परभणी येथे जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयासाठी भाड्याने इमारत पाहीजे
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जिल्हा उद्योग केंद्र हे शासकीय कार्यालय असून या कार्यालयासाठी परभणी शहरामध्ये तयार इमारत भाड्याने घ्यावयाची आहे. जागा 2 ते 3 हजार चौ.फुट तयार इमारत सर्व सोयींनीयुक्त असावी. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी दोन, अधिकाऱ्यांसाठी दोन कक्ष, एक हॉल, अभिलेख कक्ष अशी रचना असल्यास प्राधान्य देण्यात येईल. ज्या व्यक्तींना इमारत भाड्याने द्यावयाची आहे. त्यांनी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, दुरदर्शन प्रक्षेपण केंद्राजवळ, कारेगाव नाका परभणी दुरध्वनी क्र.02452 223447 येथे संपर्क साधावा. असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक किरण जाधव यांनी कळविले आहे.

No comments:
Post a Comment