पालमच्या 'त्या' ४२ गावांना मिळणार नुकसान भरपाई - काँ. राजन क्षीरसागर
परभणी / पालम / सोनपेठ (दर्शन) :-
पालम तालुक्यात 13 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना पीक विमा नुकसान भारपाई मिळण्याचा मार्ग खुला झाल्याची माहिती काँ. राजन क्षिरसागर यांनी दिली.या प्रकरणी आंदोलना नंतर नॅशनल इंश्युरंस काँर्पोरेशन या कंपनी विरूध्द कृषी आयुक्तांनी शेतकर्याना नुकसान भरपाई द्यावी, असे म्हटले, मात्र, पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई अदा केली नसल्याचे दत्तराव जाधव व परमेश्वर उध्दवराव जाधव यांनी काँ.राजन क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय पीकविमा समितीकडे याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर मंगळवारी (दि.तान) व्हिडीओ काँन्फरंसद्वारे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आमुक्तांसह अन्य पदाधिकारी व आमदार बाबाजानी दुर्रानी व आमदार रत्नाकर गुट्टे
यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शासन रितसर आदेश जारी करेल, असे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी यावेळी नमुद केले.पालम तालुक्यातीत 42 गावात गहु, ज्वारी, हरभरा व करडई या पिकाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 20 हजार 486 हेक्टर क्षेत्रावरील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नँशनल इंशुरन्स काँर्पोरेशन या कंपनीने पीकविमा नाकारला होता, यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने वेळोवेळी पाठपुरावा, आंदोलन केली.त्यानंतर राज्यस्तरीय पीक विमा समितीकडे दाद मागितली. या प्रकरणात गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत दिली. मात्र, पीकविमा कंपनीने भरघोस पीक आल्याचे रेकॉर्ड तयार केरुन ही बाब स्पष्ट केली.
या युक्तीबादात चंद्रकांत जाधव व परमेश्वर जाधव यांच्या वतीने अँड.रामराजे देशमुख यांनी बाजु मांडली.वीमा कंपनीच्या प्रतिनिधीचे फसवेदावे उघड केले, आम्ही शेतकऱ्यांना विलंब शुल्क व्याजासह सदर पीक वीमा भरपाई हेक्टर 24 हजार प्रमाणे संपूर्ण जोखीम रकमेची अदा करण्याचे अदाजे ही रक्कम सुमारे 49 कोटी रुपयांचा दावा केला आहे. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक श्री. शिंदे यांनी काढलेला आदेश, तत्कालीन जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांचे पत्र, कृषी आधुक्त दिवसे यांनी पिकवीमा भरपाई देण्याचा काढलेला आदेश, शासनाने मदती संदर्भात काढलेला शासन निर्णय
आणि संदर्भातील अन्य महत्वाचे भागदपत्रे पुरावे दाखल केले, तक्रारदारांचे म्हणने पीकविमा कंपनीम खोडता आले नाही, या प्रकरणाची मंगळवारी सुनावणी पूर्ण होऊन लवकरच याबाबत आदेश जारी करण्यात येत असल्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी सुनावणी अंती घोषित केल्याची माहिती काँ.राजन क्षीरसागर यांनी दिली.या सुनावणीसाठी काँ.राजन क्षिरसागर, अँड.रामराजे देशमुख, चंद्रकांत जाधव, परमेश्वर जाधव, प्रेमचंद शिंदे, गोविंद लांडगे हे सहाभागी होते. शासनातर्फ कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त मुख्य सांख्यिकी कार्यालयातील उदय देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक श्री.आळसे,


No comments:
Post a Comment