Wednesday, November 4, 2020

मराठवाड़ा पदवीधर मतदार संघा करीता भाजपा कडुन जयसिंगराव गायकवाड पाटील (काका) च उपयुक्त

मराठवाड़ा पदवीधर मतदार संघा करीता भाजपा कडुन जयसिंगराव गायकवाड पाटील (काका) च उपयुक्त


औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

मराठवाड़ा पदवीधर मतदार संघा च्या पदवीधर निवड़णुकी च्या तैयारी करीता ज्या त्या पक्षा कडुन मोर्चे बाँधणी सुरू झाली आहें.  त्या साठी राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आता पासूनच आप आपल्‍या पक्षा मधील प्रबळ दावेदारांची चाचपणी सुरू केली आहें. या मधे भारतीय जनता पार्टी कडुन माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील (काका) यांच्या कड़े देखील प्रमुख प्रबळ दावेदारां पैकी एक म्हनून पाहिल्‍या जात आहें.
     दोन वेळा लागोपाठ मराठवाड़ा पदवीधर मतदार संघा चे आमदार तसेच तीन वेळा लागोपाठ बीड लोकसभे वरुण खासदार म्हणुन निवडून गेलेले गायकवाड.. हे आपल्‍या विद्यार्थी दशे पासूनच संपूर्ण मराठवाड़ा भर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय तसेच आध्यात्मिक चळवळीतुन पुढ़े आलेले एका सामान्य शेतकरी कुटुंबा मधील नेतृत्व म्हणुन अगदी प्रामुख्याने ओळखले जाते... एका सामान्य शेतकर्‍या चा मुलगा ते थेट देशा चा केंद्रीय मंत्री असा जयसिंगराव गायकवाड पाटील यांचा राजकीय प्रवास अत्यंत रोमांचक आणी अंगावर शहारे आणन्या सारखा तर आहेंच.. परंतु त्याच बरोबर वर्तमान आरोप-प्रत्यारोपा च्या नावा खाली अत्यंत खालच्या पातळी वरील टिका टिपणी ने बरबटलेल्या राजकीय व्यवस्थे ला फाटे देऊन__नव्या राजकीय पीढ़ी समोर एक आदर्श प्रस्थापीत करनारा असा हा राजकीय प्रवास जयसिंगराव गायकवाड यांचा आहें.
गायकवाड याँच्या सामाजिक कार्याची मुख्य सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच आर्यसमाज च्या छत्रछाये खाली सुरू झाली. संघ प्रचारक दा.जी.खेड़कर, रमणभाई शाह याँच्या मार्गदर्शना खाली कार्य करीत जयसिंगराव काका बाल स्वयंसेवक, मुख्य शिक्षक, प्रचारक आणी विस्तारक ही राहीले. कील्ले धारूर जिल्हा बीड येथे १ नोव्हेंबर १९५२ ला जन्मलेले आणी त्याच गावचे भूमीपूत्र असलेले गायकवाड याँना स्वातंत्र्या च्या अगोदर च्या कील्ले धारूर येथील आर्यसमाज कारण आर्यसमाज चे विद्वान आणी प्रचारकांचा ही सहवास लाभला. पुढ़े महाविद्यालय जीवना मधे अंबेजोगाई येथे शिक्षणा साठी असताना साल १९७० ते साल १९७२ ते अंबेजोगाई चे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) चे सह मंत्री राहीले. याच काळात त्यांनी युवकां ना वया च्या १८ व्या वर्षी मताधिकार भेटला पाहिजे या जनसंघ द्वारे पुकारन्यात आलेल्या आंदोलना मधे हीरारीने सहभाग घेतला आणी ABVP च्या दिल्ली तसेच कोलकाता येथे भरलेल्या अधिवेशना मधे सहभाग नोंदवला.१९७३ साली संघा चे प्रथम वर्ष पूर्ण करून त्यांनी पुणे येथील जुन्नर, खेड़, इंदापुर, बारामती आदी तालुक्या मधे संघ प्रचारक म्हनून कार्य केले. त्या नंतर त्यांनी अंबेजोगाई येथील खडी केंद्रांना भेटी दील्या. येथील काम करनार्‍या मजुरांना पुरेपूर मोबदला मिळवुन दिला. श्री नानाजी देशमुख याँच्या आदेशा नुसार येथे बाळांत झालेल्या एका महीले ला त्यांनी स्वतः अंबेजोगाई येथे दारोदार जाऊन स्वतः भिक्षा मागुन तिला ४० किलो तांदुळ मिळवुन दिला.