Monday, November 30, 2020

सोनपेठ चा आवाज अटकेपार अख्या जगात "गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा" झि टाँकिज चँनल वर ह.भ.प.माधव महाराज कुरे यांना पाहायल विसरु नका

सोनपेठ चा आवाज अटकेपार अख्या जगात "गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा" झि टाँकिज चँनल वर ह.भ.प.माधव महाराज कुरे यांना पाहायल विसरु नका



सोनपेठ चा आवाज अटकेपार अख्या जगात "गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा" झि टाँकिज चँनल वर ह.भ.प.माधव महाराज कुरे यांना पाहायल विसरु नका ! दि.4 डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी 7 ते 9 व दि.5 डिसेंबर शनिवार रोजी सकाळी 7 ते 9.सोनपेठ शहाराची वारकरी पंरंपरा तसेच सोनपेठ शहराचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर संस्थानच्या तसेच समस्थ वारकरी मंडळीच्या कृपा आशिर्वादानेच ह.भ.प.माधव महाराज कुरे यांचा अख्या महाराष्ट्रातुन शेकडो जनातुन तसेच परभणी जिल्ह्यातुन पन्नास स्पर्धकातुन निवड होऊन.झि टाँकिज अशा नवाजलेल्या चँनल द्वारे सोनपेठ शहराचा आवाज प्रथमच आटकेपार पोहचवल्या बद्दल ह.भ.प.माधव महाराज कुरे यांचे सर्व स्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.तरी आपन "गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा" झि टाँकिज चँनल वर ह.भ.प.माधव महाराज कुरे यांना पाहायल विसरु नका ! दि.4 डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी 7 ते 9 व दि.5 डिसेंबर शनिवार रोजी सकाळी 7 ते 9 वाजता पून्हा प्रेक्षकांना पाहाण्यास व श्रवन करण्यास भेटणार आहे.ह.भ.प.माधव महाराज कुरे यांनी सा.सोनपेठ दर्शनशी बोलताना सागीतले कि मला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी.मो.9823547752. 

पदवीधरसाठी उद्या सकाळी आठपासून मतदान ; जिल्ह्यात 32 हजार 715 मतदार बजावणार हक्क

पदवीधरसाठी उद्या सकाळी आठपासून मतदान ; जिल्ह्यात 32 हजार 715 मतदार बजावणार हक्क



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.एक) सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास सुरवात होणार आहे. जिल्ह्यात 78 मतदान केंद्र असून 32 हजार 715 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
दरम्यान, सोमवारी (दि.30) सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान प्रक्रियेसाठी अधिकारी व कर्मचारी साहित्य घेण्यासाठी दाखल झाले होते. दुपारी 78 मतदान केंद्रावरील नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी मतपेट्यांसह अन्य साहित्य घेऊन आपापल्या केंद्राकडे रवाना झाले.
जिल्ह्यात 6 हजार 770 महिला तर 25 हजार 945 पुरूष असे मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 30 क्षेत्रीय अधिकारी, 67 एकूण रूट गाईड, 374 मतदान अधिकारी,कर्मचारी, 100 सुक्ष्म निरीक्षक, 12 आरोग्य नोडल अधिकारी, 156 आरोग्य कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व मतदान केंद्रावर व्हीडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. 78 केंद्रावर वेबकास्टींग करण्यात येणार आहे. शिवाय मतदान केंद्रावर जाणा-या सर्व क्षेत्रीय अधिकारी, मतपेट्या असलेले वाहन व मतदान पथकाच्या वाहनास जीपीएस बसविण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रशासनाने दिली. 78 मतदान केंद्रावर 114 पोलिस कर्मचाऱी, 42 महिला पोलिस कर्मचारी तैणात करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात पाच पोलिस अधिकारी, 78 पोलिस कर्मचारी,78 होमगार्ड आदींचा बंदोबस्त असणार असून सेक्टर पेट्रोलिंगसाठी प्रत्येकी 19 पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्डची नियुक्ती करण्यात आल्याचीही माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी रात्री सर्व मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमा करून त्या औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या स्ट्रॉगरूमकडे रवाना करण्यात येणार आहेत.

परभणी जिल्हा व सोनपेठ पंचक्रोशितील बित्तम बातमी साठि सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752. 

Sunday, November 29, 2020

राकेश कुमार यांना भारतीय नागरिकत्व निर्गमित

राकेश कुमार यांना भारतीय नागरिकत्व निर्गमित



औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

पाकिस्तानी नागरीक राकेश कुमार यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नुकतेच एकनिष्ठतेची शपथ देऊन भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या पत्रान्वये राकेश कुमार यांच्या ऑनलाईन प्रस्तावास शासनाची मान्यता मिळालेली आहे. त्यांना नागरिकत्व कायदा 1955 च्या कलम 6 (1) अंतर्गत नागरिकत्व निर्गमित करण्यात आलेले आहे. 

सक्रीय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान नागरिकांनी घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घ्यावी - जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर

सक्रीय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान
नागरिकांनी घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घ्यावी - जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर  




परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्ह्यात सक्रीय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान 2020 राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेत कर्मचाऱ्यांमार्फत घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घेवून सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा समन्वय समितीची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य‍ि चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, आरोग्य सेवा संचालक श्रीमती डॉ.विद्या सरपे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.निरस कालीदास, जिल्हा माता संगोपन अधिकारी डॉ.सिरसुलवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खंदारे यांची उपस्थिती होती.

 जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर म्हणाले की, राज्यातील कोविड-19 च्या आपातकालीन परिस्थितीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील अनेक वर्षाच्या तुलनेत अत्यंत कमी झाले आहे. समाजातील सर्व क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन निदान निश्चितीनंतर औषधोपचार सुरु करणे अत्यंत महत्वाचे आहे. समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानूसार दि.1 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये सक्रीय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान 2020 हे राबविण्यात येत आहे. असे सांगून आशा व आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत कुष्ठरोगाबाबतची  शारीरिक तपासणी करुन घ्यावी व मोहिमेदरम्यान घरात उपस्थित नसलेल्या सदस्यांची संपुर्ण माहिती व मोबाईल क्रमांक आरोग्य कर्मचाऱ्याकडे द्यावा जेणेकरुन त्यांना संपर्क करुन त्यांची तपासणी करणे शक्य होईल. ही मोहीम शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी  केले.

बैठकीत आरोग्य सेवा (कुष्ठरोग) संचालक श्रीमती डॉ.विद्या सरपे यांनी अभियानाबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. 

संशयित कुष्ठरोगाची लक्षणे

त्वचेवर फीकट, लालसर चट्टा असणे, चट्यावरील त्वचा जाड होणे, चेहऱ्याची चकाकी अथवा तेलकट त्वचा, त्वचेवर गाठी येणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, डोळे पुर्णपणे बंद न होणे, नाकाचे हाड बसणे, हातापायाला मुंग्या येणे, त्वचेवर थंड किंवा गरम संवेदना न जाणवने, हात व पाय बधीर होणे, हाताला व पायाला अशक्तपणा येणे, हातापायाची बोटे वाकडी होणे व जखमा होणे इत्यादी आहेत.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 ; मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 ; मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

आगामी 1 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे.
                  छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे/पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे दि.10.11.2020 रोजीचे मुळ आदेश अंतिम राहतील,असे उप आयुक्त (सा.प्र.) तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 5-औरंगाबाद‍ विभाग पदवधीर मतदारसंघ औरंगाबाद यांनी कळविले आहे.

धनंजय मुंडे यांच्याकडे येणार परभणी पालकमंत्रीपदाची सूत्रे नवाब मलिक हटाव मोहिमेची पक्ष नेतृत्वाकडून दखल ; काही दिवसात अधिकृत घोषणेची शक्यता

धनंजय मुंडे यांच्याकडे येणार परभणी पालकमंत्रीपदाची सूत्रे नवाब मलिक हटाव मोहिमेची पक्ष नेतृत्वाकडून दखल ; काही दिवसात अधिकृत घोषणेची शक्यता
 

