Saturday, November 28, 2020

पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी बोराळकरांना विजयी करा- शिवाजीराव मव्हाळे यांचे आवाहन

पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी बोराळकरांना विजयी करा- शिवाजीराव मव्हाळे यांचे आवाहन
सोनपेठ तालुक्यातील पदवीधर मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी व संपर्काने बोराळकरांना प्रथम पसंती


सोनपेठ (दर्शन) :-
 
राज्यातील आघाडी सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नाही.  शेतकरी, बेरोजगार तरूण, आरक्षणा सारखे प्रश्न अजूनही सुटले नाहीत, त्यामुळे पदवीधरांच्या प्रश्नांना खरा न्याय मिळवून द्यायचा असेल तर शिरीष बोराळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन भाजपचे परभणी( ग्रामीण)जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांनी केले आहे.
      मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपा मित्रपक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ सोनपेठ तालुक्यातील चारही मंडळात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली असुन पदवीधर मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन बोराळकर यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजप पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. मतदारांच्या गृहभेटी घेऊन बोराळकर यांच्या विजयासाठी सर्वशक्तीनिशी भाजप कार्यकर्त्ते कामाला लागले असल्याचे शिवाजीराव मव्हाळे यांनी सांगितले.
      या प्रचार दौर्यात भाजपचे परभणी( ग्रामीण) जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांच्या सह जेष्ठ नेते रमाकांत जाहगिरदार,तालुका अध्यक्ष  सुशील रेवडकर,अशोक खोडवे,संतोष दलाल आदीसह पदाधीकारी सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment