मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, अल कुरेश सेवा भावी संस्था, जय हो मित्र मंडळ, लहुजीनगर मित्र मंडळ, भीमगड मित्र मंडळ, संभाजीनगर मित्र मंडळ, गणेशनगर मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, सोनखेड मित्र मंडळ, गोपीनाथ मुंडे मित्र मंडळ, सोनपेठ तालुका मराठी पत्रकार संघ, शिवकृपा मित्र मंडळ, मौलाना मित्र मंडळ, विठ्ठल मंदिर विकास मित्र मंडळ, चिंतामणी प्रतिष्ठान, जय सेवालाल मित्र मंडळ, आदर्श तांडा मित्र मंडळ, हरी ओम मित्र मंडळ, हॅपी थॉट्स मित्र मंडळ, सोमेश्वर मित्र मंडळ, चिंतामणी मित्र मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटी भीमगड सोनपेठ आदींनी उपस्थिती दर्शवून महामानव विश्व गुरु महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन सर्व धर्म समभावाने करण्याचे आयोजन केले आहे.असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ मराठवाडा अध्यक्ष सुभाषअप्पा नित्रुडकर यांनी केले आहे.

Wednesday, April 27, 2022

"श्री विघ्नहर्ता सुपर मार्केट" च्या भव्य शुभारंभाचे साक्षीदार व्हा.....

"श्री विघ्नहर्ता सुपर मार्केट" च्या भव्य शुभारंभाचे साक्षीदार व्हा.....
सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरात प्रथमच "श्री विघ्नहर्ता सुपर मार्केट" कौटुंबिक जीवनावश्यक वस्तूंचे घर यांचा भव्यदिव्य शुभारंभ वैशाख शु.३ शके १९४४ अक्षय्य तृतीया मंगळवार दि.३ मे २०२२ सकाळी १०:०० वाजता.त्रिमुर्ती नगर, विटा रोड, सोनपेठ.येथे मा.डॉ. आर. बी. जाजू व दत्तात्रय विश्वनाथ रुद्रवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे,आजच्या धावत्या जगात प्रत्येकाला परिस्थितीनुसार बदलावं लागतं.काळानुरूप आपल्या कल्पकतेला तसेच दर्जा व गुणवत्तेला प्रधान्यक्रम देतांना सोनपेठ परिसरातील सर्वसामान्यांपासून सर्व रहिवाश्यांच्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल होत आहे.जीवनावश्यक किराणा असो वा पर्सनल केअर.त्यांच्या पूर्तीसाठी व गावातून शहरात येणाऱ्या ग्राहकांना आता सर्वच गोष्टी "श्री विघ्नहर्ता सुपर मार्केट" येथे एकाच छताखाली सहज उपलब्ध करून देत आहोत.आपल्या खरेदीचा आनंद निश्चितच द्विगुणीत होईल हा आमचा दृढविश्वास आहे, म्हणूनच आपल्या सेवेत."श्री विघ्नहर्ता सुपर मार्केट"एक कौटुंबिक जीवनावश्यक वस्तूंचे घर हे भव्य दालन सुरु करत आहोत.या शुभारंभ सोहळ्यास आपण आवर्जून उपस्थित रहून साक्षीदार व्हावे तसेच निमंत्रण पत्रिका नजर चुकीने राहिली असल्यास हेच अग्रांहाचे निमंत्रण समजून उपस्थित रहावे.अशी नम्र विनंती ज्ञानेश्वर धोंडिबा डमढरे,चंद्रशेखर गणपत लादे, महेश दत्तात्रय रुद्रवार,जितेंद्र पद्माकर वांकर, संजय भालचंद्र वलसेटवार व प्रशांत प्रभाकर गुंडाळे आदिंनी केली आहे.