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षनेतृत्वाच्या कानावर पालकमंत्री नवाब मलिक यांच्याविषयी  नाराजी व्यक्त केल्यानंतर  आता  जिल्ह्याचे  पालकमंत्रीपद बदलण्याचे संकेत असून विद्यमान पालकमंत्री नवाब मलिक यांना हटवून धनंजय मुंडे यांची नियुक्ती पालकमंत्रीपदी केली जाणार असल्याचे वृत्त आहे. लवकरच या संदर्भातील घोषणा होईल असे कळते. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीत पालकमंत्री बदलाच्या मोहिमेने वेग घेतला होता.
        महायुतीच्या काळात शिवसेनेकडे पालकमंत्रीपद होते. महाविकास आघाडीच्या सरकारनंतर ज्या पक्षाचे जिल्ह्यात सर्वाधिक वर्चस्व त्या पक्षाचा पालकमंत्री असे सूत्र ठरले. त्यानुसार राष्ट्रवादीकडे पालकमंत्रीपद गेले. नवाब मलिक यांच्या रूपाने एक ज्येष्ठ मंत्री पालक म्हणून लाभल्यानंतर कार्यकर्त्यांची कामे मार्गी लागतील अशी भावना पक्षात निर्माण झाली. मात्र लवकरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नवनवे अनुभव यायला लागले. त्यातूनच नवाब मलिक यांच्याविषयीची नाराजी वाढत गेली.
        शिवसेनेकडे असलेल्या पालकमंत्रीपदाची सूत्रे राष्ट्रवादीकडे आल्यानंतर कार्यकर्त्यांना बळ मिळेल या आशेवर बसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काही दिवसातच भ्रमनिरास झाला. त्यातूनच पालकमंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध पक्षात  नाराजी दिसून आली. एक महिन्यापूर्वी अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी  जिल्हा दौर्‍यावर येऊन गेलेल्या नवाब मलिक यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एकही जबाबदार पदाधिकारी अथवा कार्यकर्ता फिरकला नाही. यावरून ही नाराजी किती टोकाची होती याची कल्पना यावी. जिल्ह्यात जिंतूर, पालम, गंगाखेड, सोनपेठ या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचे मोठे नुकसान झाले असताना पालकमंत्र्यांनी मात्र औरंगाबादहून परभणीकडे येताना रस्त्यातील काही निवडक एक -दोन ठिकाणी भेटी दिल्या. परभणीत आढावा घेऊन ते पाथरीमार्गे पुन्हा औरंगाबादकडे रवाना झाले होते. परतीच्या रस्त्यावरच काही गावांची त्यांनी पाहणी केली. यावरून या दौर्‍याची औपचारिकता लक्षात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांंची मोठी फौज आहे. एरवी ज्या पक्षाचा पालकमंत्री त्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा फौजफाटा दौर्‍यात पाहायला मिळतो. नवाब मलिक यांच्या एक महिन्यापूर्वीच्या दौर्‍यात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता औषधालाही सापडला नव्हता. तेव्हा ही नाराजी प्रकर्षाने समोर आली . 
        राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वाकडे जिल्ह्यातल्या स्थानिक नेत्यांनी सर्व परिस्थिती कानावर घातली. या आठवड्याच्या सुरुवातीला  पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी,  माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे  दोन-तीन दिवस मुंबईत तळ ठोकून होते. कार्यकर्त्यांच्या भावना स्थानिक नेत्यांनी पक्षनेतृत्वाच्या कानावर घातल्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या बाजूने पक्षाने कौल दिल्याचे समजते. त्यातूनच नवाब मलिक यांना हटवून धनंजय मुंडे किंवा संजय बनसोडे या दोघांपैकी एकाचे नाव गेल्या काही दिवसात चर्चेत होते. मात्र आता धनंजय मुंडे यांच्या नावाबाबत संमती झाल्याचे कळते.
राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाकडे फिरकलेही नाहीत.
नाव न सांगण्याच्या अटीवर राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने आपला रोष व्यक्त केला. कार्यकर्त्याने विकास प्रश्नावरचे कोणतेही काम पालकमंत्र्यांकडे नेल्यानंतर ते अतिशय तुच्छतेची वागणूक देतात, कार्यकर्त्यांच्या भावना कधी जाणून घेत नाहीत, आतापर्यंत ते केवळ स्वातंत्र्यदिन, मराठवाडा मुक्तीदिन या ध्वजारोहणाला आले.करोनाकाळात सुरुवातीला एकदा आले आणि त्यानंतर अतिवृष्टीच्या पाहणीचा फार्स त्यांनी उरकला. त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी काही घेणेदेणे नाही. त्यामुळे आम्हालाही त्यांच्याविषयी आस्था वाटण्याचे कारण नाही. आतापर्यंत त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पाऊल ठेवलेले नाही,असेही हा कार्यकर्ता म्हणाला.

जि.प.कें. प्रा.शा.नरवाडी येथे मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा

जि.प.कें. प्रा.शा.नरवाडी येथे मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा 



सोनपेठ (दर्शन) :-

जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा नरवाडी येथे संविधान दिन साजरा कोविड-१९ चे सर्व नियम पाळून जि.प.कें. प्रा.शा.नरवाडी येथे मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी श्री.बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे प्राथमिक शिक्षक यांच्या पाठीमागे सर्वांनी "भारताचे संविधान उद्देशिका"याचे वाचन केले.शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री.खंडापूरे के.यू. यांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उपस्थित शिक्षक मित्र,विद्यार्थी मित्र , गावकऱ्यांचे श्री. बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे प्राथमिक शिक्षक यांनी आभार मानले.

ऑनलाईन मतदार यादीमध्ये नविन मतदार बंधू -भगिणींनी नावे ऑनलाईन करावीत

ऑनलाईन मतदार यादीमध्ये नविन मतदार बंधू -भगिणींनी नावे ऑनलाईन करावीत 




सोनपेठ (दर्शन) :-

जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा नरवाडी येथील श्री.बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे प्राथमिक शिक्षक मौजे.नरवाडी - ३५२ व ३५३ बी.एल.ओ.यांनी ऑनलाईन मतदार यादीमध्ये नाव कसे भरावे तसेच मतदार यादीमधील दुरुस्ती वगैरे कशी करावी याचे मार्गदर्शन श्री.तुळशीराम गांगर्डे मा.अध्यक्ष शा.व्य.स. नरवाडी व गावकरी मंडळींना केले,तसेच दि.१५ डिसेंबर २०२०पर्यंत नविन मतदार बंधू -भगिणींनी नावे ऑनलाईन करावीत असे आव्हान श्री.बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे बी.एल.ओ. नरवाडी यांनी सर्व गावकरी मंडळींना केले आहे .

जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा

जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा



सोनपेठ (दर्शन) :-

जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा नरवाडी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन कोविड-१९ बाबत सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला ..... ! यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री.खंडापूरे के.यू. यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला...... ! श्री.बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे प्राथमिक शिक्षक यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या धगधगत्या जीवनपटावर प्रकाश टाकला यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र व गावकऱ्यांचे श्री. बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे यांनी आभार मानले .

