परळीत होत असलेल्या द ग्रेट टॅलेंट शो राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये डी ऍक्ट डान्स इन्स्टिटय़ूटच्या विध्यार्थ्यां ची निवड
राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पोदार लर्न स्कुल व बचपन प्ले स्कुलच्या संयुक्त विद्यमाने परळीत द ग्रेट टॅलेंट शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये गंगाखेड येथील डी ऍक्ट डान्स इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होत आहे. बुधवार दि.04 नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन संपन्न झाले. दि इंडिया सिमेंट लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शशि मुखिजा, प्रताप सलूनचे संचालक प्रताप घोडके राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्ष बालचंद लोढा, कोषाध्यक्ष विजय सोनी, सह सचिव ओमप्रकाश झंवर, विश्वस्त कांताप्रसाद झंवर, प्रेमा बाहेती, प्रविण किरणजी लड्डा, पोदार स्कुलचे प्राचार्य बी. पी. सिंह बचपन स्कुलच्या प्राचार्या सौ. दीपा बाहेती आदींची उपस्थिती होती.
या स्पर्धेमध्ये गायन, वादन, कला, डान्स, मेहंदी, स्टाईल आदींसह विविध क्षेत्रातील कलाकारांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते या स्पर्धेच्या फायनल राऊंड मध्ये गंगाखेड येथील वयक्तिक नृत्य मध्ये प्रियंका अवचार वयोगट 16 ते 25 व सामूहिक नृत्यामध्ये.सुशांत धरमेकार ,सचिन बल्लाल ,प्रतीक घोबाळे,मंजुषा कांबळे ,प्रतीक साळवे ,धीरज गायकवाड ,अजय अवचार,सुमित गायकवाड यांची फायनल राउंड मध्ये निवड करण्यात आली.यांना नृत्य चे दिग्दर्शन डी ऍक्ट डान्स इन्स्टिट्यूट चे संचालक नृत्यदिग्दर्शक बुद्धभूषण गाडे यांनी केले या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये निवड झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.


No comments:
Post a Comment