Tuesday, April 26, 2022

परभणी वरून सोनपेठसाठी बसच्या १२ फैरी आता संध्याकाळी ०७ वाजता मुक्कामी

परभणी वरून सोनपेठसाठी बसच्या १२ फैरी आता संध्याकाळी ०७ वाजता मुक्कामी 


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ साठी परभणी पोखर्णी शिर्शी शेळगाव सोनपेठ बसच्या १२ फैरी सतत चालनार यासाठी बस वाहक कृष्णा राडकर पाटील सह पत्रकार शिवमल्हार वाघे व गजानन चिकणे यांनी प्रयत्न केले असुन प्रवाशांची गैरसोय होत होती आता सोय होणार या साठी तमाम प्रवाशांच्या वतीने आगार प्रमुख परभणी यांचे आभार व्यक्त केले आहेत.नविन बस वेळापत्रक जाहीर....
परभणी वरून सोनपेठ साठी......
सकाळी ०६,०७,०८,०९,१०, दुपारी १२,०१,०२,०३,०४,
संध्याकाळी ०५,०७
सोनपेठ वरून परभणी साठी.....
सकाळी ०७,०९,१०,११
दुपारी  १२,०२,०३,०४
संध्याकाळी ०५,०६,०७
सर्व प्रवाशांनी जास्तीत जास्त लोकांना सांगावे अशी नंम्र विनंती बस चालक कृष्णा राडकर यांनी केली आहे.

"वैष्णवी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल"चा मा.धनंजयजी मुंडे यांच्या शुभ हस्ते भव्य शुभारंभ

"वैष्णवी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल"चा मा.धनंजयजी मुंडे यांच्या शुभ हस्ते भव्य शुभारंभ

परळी / सोनपेठ (दर्शन):-
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर डॉ.पांडुरंग गंगाधर फड यांच्या "वैष्णवी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचा" दि.3 में 2022 मंगळवार रोजी "छत्रपती शिवाजी महाराज चौक",अंबाजोगाई रोड परळी येथे सामाजिक न्याय मंत्री मा.धनंजयजी मुंडे यांच्या शुभ हस्ते भव्य शुभारंभ संपन्न होणार आहे, श्री ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या कृपाशीर्वादाने कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.संजय भाऊ दौंड (आमदार विधान परिषद), प्रमुख उपस्थिती मा. डॉ.भास्कर खैरे (अधिष्ठाता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई),मा. डॉ.सुरेश साबळे (जिल्हा शल्य चिकित्सक बीड),मा. डॉ. अमोल गीत्ते (जिल्हा आरोग्य अधिकारी बीड),मा. डॉ. सूर्यकांत मुंडे (बाल रोग तज्ञ परळी),मा. गोविंद बालाजी मुंडे (सभापती न.प. परळी) आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी गरजवंतांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच निमंत्रण पत्रिका नजर चुकीने राहिली असल्यास हेच अग्रांहाचे निमंत्रण असे आवाहन श्री गंगाधर ज्ञानोबा फड,डॉ. पांडुरंग गंगाधर फड [M.B.B.S. DNB (Ortho)],डॉ. शुभांगी पांडुरंग फड (मुंडे) [M.B.B.S. DA. (Anaesthesia)],डॉ. सिद्धेश्वर गंगाधर फड [Bds mds Mumba], डॉ. जयश्री सिध्देश्वर फड (दराडे) [B.A.M.S. (MUHS)], डॉ. लक्ष्मण गंगाधर फड [M.B.B.S MD (Forensic medicine)],डॉ. साधना लक्ष्मण फड (मुसळे) [B.A.M.S. MD. (Medicine)] आदिंनी केले आहे.







Wednesday, April 20, 2022

जाफराबाद सोनपेठ लातूर बस उद्या पासून सुरू

जाफराबाद सोनपेठ लातूर बस उद्या पासून सुरू

सोनपेठ (दर्शन):-
सोनपेठ तालुक्यात पाच महिन्यांपासून परिवहन महामंडळाचा संप असल्याकारणाने लांब पल्ल्याच्या गाड्या बंद झालेल्या होत्या त्या पूर्ववृत हळूहळू सुरू होत आहेत अशाच प्रकारे उद्या पासून जाफराबाद जालना सेलू पाथरी सोनपेठ परळी अंबाजोगाई लातूर बस सुरु होत असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेली आहे.सोनपेठ तालुक्यातील नागरिकांना सोनपेठ येथून परळी,अंबाजोगाई व लातूरला जाण्यासाठी ही गाडी दुपारी 4 वाजता लातुरात मुक्कामी तर सोनपेठ येथून पाथरी,सेलू,जालना व जाफराबाद ला जाण्यासाठी सकाळी 9 वाजता मिळणार आहे.