राज्यातील एस.टी दरवाढ़, वीज दरवाढ़, महागाई, टंचाई, दुष्काळ आदी विरुद्ध सर्व पक्षीयां सोबत आन्दोलन केली. प्रसंगी त्यांना जेल ही झाली. लाठीचार्ज ला सामोरे ही जावे लागले. १९७४ साली पुकारन्यात आलेल्‍या "मराठवाड़ा विकास आंदोलन" मधे त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. १९७५ साली राष्ट्रीय आणीबाणी ची तत्कालीन प्रधानमंत्री स्व.इंदिरा गांधी याँच्या द्वारे लादली गेली तेव्हा त्यांनी मराठवाड्‍या मधे सत्याग्रह संगठित करन्या मधे महत्वपूर्ण भूमिका निभावली परिणामस्वरूप 
१ अक्टोबर १९७५ ला त्यांना भारत संरक्षण कायदा खाली अटक झाली. सोबतच स्व.प्रमोद महाजन स्व.गोपीनाथ मुंडे याँना ही अटक झाली आणी या तिघांना नाशिक येथील मध्यवर्ती कारागृह येथे १५ महीने २० दिवस कारावास भोगावा लागला.
आणीबाणी च्या नंतर गायकवाड याँना जनता पार्टी चे औरंगाबाद आणी जालना लोकसभा चे संघठन मंत्री म्हनून नियुक्त करन्यात आले. ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पार्टी च्या स्थापने नंतर त्यांना भाजपा बीड जिल्हा सरचिटनीस म्हनून नेमण्यात आले. त्याच वेळी भारतीय जनता युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटनीस म्हनून ही त़्यांची नियुक्ति करन्यात आली. १९८१ साली गायकवाड हे डॉ बाबासाहेब अंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ चे सीनेट सदस्य म्हनून निवडून गेले. पुढ़े लगेचच १९८३ साली ते विद्यापीठा च्या कार्यकारी परीषदे वर सदस्य म्हनून निवडून गेले. याच काळा मधे युवक विद्यार्थ्‍या चे प्रश्न सोडवीताना "मराठा महासंघ" या राज्य व्यापी संघठने शी त़्यांचे नजीकी संबध प्रस्थापित झाले. १९८६ साली शेतकर्‍यांचा कर्जमुक्ती तसेच कापुस आणी ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा हमीभावा साठी गायकवाड याँनी स्व गोपीनाथ मुंडे याँच्या समवेत राज्य भर विस्तारीत दौरा केला. परिणामी नागपुर येथे विधानभवना वर निघालेल्या भाजपा च्या मोर्चा मधे ५ लाख शेतकरी सहभागी झाले. जनते ने पहिल्यांदाच भाजपा ला शेतकर्‍यांच्‍या स्वरूपा मधे पाहिले. पक्ष कार्या ची पावती म्हनून १९९० ला गायकवाड याँना भाजपा ने मराठवाड़ा पदवीधर मतदार संघाची उम्मेदवारी बहाल केली आणी गायकवाड याँनी पदवीधर मतदार संघा ची निवड़णुक जिंकली आणी ते पहिल्यांदा आमदार म्हनून विधानपरिषदे वर गेले. या मधे भाजपा सह "मराठा महासंघा" च्या कार्यकर्त्या चे ही मोठे योगदान राहीले. त्या नंतर मात्र गायकवाड याँनी मागे फिरून कधी पाहिले नाही. आणी भारतीय जनता पार्टी ची ही मुलुख मैदानी तोफ पदवीधरां च्या विविध प्रश्नवार विधान परिषदे मधे धडकत राहीली.
याच वेळी गायकवाड याँनी शेतकर्‍यांचे प्रश्न मांडण्या साठी स्व गोपीनाथ मुंडे आणी अन्य भाजपा नेत्यांच्या नेतृत्वाखाली आमदार असताना "तुळजापुर ते घृश्नेश्वर" ही यात्रा संगठीत केली.
परिणामत: संपूर्ण मराठवाड़ा भर शेतकर्‍यां मधे जागरूकता निर्माण झाली. याच दरम्यान १९९१ ते १९९३ त़्यांची *भारतीय जनता युवा मोर्चा* च्या प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आणी त्या माध्यमातुन त्यांनी राज्यभर विस्तारीत दौरे करून राज्यातील तरुणां ना भारतीय जनता पार्टी शी जोड़ले.