चव्हाण सतीश भानुदासराव - १ पहील्या पसंतीचे मतदान देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे अवाहन

चव्हाण सतीश भानुदासराव - १ पहील्या पसंतीचे मतदान देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे अवाहन




सोनपेठ (दर्शन) :-
 
मराठवाडा पदवीधर निवडणुकीचे महाविकासआघाडीचे अधिकृत उमेदवार "सतीशभाऊ चव्हाण" यांच्या प्रचारार्थ उखळी ता. सोनपेठ येथे मतदारसंघाची संवाद साधला व पोलचिठचे वाटप केले.चव्हाण सतीश भानुदासराव - १ पहील्या पसंतीचे मतदान देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे अवाहन राजेशदादा विटेकर यांनी केले.

Saturday, November 28, 2020

पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी बोराळकरांना विजयी करा- शिवाजीराव मव्हाळे यांचे आवाहन

पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी बोराळकरांना विजयी करा- शिवाजीराव मव्हाळे यांचे आवाहन
सोनपेठ तालुक्यातील पदवीधर मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी व संपर्काने बोराळकरांना प्रथम पसंती


सोनपेठ (दर्शन) :-
 
राज्यातील आघाडी सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नाही.  शेतकरी, बेरोजगार तरूण, आरक्षणा सारखे प्रश्न अजूनही सुटले नाहीत, त्यामुळे पदवीधरांच्या प्रश्नांना खरा न्याय मिळवून द्यायचा असेल तर शिरीष बोराळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन भाजपचे परभणी( ग्रामीण)जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांनी केले आहे.
      मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपा मित्रपक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ सोनपेठ तालुक्यातील चारही मंडळात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली असुन पदवीधर मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन बोराळकर यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजप पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. मतदारांच्या गृहभेटी घेऊन बोराळकर यांच्या विजयासाठी सर्वशक्तीनिशी भाजप कार्यकर्त्ते कामाला लागले असल्याचे शिवाजीराव मव्हाळे यांनी सांगितले.
      या प्रचार दौर्यात भाजपचे परभणी( ग्रामीण) जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांच्या सह जेष्ठ नेते रमाकांत जाहगिरदार,तालुका अध्यक्ष  सुशील रेवडकर,अशोक खोडवे,संतोष दलाल आदीसह पदाधीकारी सहभागी झाले होते.

Thursday, November 26, 2020

अव्वाच्या सव्वा वीजबिलां विरुद्ध जिल्हा कचेरीवर मनसेचा धडक मोर्चा

अव्वाच्या सव्वा वीजबिलां विरुद्ध जिल्हा कचेरीवर मनसेचा धडक मोर्चा


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

लॉकडाऊनसह अनलॉकच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना अव्वा की सव्वा बिले वितरित करणार्‍या वीज वितरण कंपनीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गुरूवारी (दि.26) जिल्हा कचेरीवर जोरदार धडक मोर्चा काढला.
कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात मोठमोठ्या रकमेची वीज बिले सर्वसामान्यांच्या माथी मारली. वीज बिले भरण्याबाबत सक्ती सुरू केली.झिझिया करासारखी आकारणी करीत या सरकारने ग्राहकांना सळो की पळो करून सोडले, असा आरोप मोर्चेकर्‍यांनी केला. उर्जामंत्र्यांची भेट घेतल्यानंतरसुध्दा काही सकारात्मक पावले उचलल्या जातील,असे अपेक्षित होते.परंतु शंभर युनिटपर्यंत वीजदेयकांमध्ये सवलत देऊ,अशी भाषा करणार्‍या उर्जामंत्र्यांनी घुमजाव केला.वीज बिले भरलीच पाहिजेत, कोणतीही सवलत मिळणार नसल्याची भाषा सुरू केली. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांचा संयम सुटला आहे, असे मोर्चेकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनातून नमुद केले.काही झाले तरी ही वाढीव वीज बिले भरू नका, असे आवाहनही यावेळी नागरिकांना केले. असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारलाही जनततेतील असंतोष जाणवणार नाही, सरकार तुमच्या विजेची जोडणी तोडू शकत नाही आणि जर तसा प्रयत्न केला तर मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल, असाही इशारा या मोर्चेकर्‍यांनी दिला.यावेळी रुपेश देशमुख,शेख राज,गणेश सुरवसे,श्रीनिवास लाहोटी,गुलाबराव रोडगे,राहूल कनकदंडे,गणेश भिसे,लक्ष्मणराव रेंगे, यादव महात्मे, अर्जुन टाक यांच्यासह अन्य पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी गुरुवारी जोरदार घोषणाबाजी करीत संपूर्ण बाजारपेठ दणाणून सोडली.


सा.सोनपेठ दर्शन सबसे तेज आँनलाईन न्युज आपके हात अडुटाईज & न्युज के लिए संपर्क मो.9823547752. संपादक किरण रमेश स्वामी.

Wednesday, November 25, 2020

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार 3 लाख 74 हजार 45 मतदार तर 813 मतदान केंद्र

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार 3 लाख 74 हजार 45 मतदार तर 813 मतदान केंद्र
औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 
मराठवाड्यात दि. 01 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी विभागातील आठ जिल्ह्यात एकूण 3 लाख 74 हजार 45 मतदार असून मतदानासाठी एकूण 813 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्हानिहाय मतदार व मतदान केंद्रांची संख्या पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्रांची संख्या कंसात दर्शविली आहे. 1) औरंगाबाद- 106379 (206) 2) जालना-29765 (74) 3) परभणी - 32681 (78) 4) हिंगोली - 16764 (39) 5) नांदेड - 49285 ( 123) 6) बीड- 64349 (131) 7) लातूर - 41190 (88)8) उस्मानाबाद - 33632 (74). अशी माहिती निवडणूक शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनी दिली आहे.