Monday, April 18, 2022

सोनपेठ ग्रामीण रुग्णालय येथे भव्य तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन

सोनपेठ ग्रामीण रुग्णालय येथे भव्य तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ ग्रामीण रुग्णालय येथे भव्य तालुकास्तरीय आरोग्य मेळावा शुक्रवार दि.२२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ०४ वाजेपर्यंत.नियोजित शिबिरासाठी सोनपेठ शहर, तालुका व परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जास्तीत जास्त रुग्णांना प्रवृत्त करून शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे हे शिबीर राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय मार्फत केंद्र शासन यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आयोजित केले आहे. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना सर्व तज्ञ (स्पेशालिष्ट) डॉक्टरांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात या एकमेव उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. शिबिराची वैशिष्ट्ये या शिबिरात ग्रामीण रुग्णालय सोनपेठ व जिल्हा रुग्णालय, परभणी येथील तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येईल.वैद्यकिय रुग्णांची रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, तपासणी व उपचार केले जातील व आरोग्य शिक्षण देण्यात येईल. शल्यचिकित्सा पात्र रुग्णांची तपासणी करून हायड्रोसील (अंडवृष्टी), हर्निया, अपेंडिक्स गर्भ पिशवीच्या कॅन्सरचे निदान व पुढील उपचार, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येतील. शस्त्रक्रिया सुसज्ज शस्त्रक्रियागृहात व मुलतज्ञाच्या देखरेखेखाली होतील.शस्त्रक्रियेनंतर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व औषधोपचार करण्यात येईल. विविध राष्ट्रीय कार्यक्रम व कुटुंब कल्याण कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात येईल. उपस्थितांसाठी (ABDM) अंतर्गत युनिक हेल्थ आयडी तयार करून देण्यात येईल. पात्र नागरिकांसाठी (AB-PM-JAY) अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड देण्यात येईल.तज्ञ स्पेशालिस्ट डॉक्टर्स फिजिशियन, सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, नेत्र तज्ञ, दंत चिकित्सक, भुल तज्ञ व इतर तज्ञ.आयोजन व मार्गदर्शन डॉ. बाळासाहेब नागरगोजे जिल्हा शल्यचिकित्सक परभणी.डॉ.राहुल गित्ते,जि.प.आरोग्य अधिकारी,परभणी.आयोजन व व्यवस्थापक वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय सोनपेठ.तालुका आरोग्य अधिकारी तालुका सोनपेठ.

कौशल्याबाई वसंतराव लाखे पाटील ममदापूरकर यांचे हृदयविकाराने निधन

कौशल्याबाई वसंतराव लाखे पाटील ममदापूरकर यांचे हृदयविकाराने निधन




सोनपेठ (दर्शन) :-

कौशल्याबाई वसंतराव लाखे पाटील ममदापूरकर यांचे हृदयविकाराने दिनांक 17 एप्रिल 2022 रविवार रोजी रात्री 11.30 वाजता दुःखद निधन झाली यांच्यावर ममदापूर येथे दिनांक 18 एप्रिल 2022 सोमवार रोजी सकाळी 9 वाजता अंतिम संस्कार करण्यात आले, यावेळी पंचक्रोशीतील नागरिक नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांचे वय वर्ष 55 होते, त्यांच्या पश्चात पती वसंतराव लाखे पाटील, तीन मुलं, सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे.यांच्या दुःखद निर्णयामुळे सर्व स्तरातून तसेच साप्ताहिक सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Wednesday, April 13, 2022

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी भिमगड सार्वजनिक जयंती महोत्सव

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी भिमगड सार्वजनिक जयंती महोत्सव 