गायकवाड याँच्या याच कार्या च्या आधारावर पक्षा मधे त्यांचा दबदबा वाढ़ला आणी त़्यांची भाजपा च्या प्रदेश सरचिटनीस पदी नियुक्ति करन्यात आली आणी भाजपा च्या सर्व आघाड़ी आणी मोर्चा चे महाराष्ट्रा चे प्रमुख म्हनून त़्यांची नेमणुक करन्यात आली. सोबतच त्यांना भाजपा च्या राष्ट्रीय संसदीय समिति मधे ही स्थान भेटले. पुढ़े १९९३ साली गायकवाड याँना *भाजपा मराठवाड़ा विभाग संगठन महामंत्री* म्हणुन नेमन्यात आले.
अडवाणी याँच्या रामरथ यात्रे चे मराठवाड़ा विभाग प्रमुख म्हनून ही गायकवाड याँच्या वर जबाबदारी सोपवीण्यात आली. याच वेळी त्यांनी आदरणीय राजमाता विजया राजे सिंधिया याँच्या समवेत चित्रकूट येथे झालेल्या कारसेवे च्या प्रथम सत्याग्रहा मधे सहभाग नोंदवला.
मा.नरेंद्र भाई मोदीजी याँनी सारथ्य केलेल्या डॉ मुरली मनोहर जोशी याँच्या "भारत एकत्मता" यात्रे ला पूरक "अक्कलकोट ते जालना" ही एकत्मता उप यात्रा गायकवाड याँनी काढ़ली. तसेच डॉ मुरली मनोहर जोशी याँच्या समवेत श्रीनगर च्या लाल चौक येथे तिरंगा फाड़कावीन्या साठी ही गायकवाड सहभागी झाले होते. जनता पार्टी च्या माध्यमातुन "ड़ंकेल प्रस्ताव" वर राज्य भरातील शेतकर्‍यांचा मधे जागरूकता निर्माण केली ज्याची सांगता स्व अटल बिहारी वाजपेयी आणी आ लालकृष्ण आडवाणी याँच्या उपस्थीती मधे रामलीला मैदान येथे झाली होती. भाजपा च्या झेंड्‍याखाली आणी स्व गोपीनाथ मुंडे याँच्या नेतृत्वाखाली तत्कालीन अन्यायकारी राज्य सरकार विरुद्ध निघालेल्या "शिवनेरी ते शिवतिर्थ" या ६६ दिवसां ची २० हजार किलोमीटर च्या संघर्ष यात्रे ला संगठीत केले आणी सर्व सुरूवाती ची भाषणे गायकवाड याँनी दिली. जी यात्रा राज्यातील कांग्रेस - राष्ट्रवादी ची सत्ता खाली खेचन्‍या कारणीभूत ठरली. गायकवाड याँनी १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवड़णुकी मधे भाजपा+शिवसेना युती समवेत मराठा महासंघ या राज्यव्यापी संगठने ला ही एकत्र आणन्या मधे मोला ची भुमिका बजावीली. परिणामत: मराठा समाज मोठ्या संख्येने यूती च्या बाजूने आल्या चे प्रथमतः जानवला आणी राज्या मधे यूती चे शासन आले.
पुढ़े गायकवाड यांचा २७ मे १९९५ रोजी सहकार राज्य मंत्री म्हणुन महाराष्ट्र शासना च्या मंत्री मंडळा मधे समावेश झाला. परंतु मंत्री झाल्या वर ही गायकवाड याँच्या मराठवाड़ा पदवीधर मतदार संघा मधील संपर्क हा कमी झाला नाही. म्हणुनच "आमदार मतदारां च्या दारात" या तत्वाला धरून त्यांनी मराठवाड्‍यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालया ला प्रत्यक्ष भेटी दिल्या. सर्व शाळा - महाविद्यालय याँच्या भेटी घेउन त्यांच्या माग़ण्या पूर्ण करन्या चा कसोसी ने प्रयत्न केला. याचेच फलीत गायकवाड हे पुन्हा दुसर्‍यांदा मराठवाड़ा पदवीधर मतदार संघा निवड़णुकी मधे आपल्‍या सर्व ३३ प्रतिस्पर्ध्‍या ची अनामत रक्कम जप्त करीत जुलै १९९६ ला पुन्हा विधानपरीषदे वर भारी मताधिक्‍याने निवडून गेले.
मार्च १९९८ मधे एके दीवशी अचानक पार्टी च्या आदेशा नुसार त्यांनी मंत्रीपदा चा आणी विधानपरीषद पदा चा राजीनामा दिला. आणी पार्टी चा आदेश स्वीकारून बीड लोकसभे ची निवड़णुक लढ़वीली आणी राज्य भर भाजपा विरोधी वातावरण असताना ही पहिल्यांदा लोकसभे निवडून गेले. त्या नंतर पुन्हा अक्टोबर १९९९ ला त्यांना बीड लोकसभे करीता भाजपा कडुन उम्मेदवारी भेटली आणी गायकवाड दूसर्‍यांदा लोकसभे वर भारी मताधिक्‍याने निवडून आले. दूसर्‍यांदा खासदार झाल्या बरोबर त्याच महिन्यात १३ अक्टोबर १९९९ ला त़्यांची स्व अटल बिहारी वाजपेयी जी पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्री मंडळा मधे केन्द्रीय शिक्षण राज्य मंत्री म्हणुन समाविष्ट करन्यात आले. ५ एप्रिल २००० ला मोरेशीएस येथे आर्यसमाज द्वारे भरलेल्या जागतिक आर्य परिषदे मधे त्यांना मुख्य अतिथि म्हनून पाचारण करन्यात आले. नंतर १४ वी लोकसभा बीड येथून सर करीत गायकवाड याँनी सलग तीसर्‍यांदा दिल्ली गाठली. जयसिंगराव गायकवाड पाटील याँनी संसदीय कार्य समिति च्या दौर्‍यां अंतर्गत ६४ व्या संयुक्त राष्ट्र संघा च्या अधिवेशना मधे भाग घेतला. दरम्यान त्यांनी टर्की चा ही दौरा केला.
आपल्‍या बीड लोकसभा मतदार संघा मधे शहरे, गाव, खेडे, मोहोल्ले, तांड़े, शेतातील घरे याँना प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यांनी बीड जिल्ह्या मधे ८ हजार ५०० किलोमीटर पायी चालण्या चा विक्रम प्रस्थापीत केला. तसेच ६५० हून अधिक खेड्यां मधे विविध पद भूषवित असता ना अगदी मंत्री असताना ही मुक्काम केला. बीड जिल्ह्यात "गाव तीथे सभागृह" हे धोरण आखुण गायकवाड याँनी स्वतः च्या फंडा मधुन ७५० हुन अधिक सभागृह बांधुन दिली. तसेच मतदार संघा मधे १,००,००० झाड़े लावली. हा भारता मधे रिकॉर्ड प्रस्थापीत झाला.
२०१० ला भाजपा चे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितिन गडकरी जी याँनी त़्यांची भाजपा किसान मोर्चा च्या राष्ट्रीय सरचिटनीस पदी नियुक्ती केली. या काळा मधे त्यांनी देशव्यापी दौरा आखुन शेतकर्‍यांचा मधुन भाजपा च्या संगठना वाढ़ी साठी मोला ची भूमिका बजावीली त्याच बरोबर देश भर शेतकर्‍यांचा अड़ी अडचणी जाऊन घेउन त्या सोडवीण्या चा प्रयत्न केला.
जयसिंगराव गायकवाड पाटील याँना "संघठने पेक्षा कोणी थोर नाही कोणी मोठ नाही" याच बाळकडु भेटलेले आहें.
२०१९ च्या औरंगाबाद लोकसभे साठी भाजपा कडुन गायकवाड याँना प्रबळ दावेदार म्हणुन ओळखल्या गेले. गायकवाड याँच्या निवासस्थानी खैरे यांची लोकसभा निवड़णुकी पूर्व ची धाव सर्व काही सांगुन जाते. आता पुन्हा एकदा जयसिंगराव गायकवाड काका याँच्या कड़े भाजपा कडुन मराठवाड़ा पदवीधर मतदार संघा च्या प्रमुख दावेदारां पैकी एक म्हनून पाहिले जात आहें. पक्षा ने गायकवाड याँना पसंदी देऊन जानसान्यां च्या आणी एका सामान्य शेतकरी कुटुंबा मधील त्याच प्रमाण एका अनुभवी, हक्का च्या, १२ बलूतेदार आणी १८ अतुलेदार सर्व जात बाँधवां च्या, सर्व सामाजिक संगठने च्या या सर्वमान्य अश्या नेतृत्वा ला पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे. असे मत सर्व सामान्य कार्यकर्त्या कडुन वर्तवीले जात आहें.

सा.सोनपेठ दर्शन बातम्या व जाहीरातीसाठि संपर्क संपादक किरण रमेश स्वामी.मो.9823547752

No comments:

Post a Comment