अव्वाच्या सव्वा वीजबिलां विरुद्ध जिल्हा कचेरीवर मनसेचा धडक मोर्चा
लॉकडाऊनसह अनलॉकच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना अव्वा की सव्वा बिले वितरित करणार्या वीज वितरण कंपनीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गुरूवारी (दि.26) जिल्हा कचेरीवर जोरदार धडक मोर्चा काढला.
कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात मोठमोठ्या रकमेची वीज बिले सर्वसामान्यांच्या माथी मारली. वीज बिले भरण्याबाबत सक्ती सुरू केली.झिझिया करासारखी आकारणी करीत या सरकारने ग्राहकांना सळो की पळो करून सोडले, असा आरोप मोर्चेकर्यांनी केला. उर्जामंत्र्यांची भेट घेतल्यानंतरसुध्दा काही सकारात्मक पावले उचलल्या जातील,असे अपेक्षित होते.परंतु शंभर युनिटपर्यंत वीजदेयकांमध्ये सवलत देऊ,अशी भाषा करणार्या उर्जामंत्र्यांनी घुमजाव केला.वीज बिले भरलीच पाहिजेत, कोणतीही सवलत मिळणार नसल्याची भाषा सुरू केली. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांचा संयम सुटला आहे, असे मोर्चेकर्यांनी जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनातून नमुद केले.काही झाले तरी ही वाढीव वीज बिले भरू नका, असे आवाहनही यावेळी नागरिकांना केले. असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारलाही जनततेतील असंतोष जाणवणार नाही, सरकार तुमच्या विजेची जोडणी तोडू शकत नाही आणि जर तसा प्रयत्न केला तर मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल, असाही इशारा या मोर्चेकर्यांनी दिला.यावेळी रुपेश देशमुख,शेख राज,गणेश सुरवसे,श्रीनिवास लाहोटी,गुलाबराव रोडगे,राहूल कनकदंडे,गणेश भिसे,लक्ष्मणराव रेंगे, यादव महात्मे, अर्जुन टाक यांच्यासह अन्य पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी गुरुवारी जोरदार घोषणाबाजी करीत संपूर्ण बाजारपेठ दणाणून सोडली.



No comments:
Post a Comment