सोनपेठ (दर्शन):-

सोनपेठ शहरातील भिमगड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी सार्वजनिक जयंती महोत्सव गुरुवार दि. १४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०:०० वा. डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह भीमगड येथे सामुदायिक त्रीसरण पंचशील वंदना होईल व महामानवांना अभिवादन करण्यात येईल.निलेश मुढे प्रस्तुत भिमसंध्या संगीत रजनी ऑर्केस्ट्रा मंगळवार दि. १९ एप्रिल २०२२ रोजी ठीक सायंकाळी ०८:०० वा. भिमसंध्या संगीत रजनी ऑर्केस्ट्रा स्थळ: डॉ बाबासाहेब आंबेडकर चॉक सोनपेठ व महाकवी वामनदादा कर्डक कलारत्न पुरस्काराने सोनपेठ तालुक्यातील कलावंतांचा सन्मान करण्यात येईल.बुधवार दि.२० एप्रिल २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह भीमगड सोनपेठ येथे पंचशील ध्वजारोहण आयु. बाळासाहेब भिकाजी बोकरे यांच्या हस्ते होईल.
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावर प्रयोधनात्मक "मी रमाई बोलते" हा एक पात्री प्रयोग होईल सादरकर्त्या कु. वैभवी विलास कांबळे (पारगावकर) लातूर
कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. सारंग भिकुसिंग चव्हाण तहसीलदार,आयु. राजकुमार चिकटे,आयु. भानुदास रंजवे,आयु. अशोक पांडुरंग तिरमले,आयु. सतीश दत्तराव वाघमारे,आयु. जुनेद रमजान खुरेशी,आयु. आया खंदारे,आयु. मिलिंद एकनाथ तुपसमिंद्रे,प्रमुख पाहुणे आयु. डॉ सुभाष पवार,आयु विष्णु गिरी,प्रमुख उपस्थिती आयु. अनिल घनसावंत,आयु. जयवंत सोनवणे,आयु. उत्तम संभाजी भाग्यवंत,आयु सिद्धांत प्रभाकर शिरसाट,आयु, सदाशिव का मुद,आयु.संदीप बोरकर,आयु.डॉ. सिध्देश्वर हालगे,आयु. गौतम गंगाधर मुंढे,आयु. भास्कर बापुराव तिरमले,आयु. सत्यशील गोविंदराव खंदारे,आयु, भगवान बापुराव किरवले,व सर्व पत्रकार बांधव सोनपेठ,शहरातुन प्रमुख रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक ढोल ताश्याच्या गजरात निघेल.जयंती कमिटी कार्यकारणी अध्यक्ष मारोती रंजवे, उपाध्यक्ष आशिष मुंढे,सचिव परसराम निरमले,विनय मुंडे,नितीन मा. रं भाव,सल्लागार उत्तम मुंढे,विष्णु खंदारे, कांता रंजवे, सुरेश रंजवे, प्रेमानंद मुंढे, केशव सदस्य धम्मपात किरवले, सुनील तिरमले, किरण रंजवे समस्त समाज बांधव सोनपेठ.दि. २०. एप्रिल २०२२ रोजी रात्री ठीक १०:०० वा. भिमशाहीर सुरेश रंजवे भिमसंध्या या संगीत ग्रुप चा भिमगीतांचा दणदणीत कार्यक्रम होईल.भव्य मोटारसायकल रॅली आयोजक भीमगड युवा मित्र मंडळ सोनपेठ दि. २० एप्रिल २०२२ रोजी भीमगड येथून निघेल.

Monday, April 11, 2022

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वही एक पेन अभियानाचे परळी शहरात आयोजन

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वही एक पेन अभियानाचे परळी शहरात आयोजन

परळी / सोनपेठ (दर्शन) :-

महामानव, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  131  व्या जयंतीनिमित्त  14  एप्रिल रोजी परळीत एक वही एक पेन या अभिनव अभियानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक पञकार विकास वाघमारे यांनी दिली आहे. 
        शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. आणि ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना चालना मिळावी या हेतूने एक वही एक पेन हा उपक्रम  14  एप्रिल रोजी रेल्वे स्टेशन येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळी  9  ते 12  या वेळेत राबविण्यात येणार आहे. अवांतर खर्च न करता या समाजोपयोगी अभियानात सहभागी होऊन या वेळेत आपण वही अथवा पेन आणून द्याव्यात. 
       जमा झालेल्या वह्या आणि पेन गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. या वेळी या अभियानाचे संस्थापक विकास रोडे ही उपस्थित राहणार आहेत. तरी दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याचे आवाहन विकास वाघमारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी  9028347358  या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.