राज्य स्तरीय काव्यभूषण व समाजभूषण गौरव पुरस्काराने प्रा.गोविंद लहाने सन्मानित

राज्य स्तरीय काव्यभूषण व समाजभूषण गौरव पुरस्काराने प्रा.गोविंद लहाने सन्मानित



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा गोविंद त्रिंबकराव लहाने यांना भजनसम्राट ह भ प स्व विठोबा अ मरवडे सामाजिक प्रतिष्ठान रायगड च्या वतीने साहित्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य स्तरीय काव्यभूषण पुरस्कार व समाजभूषण गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 
      प्रा गोविंद लहाने हे येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असून ते आपल्या शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक, संस्कृतीक कार्यातही नेहमी सहभागी असतात. त्याच बरोबर ते साहित्य क्षेत्रातही एक प्रसिद्ध कवी म्हणून प्रसिद्ध आहेत .त्याच्या सामाजिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आता पर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच रायगड येथील भजनसम्राट ह भ प स्व विठोबा अ मरवडे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यंदाच्या आॅनलाईन राज्य स्तरीय काव्यभूषण पुरस्काराने व सामाजिक कार्यातील सहभागाची दखल घेऊन यंदाच्या राज्य स्तरीय सामाजभूषण गौरव पुरस्काराने आॅनलाईन पद्धतीने दि 25/11/2020 रोजी सन्मानीत करण्यात आले. रायगड येथील मरवडे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने प्रा गोविंद लहाने यांना एकाच वेळी दोन्ही पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

सिरोरी येथे समृध्दी फाऊंडेशन च्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न

सिरोरी येथे समृध्दी फाऊंडेशन च्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न




सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ तालुक्यातील मौजे सिरोरी येथे समृध्दी फाऊंडेशन च्या वतीने आरोग्य शिबिरात डॉ.प्रसाद यादव [बालरोग तज्ञ औरंगाबाद MD MS] यांच्या हस्ते शिशु वर्ग आणि लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.याप्रसंगी प्रल्हाद सावळे, सुरेश यादव, दयानंद यादव, सिद्धांत सावळे, संतोष यादव, शबिर शेख, किशन काकरवर आदीजन उपस्थीत होते. 

Friday, November 20, 2020

प्रा.गोविंद लहाने यांना बेटी फाउडेंसन चा आंतरराष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कार-2020 जाहीर

प्रा.गोविंद लहाने यांना बेटी फाउडेंसन चा आंतरराष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कार-2020 जाहीर 




सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा गोविंद लहाने यांना बेटी फाउडेंसन च्या वतीने साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आंतराष्ट्रीय साहित्यभूषण पुरस्कार -2020जाहीर. 

          प्रा गोविंद लहाने हे येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात कार्येरत असून ते आपल्या शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही सहभागी असतात. त्याच बरोबर ते साहित्य क्षेत्रातही एक प्रसिद्ध कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याअनेक कविता विविध प्रातिनिधिक काव्य संग्रहातून प्रकाशित झाल्या आहेत तर त्यांचा दुहिता चारोळी कविता संग्रह प्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे .यांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे. तर त्यांनी आता पर्यंत अनेक कवीसंमेलनात सहभागी होवून आपल्या कविता सादर केल्या. तर अनेक काव्य वाचन व काव्य लेखन स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या काव्य लेखन व काव्य लेखनाचा ठसा उमटविला आहे. त्यांना आता पर्यंत 1)कविरत्न  पुरस्कार  2)म.फुले आदर्श शिक्षक पुरस्कार  3)सोनपेठ रोटरी क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार  4) आदर्श शिक्षक समितीचा राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार  5) एकता समितीचा समाजरत्न पुरस्कार  असे अनेक मिळाले आहेत. तर त्यांनी भूतान पर्यावरण अभ्यास दौरा ही केला आहे. तर लाँकडाऊन च्या काळात त्यांनी अनेक काव्य वाचन व काव्य लेखन स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या कवितेला  राज्य, देश व जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवली आहे.    त्यांच्या या कार्याची दखल घेऊन बेटी फाउडेंसन महाराष्ट्र (वणी, जी. यवतमाळ) च्या वतीने आंतरराष्ट्रीय साहित्यभूषण पुरस्कारासाठी निवड केली असून हा पुरस्कार 22 नोव्हेंबर रोजी दिला जाणार आहे  .त्यांच्या निवडी बदल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Thursday, November 19, 2020

सोनपेठ तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षन जाहीर ; कहीं खुशी,कहीं गम

सोनपेठ तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षन जाहीर ; कहीं खुशी,कहीं गम




सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातील 42 ग्रामपंचायत चे सरपंच पदाचे आरक्षन दि.19 नोव्हेंबर 2020 तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले.1) वाणीसंगम सर्वसाधारण महीला,2) पोहंडुळ सर्वसाधारण,3) दुधगाव सर्वसाधारण महीला,4) गवळी पिंपरी नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओ.बि.सी.),5) उक्कडगाव मक्ता सर्वसाधारण महीला,6) थडी उक्कडगाव नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला (ओ.बि.सी.महीला),7) गंगापिंपरी सर्वसाधारण महीला,8) मोहळा सर्वसाधारण महीला,9) करम सर्वसाधारण,10) वंदन नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला (ओ.बि.सी.महीला),11) आवलगाव नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओ.बि.सी.),12) धामोणी सर्वसाधारण,13) चुकारपिंपरी सर्वसाधारण महीला,14) उखळी सर्वसाधारण,15) वाडीपिंपळगाव सर्वसाधारण महीला,16) डिघोळ ई.नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला (ओ.बि.सी.महीला),17) नैकोटा सर्वसाधारण महीला,18) लासीना नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओ.बि.सी.),19) शिर्शी बू.सर्वसाधारण,20) वडगाव नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला (ओ.बि.सी.महीला),21) खपाट पिंपरी सर्वसाधारण महीला,22) शिरोरी नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला (ओ.बि.सी.महीला),23) निळा सर्वसाधारण महीला,24) वैतागवाडी सर्वसाधारण,25) सायखेडा सर्वसाधारण,26) विटा खु. सर्वसाधारण,27) कोरटेक सर्वसाधारण,28) कान्हेगाव सर्वसाधारण,29) नरवाडी आनुसुचीत जाती महीला,30) खडका आनुसुचीत जाती,31) थडीपिंपळगाव आनुसुचीत जाती,32) धार डिघोळ आनुसुचीत जाती,33) शेळगाव अनुसुचीत जाती महीला,34) बोंदरगाव सर्वसाधारण,35) तिवठाना आनुसुचीत जाती महीला,36) भिसेगाव नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला (ओ.बि.सी.महीला),37) लोहीग्राम सर्वसाधारण महीला,38) निमगाव सर्वसाधारण महीला,39) कोठाळा सर्वसाधारण,40) पारधवाडी सर्वसाधारण महीला,41) बुक्तरवाडु सर्वसाधारण महीला,42) देवीनगर तांडा नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओ.बि.सी.).यावर भावी उमेदवारांमधे कहीं खुशी,कहीं गम दिसुन येत आहे.अशी माहीती सोनपेठ तहसीलदार डाँ.आशिषकुमार बिरादार यांच्या स्वाक्षरी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सा.सोनपेठ दर्शन ला दिली.याप्रसंगी निवडणुक विभागाचे जे.डी.वाघमारे, सय्यद ईस्सा,अशोक जामोदे आदिंनी परीश्रम घेतले.

सा.सोनपेठ दर्शन पंचक्रोशितील सर्व बीत्तम बातमी केवळ येथेच संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752 .

Tuesday, November 17, 2020

35 उमेदवार रिंगणात, रमेश पोकळे यांची बंडखोरी ; औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक

35 उमेदवार रिंगणात, रमेश पोकळे यांची बंडखोरी ; औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक
 
औरंगाबाद  / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ  निवणुकीत आज उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या दिवशी 10 उमेदवारीनी  माघार घेतली असून, एकूण 35 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 


या निवडणुकीसाठी एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पैकी 8 जणांचे अर्ज अवैध ठरले होते.वैध ठरलेल्या 45 अर्जांपैकी 10  उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत. 

अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे 

 1) अक्षय नवनाथराव खेडकर, औरंगाबाद 2) ईश्वर आनंदराव मुंडे, बीड 3) अंभोरे शंकर भगवान, औरंगाबाद 4) जयसिंगराव गायकवाड पाटील, औरंगाबाद 5) प्रविणकुमार विष्णु पोटभरे, बीड 6) विजेंद्र राधाकिसन सुरासे, जालना 7) विवेकानंद शशीकांत उजळंबकर, लातूर 8) शेख गुलाम रसुल कठ्ठु, औरंगाबाद 9)  संजय शहाजी गंभीरे ,बीड 10) संदिप बाबुराव कराळे, नांदेड.


एकूण 35 उमेदवार रिंगणात 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी एकूण 35 उमेदवार निवडणूक लढविणार आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 

