अन्यथा रस्त्यावर उतरून `मनसे' करणार आंदोलन
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
दिवळी सणाच्या तोंडावरच बळीराजा साखर कारखाना ऊसउत्पादक शेतकर्यांना वेठीस धरू लागला असून शेअर घेण्यासही दबाव टाकत आहे. यामुळे शेतकरी मानसीक तणावात सापडला असून आपण यातून तातडीने मार्ग काढावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना सोमवारी (दि.8) दिलेल्या निवेदनात दिला आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख (सोनटक्के), जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी, राहूल कनकदंडे, लक्ष्मणराव रेंगे, अर्जुन टाक, निलेश पुरी, शेख शरीफ, गोविंद ठाकगर, वेदांत पुरंदरे, तुकाराम शिंदे, तेसज संघई, धीरज निर्वळ, अनिल बुचाले आदींनी सोमवारी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. त्यात पूर्णा तालुक्यातील कानडखेड येथील बळीराजा साखर कारखाना शेतकर्यास शेअर घेण्याबाबत दबाव टाकत असून शेअर न घेतल्यास ऊस तोडण्यास व नवीन उसाची नोंद घेणार नसल्याचेही शेतकर्यास कळवू लागले आहे. याबाबत आपणही लक्ष घालून हा विषय प्रादेशीक साखर संचालकांना सांगितली होती. मात्र, तरीबी बळीराजा साखर कारखान्याचे प्रशासन शेअरसाठी दबाव टाकू लागले आहे. तक्रार केल्यास लागवड केलेल्या उसाची नोंद ऊस तोडणार नसल्याचा धमकी वजा इशाराही संबंधित कर्मचारी, अधिकारी ऊसउत्पादकांना देत आहे. शिवाय या कारखान्यास मागील दोन वर्षात ऊस दिल्याने अन्य कारखाने येथील ऊस नेण्यास अमसर्थता दर्शवित आहेत. या कारखान्याने तोड व वाहतुकीसाठी 160 वाहनांचे करार अचानक रद्द केल्याने ही वाहनांचे मालक अडचणीत सापडले आहेत. वाहनमालकांनी कामगारांना तीन-तीन लाख रूपचे उचल दिली आहे. अचानक मध्येच करार रद्द केल्याने सर्वच वाहनचालक अडचणीत आले आहेत. कारखाना प्रशासनाचा हा मनमानी कारभार तत्काळ थांबवावा, दिवाळीसणाच्या पार्श्वभूमीवर येथील ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच मानसीक तणावात सापडला आहे. आपण यात लक्ष घालावे, बळीराजा कारकान्याच्या प्रशासनास समज द्यावी, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने समज देईल, रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे शेवटि सागीतले.

No comments:
Post a Comment