Sunday, April 10, 2022

वीरशैव व्हीजन उत्सव समिती अध्यक्षपदी चिदानंद मुस्तारे तर सचिवपदी विजयकुमार बिराजदार;बसव व्याख्यानमाला व बसव सप्ताहाचे आयोजन

वीरशैव व्हीजन उत्सव समिती अध्यक्षपदी चिदानंद मुस्तारे तर सचिवपदी विजयकुमार बिराजदार;बसव व्याख्यानमाला व बसव सप्ताहाचे आयोजन



सोलापूर / परभणी / सोनपेठ (दर्शन):-

जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त वीरशैव व्हीजन उत्सव समिती अध्यक्षपदी चिदानंद मुस्तारे यांची तर विजयकुमार बिराजदार यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
            भुसार गल्ली येथील श्री मन्मथेश्वर मंदिर येथे रविवारी सकाळी वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नुतन उत्सव समिती गठीत करण्यात आली.
        २०२२-२३ या वर्षातील उत्सव समिती पुढीलप्रमाणे अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, उपाध्यक्ष राजेश नीला, सचिव विजयकुमार बिराजदार, सहसचिव संगमेश कंठी, कार्याध्यक्ष सचिन विभुते, सहकार्याध्यक्ष प्रसाद गोटे, कोषाध्यक्ष सोमनाथ चौधरी, सहकोषाध्यक्ष अविनाश हत्तरकी, कार्यक्रम प्रमुख बसवराज चाकाई, सहकार्यक्रम प्रमुख सिद्धेश्वर कोरे, स्पर्धाप्रमुख बसवराज जमखंडी, सहस्पर्धाप्रमुख धानेश सावळगी, प्रसिद्धीप्रमुख शिव कलशेट्टी, सहप्रसिद्धीप्रमुख गौरीशंकर अतनुरे, व्याख्यानमाला प्रमुख प्रा. मलकप्पा बणजगोळे, उपप्रमुख राहुल बिराजदार, सोशल मीडिया प्रमुख अमोल कोटगोंडे, सोशल मीडिया सहप्रमुख चेतन लिगाडे, पूजा समिती मेघराज स्वामी. बद्रीनाथ कोडगे-स्वामी, संगमेश्वर स्वामी, संयोजन समिती अमित कलशेट्टी, गंगाधर झुरळे, मेहुल भूरे, केतन अंबुलगे
              प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बसव व्याख्यानमाला व बसव सप्ताह घेणार आहोत. त्याचबरोबर वर्षभर समाजपूरक विविधांगी उपक्रम सातत्याने राबविणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष चिदानंद मुस्तारे यांनी दिली.
             याप्रसंगी आनंद दुलंगे, सोमशेखर याबाजी, संजय साखरे, नागेश बडदाळ, शिवानंद सावळगी, मनोज पाटील, दीपक बडदाळ, नागेश गदगे, सिद्राम बिराजदार, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले, सागर बिराजदार आदी उपस्थित होते.यावेळी विरशैव व्हीजन उत्सव समिती नुतन अध्यक्ष चिदानंद मुस्तारे आणि सचिव विजयकुमार बिराजदार यांच्या निवडीबद्दल सत्कार आनंद दुलंगे, संजय साखरे, राजशेखर बुरकुले, नागेश बडदाळ, शिवानंद सावळगी, राजेश नीला, गौरीशंकर अतनुरे, सिद्धेश्वर कोरे, मेघराज स्वामी आदिंनी केला.तसेच या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.
_____________________________
साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी बातम्या व जाहिरात साठि संपर्क मो.9823547752.तालुका सोनपेठ.जिल्हा परभणी.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Saturday, April 9, 2022

पालकमंत्री श्री.धनंजय मुंडे यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री श्री.धनंजय मुंडे यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

परभणी / सोनपेठ (दर्शन):- 

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 
       रविवार दि. 10 एप्रिल 2022 रोजी गिरवली ता. अंबाजोगाई येथून मोटारीने पिंपळदरी ता. गंगाखेड येथे दुपारी 2 वाजता आगमन व श्री संत मोतीराम महाराज  कलशारोहन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 3 वाजता पिंपळदरी येथून परळी वैजनाथकडे मोटारीने प्रयाण करतील. 
      सोमवार दि. 11 एप्रिल 2022 रोजी पंढरी निवासस्थान परळी वैजनाथ येथून मोटारीने परभणी येथे दुपारी 2 वाजता आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीस उपस्थिती. नंतर शासकीय विश्रामगृह परभणी येथे राखीव. रात्री 8:30 वाजता देवगिरी एक्सप्रेस रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करतील.
-*-*-*-*-

Friday, April 8, 2022

श्रीराम जन्मोत्सव भव्य शोभायात्रेत आज सर्व हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे - श्रीराम प्रतिष्ठान

श्रीराम जन्मोत्सव भव्य शोभायात्रेत आज सर्व हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे -श्रीराम प्रतिष्ठान

सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ पुण्यनगरीत प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी वर्ष सातवी रामनवमी व हिंदू एकता दिवसानिमित्त आज दि.10 एप्रिल 22 रविवार रोजी माता अहिल्यादेवी होळकर चौक येथे सकाळी ठीक 9 वाजता प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल.दुपारी ठीक 12.05 वाजता श्रीराम जन्मोत्सव व महाआरती होईल.सायंकाळी ठीक 4 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे,माता अहिल्यादेवी होळकर चौक येथे तमाम हिंदू बांधवांनी वरील सर्व कार्यक्रमास व श्रीराम जन्मोत्सव भव्य शोभायात्रेत सर्व हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आली आहे राम लला हम आएंगे ! भव्य जन्मोत्सव मनायेंगे !! जय श्रीराम.....

Wednesday, April 6, 2022

अभिनव उपक्रमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार सामाजिक समता अंतर्गत विविध कार्यक्रम; सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांची माहिती

अभिनव उपक्रमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार
सामाजिक समता अंतर्गत विविध कार्यक्रम; सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांची माहिती

परभणी / सोनपेठ (दर्शन):-

सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त 6 ते 16 एप्रिल दरम्यान सामाजिक समता या उपक्रमाअंतर्गत अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त  गिता गुठ्ठे यांनी दिली आहे.
         6 एप्रिल रोजी या सामाजिक समता कार्यक्रमाची रूपरेषा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांचे हस्ते प्रसिद्ध करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 7 एप्रिल रोजी समाजकल्याण विभागाची सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ.आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित केली आहे. 8 एप्रिल रोजी जिल्हास्तरावर स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येणार आहे. 9 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावा घेण्यात येणार आहे. 10 एप्रिल रोजी समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहितीबाबत प्रबोधन केले जाणार आहे. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे. 12 एप्रिल रोजी मार्जिनमनी योजनेच्या जनजागृती बाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा  आयोजित केली आहे. 13 एप्रिल रोजी संविधान जागर हा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 14 एप्रिल, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेली सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थापनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्याठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकर्‍यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले आहे. याच दिवशी सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अंतर्गत जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित केले जाणार आहे. 15 एप्रिल रोजी सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावा आयोजित केला आहे. याशिवाय तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 16 एप्रिल रोजी ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे हा उपक्रम राबविण्यात येऊन सामाजिक समता कार्यक्रमाची सांगता केली जाणार आहे.
            सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अभिवन उपक्रमात सर्वांनी सहभागी हावे असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले आहे.

Tuesday, April 5, 2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सामाजिक न्याय विभाग अभिनव पद्धतीने साजरी करणार - धनंजय मुंडे आजपासून दहा दिवस राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रम"

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सामाजिक न्याय विभाग अभिनव पद्धतीने साजरी करणार - धनंजय मुंडे
आजपासून दहा दिवस राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रम"



मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती राज्यभरात आजपासून (दि. 06) सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

दि. 06 एप्रिल ते दि. 16 एप्रिल राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम" राबविण्याचे नियोजन विभागाने केले असून, यासाठी विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी व देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत विभागाचे सहसचिव, समाज कल्याण आयुक्त, बार्टी चे महासंचालक तसेच मुंबई शहराचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आदींचा समावेश करण्यात आला आहे. 

