औरंगाबाद पदवीधर आ.सतिश चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला !
सोनपेठ (दर्शन) :-
विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.या मतदार संघाची निवडणूक 1 डिसेंबर तर मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतिश चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या निवडणुकीसाठी अधिसूचना 5 नोव्हेंबर रोजी जारी होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर, मतदान 1 डिसेंबर तर मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.सतीश चव्हाण आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस आणि शिवसेना यांची आघाडी असल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना आपला उमेदवार उभा करणार की आघाडी धर्म पाळणार, जरी आघाडी झाली तर आघाडी धर्माचे पालन होईल का ? हा एक प्रश्न येणारा निकालच सांगेल. याकडेच तमाम पदवीधर मतदारांचे लक्ष वेधले आहे. तसेच भाजप कडून अनेक नावे चर्चिले जात असली तरी माजी केंद्रीय राज्यमंत्री मा.खा.जयसिंगराव गायकवाड पाटिल, शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, पि.डी.पाटिल, समिर दुधगावकर, रमेश पोकळे यांची नावे आघाडीवर आहेत.तसेच पक्ष प्रहार, संभाजी ब्रिगेड, मनसे, एम.आय.एम.व विवीध संघटनाचे अपक्ष उमेदवार किती उभे राहणार ? व हे कोनाचा बळी घेणार यांच्या चर्चा होताना दिसत आहेत.


No comments:
Post a Comment