प्रा.गोविंद लहाने यांना बेटी फाउडेंसन चा आंतरराष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कार-2020 जाहीर
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा गोविंद लहाने यांना बेटी फाउडेंसन च्या वतीने साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आंतराष्ट्रीय साहित्यभूषण पुरस्कार -2020जाहीर.
प्रा गोविंद लहाने हे येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात कार्येरत असून ते आपल्या शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही सहभागी असतात. त्याच बरोबर ते साहित्य क्षेत्रातही एक प्रसिद्ध कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याअनेक कविता विविध प्रातिनिधिक काव्य संग्रहातून प्रकाशित झाल्या आहेत तर त्यांचा दुहिता चारोळी कविता संग्रह प्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे .यांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे. तर त्यांनी आता पर्यंत अनेक कवीसंमेलनात सहभागी होवून आपल्या कविता सादर केल्या. तर अनेक काव्य वाचन व काव्य लेखन स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या काव्य लेखन व काव्य लेखनाचा ठसा उमटविला आहे. त्यांना आता पर्यंत 1)कविरत्न पुरस्कार 2)म.फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 3)सोनपेठ रोटरी क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार 4) आदर्श शिक्षक समितीचा राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 5) एकता समितीचा समाजरत्न पुरस्कार असे अनेक मिळाले आहेत. तर त्यांनी भूतान पर्यावरण अभ्यास दौरा ही केला आहे. तर लाँकडाऊन च्या काळात त्यांनी अनेक काव्य वाचन व काव्य लेखन स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या कवितेला राज्य, देश व जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन बेटी फाउडेंसन महाराष्ट्र (वणी, जी. यवतमाळ) च्या वतीने आंतरराष्ट्रीय साहित्यभूषण पुरस्कारासाठी निवड केली असून हा पुरस्कार 22 नोव्हेंबर रोजी दिला जाणार आहे .त्यांच्या निवडी बदल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

No comments:
Post a Comment