*असा असेल सामाजिक समता कार्यक्रम...*

सामाजिक न्याय विभागाने दि. 06 एप्रिल पासून सलग दहा दिवस राज्यातील सर्व जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असलेल्या दैनंदिन उपक्रमांचे शासन परिपत्रक जारी केले आहे. 

या परिपत्रकानुसार दि. 06 एप्रिल रोजी या सामाजिक समता कार्यक्रमाचे सर्व जिल्ह्यांमधून उद्घाटन करण्यात येईल व पुढील उपक्रमांची जिल्हा स्तरावर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आली आहे. 

दि. 07 एप्रिल रोजी विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतील. 

दि. 08 एप्रिल रोजी, जिल्हा व विभाग स्तरावर कार्यक्रम आयोजित करून स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येईल.

दि. 09 एप्रिल रोजी, ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबवणे तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक अस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जातील.

दि. 10 एप्रिल रोजी, समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहिती बाबत प्रबोधन करण्यात येईल.

दि. 11 एप्रिल रोजी, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल.

दि. 12 एप्रिल रोजी, मार्जिन मनी योजनेच्या जनजागृती बाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. 

दि. 13 एप्रिल रोजी, संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. 

दि. 14 एप्रिल, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थपनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्याठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाईल. याच दिवशी सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहून, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करतील. 

दि. 15 एप्रिल, प्रत्येक सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करून बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल.

दि. 16 एप्रिल या अंतिम दिवशी, ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल. 

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम राबविला जाणार असून, प्रत्येक जिल्ह्यात वरीलप्रमाणे कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांना सोपविण्यात आली आहे.

हे सर्व कार्यक्रम यशस्वी करावेत तसेच यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ही श्री. मुंडे यांनी केले आहे.

जिजामाता पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेज येथे आनंदनगरी संपन्न

जिजामाता पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेज येथे आनंदनगरी संपन्न

सोनपेठ (दर्शन):-

सोनपेठ शहरातील विटा रोड त्रिमूर्ती नगर येथील जिजामाता पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेज येथे आनंदनगरी उत्साहात संपन्न झाली,याप्रसंगी उद्घाटक उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण व व प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख गणपत कोटलवार खाजगी कारणास्तव अनूपस्थीत राहीले या कारणाने उपस्थित माजी जिल्हा ग्राहक संरक्षण परीषद अशासकीय सदस्य तथा संपादक किरण स्वामी यांच्या हस्ते आनंदनगरी रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले.यावेळी संस्था सचिव प्रा. डॉ.मुंजाभाऊ धोंडगे व सौ.विद्याताई धोंडगे यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य अजय सर व पालक महिला उपस्थित होत्या, याप्रसंगी माता सरस्वती व या जिजाऊ प्रतीमेचे पुजन किरण स्वामी यांच्या हस्ते तर दिपप्रज्वलन प्राचार्य अजय सर व पालक महिला यांच्या हस्ते करुन माता सरस्वती व मा जिजाऊ यांच्या प्रतिमेस उपस्थीतांनी पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच बाल आनंदनगरी ची रिबीन सौ.आश्विनीताई चव्हाण यांच्या हस्ते कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य अजय सर बोलताना इयत्ता पाचवी इयत्ता अकरावी च्या विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावून सर्व विद्यार्थ्यांनी आनंदनगरी चा आस्वाद घेतला आनंद नगरी चे आयोजन शिक्षणासोबतच व्यवहारिक ज्ञान मुलांना व मुलींना प्राप्त व्हावे या उदात्त हेतूने आयोजन करण्यात आले होते. आनंद नगरीत पालक महीला व पालक उपस्थित राहून आनंद द्विगुणित केल्याबद्दल गणेश जयतपाळ सर तसेच सर्व शिक्षक यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.तर सुत्रसंचालन रंगनाथ गागर्डे यांनी केले.