Sunday, November 8, 2020

परभणीचे कलावंत मधुकर कांबळे यांची नृत्यातून विश्वविक्रमाला गवसणी

परभणीचे कलावंत मधुकर कांबळे यांची नृत्यातून विश्वविक्रमाला गवसणी



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी येथील कलावंत मधुकर कांबळे यांनी पायात 20 किलो वजनाचे घुंगरू बांधून डोक्यावर समई व त्यावर पाण्याने भरलेले पाच घडे घेऊन सलग 48 मिनिटे नृत्य करीत रविवारी (दि.आठ) विश्वविक्रमाला गवसणी घातली.
यावेळी परीक्षक म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे परिक्षक काळूराम ढोबळे आणि दत्ता जवळगे यांनी परीक्षण केले.
मधुकर कांबळे यांनी पायात 20 किलो वजनाचे घुंगरू बांधून डोक्यावर समई व त्यावर पाण्याने भरलेले पाच घडे, पायाखाली परात घेऊन सलग 48 मिनिटे नृत्य सादर केले. पायाखाली परात घेऊनही त्यांनी साकरलेल्या नृत्याने उपस्थितांच्या काळजाचा ठेका चुकवत वाहव्वा मिळवली. विशेषतः नृत्यातून लॉकडाऊनची भीषणताही साकारली. लॉकडाऊनमध्ये कलावंतांना, सर्वसामान्यांना, हातावर पोट असणार्‍यांना भेडसावलेले प्रश्नही सादर करण्याचा केलेल्या प्रयत्नाने उपस्थितांना हेलावून टाकले. यावेळी त्यांना प्रीती भालेाव, पूजा जोगदंड, स्नेहल कांगणे, दिलीप घुगे, करण जाधव, दिपाली स्वामी, अंजली कांबळे, मानसी कांबळे, बळीराम अंभोरे, किरण पोहरे आदींनी नृत्य केले.
दरम्यन, कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील, रविंद्र सोनकांबळे, महापालिका सदस्या संतोषी देशमुख, कास्टिंग डायरेक्टर सागर पतंगे, संयोजक एन.आय. काळे, डॉ. सुनील जाधव, रशीद मास्टर, बाळासाहेब देशमुख, प्रमोद कुटे, पवन निकाम, प्रा. पांडुरंग सत्वधर, दिलीप बनकर, राहूल धबाले, बाबुराव केळकर, गणपत भिसे, स्वरलक्ष्मी लहाने, संजीव अढागळे, सुधीर साळवे, सचिन पाचपुंजे, संघमित्रा उबाळे, अनिता सरोदे आदींच्या उपस्थितीत झाले. यावेळी विश्वविक्रम करणार्‍या मधुकर कांबळे या गुणी कलावंताच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन अभिनेते, निर्माते काळूराम ढोबळे यानी केले. सूत्रसंचालन यशवंत मकरंद यांनी केले.

No comments:

Post a Comment