1) बोराळकर शिरीष (पक्ष : भारतीय जनता पाटी) औरंगाबाद 2) सतीश भानुदासराव चव्हाण (पक्ष: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) औरंगाबाद 3) अब्दुल रऊफ (पक्ष : समाजवादी पार्टी) औरंगाबाद 4) अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष : राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर 5) कुणाल गौतम खरात (पक्ष : ऑल इंडिया मजलिस ए इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद 6) ढवळे सचिन राजाराम (पक्ष : प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद 7) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष : वंचित बहुजन आघाडी) परभणी 8) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष : आम आदमी पार्टी) पुणे 9) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष : वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी 10) सचिन अशोक निकम (पक्ष : रिपब्लिकन सेना) औरंगाबाद 11) अशोक विठ्ठल सोनवणे (पक्ष : अपक्ष ) औरंगाबाद 12) ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ' के.सागर ' (पक्ष : अपक्ष ) नांदेड 13) आशिष आशोक देशमुख (पक्ष : अपक्ष) बीड 14) उत्तम बाबुराव बनसोडे (पक्ष : अपक्ष) नांदेड 15) काजी तसलीम निजामोद्दीन (पक्ष : अपक्ष) उस्मानाबाद 16) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 17) ॲड.गणेश नवनाथ करांडे (पक्ष : अपक्ष) बीड 18) घाडगे राणी रवींद्र (पक्ष : अपक्ष) बीड 19) दिलीप हरिभाऊ घुगे (पक्ष : अपक्ष), हिंगोली 20) पोकळे रमेश शिवदास (पक्ष : अपक्ष) बीड 21) भारत आसाराम फुलारे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 22) ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष : अपक्ष) परभणी 23) रमेश साहेबराव कदम (पक्ष : अपक्ष) नांदेड 24) राम गंगाराम आत्राम (पक्ष : अपक्ष) लातूर 25) वसंत संभाजी भालेराव (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 26) विलास बन्सीधर तांगडे (पक्ष : अपक्ष) जालना 27) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 28) विशाल उध्दव नांदरकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 29) ॲड.शरद बहिणाजी कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 30) ॲड.शहादेव जानू भंडारे (पक्ष : अपक्ष) बीड 31) ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 32) शेख हाज्जू हुसेन पटेल (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 33) समदानी चॉदसाब शेख (पक्ष : अपक्ष) नांदेड 34) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 35) संजय तायडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद.

रमेश पोकळे यांची बंडखोरी कायम 


भाजपचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी माघार घेतली आहे पण त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे तर भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी बंडखोरी करून आपला अर्ज कायम ठेवला आहे. पोकळे हे माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. 

चव्हाण - बोराळकर यांच्यात लढत 

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत एकूण ३५ उमेदवार रिंगणात उतरले असले तरी खरी लढत विद्यमान आमदार सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यात होणार आहे.जयसिंगराव गायकवाड यांची नाराजी आणि रमेश पोकळे यांची बंडखोरी बोराळकर यांना अडचणीची ठरणार आहे. 

Friday, November 13, 2020

पंडित जवाहरलाल नेहरु यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

पंडित जवाहरलाल नेहरु यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



परभणी / सोनपेठ (दर्शन) :– 

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे एकनाथ मुजमुले, यांच्यासह  अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करुन पंडित जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन केले. 



                                               

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020छाननीअंती एकूण 53 उमेदवारांपैकी 45 अर्ज वैध तर 8 अर्ज अवैध


औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020छाननीअंती एकूण 53 उमेदवारांपैकी 45 अर्ज वैध तर 8 अर्ज अवैध 


औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन):- 

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2020 च्या अनुषंगाने  शुक्रवार, दि.13 नोव्हेंबर 2020 रोजी मतदारसंघातील एकूण 53 प्राप्त नामनिर्देशनपत्राच्या छाननी अंती 45 अर्ज वैध ठरले असून 8 अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.  
वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) बोराळकर शिरीष (पक्ष : भारतीय जनता पाटी) औरंगाबाद 2) सतीश भानुदासराव चव्हाण (पक्ष: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) औरंगाबाद 3) अब्दुल रऊफ (पक्ष : समाजवादी पार्टी) औरंगाबाद 4) अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष : राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर 5) कुणाल गौतम खरात (पक्ष : ऑल इंडिया मजलिस ए इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद 6) ढवळे सचिन राजाराम (पक्ष : प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद 7) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष : वंचित बहुजन आघाडी) परभणी 8) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष : आम आदमी पार्टी) पुणे 9) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष : वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी 10) सचिन अशोक निकम (पक्ष : रिपब्लिकन सेना) औरंगाबाद 11) अशोक विठ्ठल सोनवणे (पक्ष : अपक्ष ) औरंगाबाद 12) ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ' के.सागर ' (पक्ष : अपक्ष ) नांदेड 13) अक्षय नवनाथराव खेडकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 14) आशिष आशोक देशमुख (पक्ष : अपक्ष) बीड 15) ईश्वर आनंदराव मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 16) उत्तम बाबुराव बनसोडे (पक्ष : अपक्ष) नांदेड 17) अंभोरे शंकर भगवान (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 18) काजी तसलीम निजामोद्दीन (पक्ष : अपक्ष) उस्मानाबाद 19) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 20) ॲड.गणेश नवनाथ करांडे (पक्ष : अपक्ष) बीड 21) घाडगे राणी रवींद्र (पक्ष : अपक्ष) बीड 22) जयसिंगराव गायकवाड पाटील (पक्ष : अपक्ष), औरंगाबाद 23) दिलीप हरिभाऊ घुगे (पक्ष : अपक्ष), हिंगोली 24) पोकळे रमेश शिवदास (पक्ष : अपक्ष) बीड 25) प्रवीणकुमार विष्णु पोटभरे (पक्ष : अपक्ष) बीड 26) भारत आसाराम फुलारे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 27) ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष : अपक्ष) परभणी 28) रमेश साहेबराव कदम (पक्ष : अपक्ष) नांदेड 29) राम गंगाराम आत्राम (पक्ष : अपक्ष) लातूर 30) वसंत संभाजी भालेराव (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 31) विजेंद्र राधाकृष्ण सुरासे (पक्ष : अपक्ष) जालना 32) विलास बन्सीधर तांगडे (पक्ष : अपक्ष) जालना 33) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 34) विवेकानंद शशीकांत उजळंबकर (पक्ष : अपक्ष) लातूर 35) विशाल उध्दव नांदरकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 36) ॲड.शरद बहिणाजी कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 37) ॲड.शहादेव जानू भंडारे (पक्ष : अपक्ष) बीड 38) ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 39) शेख गुलाम रसूल कठ्ठु (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 40) शेख हाज्जू हुसेन पटेल (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 41) समदानी चॉदसाब शेख (पक्ष : अपक्ष) नांदेड 42) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 43) संजय तायडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 44) संजय शहाजी गंभीरे (पक्ष : अपक्ष) बीड 45) संदीप बाबुराव कराळे (पक्ष : अपक्ष) नांदेड. 

अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) अतुल राजेंद्र कांबळे 2) छाया सोनवणे 3) सुनील महाकुंडे 4) प्रविण घुगे 5) प्रदिप चव्हाण 6) विजयश्री बारगळ 7) बळीराम केंद्रे 8) शेख फेरोजमीया खालेद. 

सा.सोनपेठ दर्शन सबसेतेज न्युज आँनलाईन
आपके हात पहीला पसंती क्रंमाक देताना संपुर्ण नाव पाहुनच मतदान करा.


Thursday, November 12, 2020

कै.र.व.महाविद्यालयात सोनपेठ दीक्षारंभ ; विद्यार्थी प्रेरण कार्यक्रम संपन्न

कै.र.व.महाविद्यालयात सोनपेठ दीक्षारंभ ; विद्यार्थी प्रेरण कार्यक्रम संपन्न


सोनपेठ (दर्शन ) :-

सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे पदवीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षी covid-19 परिस्थितीमुळे महाविद्यालयात विद्यार्थी येत नसल्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन युजीसी व विद्यापीठाच्या निर्देशानुसार ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. विद्यार्थी प्रेरण कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी IQAC समन्वयक डॉ मुकुंदराज पाटील यांनी  विद्यार्थी प्रेरण कार्यक्रम आयोजनामागची पार्श्वभूमी मांडली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते यांनी महाविद्यालयात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच त्यांनी यूजीसी व मानव संसाधन विकास मंत्रालय यासंबंधी माहिती विद्यार्थ्यांना दिली.
5 ते 10 नोव्हेंबर दरम्यान  चाललेल्या या विद्यार्थी प्रेरण कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील सोळा प्राध्यापकांनी एकोणतीस विषयावर व्हिडिओ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयात चालणाऱ्या विविध उपक्रमाबरोबरच विविध समित्या व विभागांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्यांची जोपासना व्हावी यासाठी सामाजिक मुल्यावरील व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले होते. 
कार्यक्रम पाहण्यासाठी https://www.youtube.com/channel/UChYKbDHAn69-w7RGsfjRvXw 
या या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.मुकुंदराज पाटील व प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ.संतोष रणखांब व सर्व‌ प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Wednesday, November 11, 2020

औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी 14 नामनिर्देशनपत्र दाखल

औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी 14 नामनिर्देशनपत्र दाखल


औरंगाबाद / परभणी / सोनपेठ  (दर्शन) :- 
05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता आज दि.11 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत 14 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आजपर्यंत एकूण 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांचे नाव : 1) ईश्वर आनंदराव मुंडे, (पक्ष : अपक्ष), रा.गांजपूर पो.उदंरी, ता.धारुर, जि.बीड, 2) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ, (पक्ष :वंचित बहुजन आघाडी) मु.पो.कातेश्वर, ता.पुर्णा, जि.परभणी, 3) संजय तायडे, (पक्ष :अपक्ष), औरंगाबाद, 4) अतुल राजेंद्र कांबळे (पक्ष : रिपब्लीकन सेना), मु.पो.अंकुशनगर, महाकाळा ता.अंबड, जि.जालना 5) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष : अपक्ष), मु.पो.नंदागौळ, ता.परळी, जि.बीड 6) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष : अपक्ष), मु.पो.अंतरवाली (खांडी), ता.पैठण, जि.औरंगाबाद 7) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे, (पक्ष : अपक्ष), औरंगाबाद 8) बोराळकर शिरीष (पक्ष : भारतीय जनता पार्टी), औरंगाबाद 9) ढवळे सचिन राजाराम (पक्ष : प्रहार जनशक्ती पक्ष), औरंगाबाद 10) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष : अपक्ष) पुणे 11) आशिष आशोक देशमुख (पक्ष : अपक्ष), मु.पो.खडकीघाट, ता.जि.बीड 12) दिलीप हरीभाऊ घुगे, (पक्ष : अपक्ष), मु.पो.कोयळज, पो.हिंगोली, ता.हिंगोली, जि.हिंगोली 13) पोकळे रमेश शिवदास (पक्ष : अपक्ष) मु.चांदेगावक पो.पोथरा, ता.जि.बीड 14) रमेश साहेबराव कदम (पक्ष : अपक्ष) मु.पो.सिंगारवाडी ता.किनवट, जि.नांदेड यांनी प्रत्येकी एक तर सिध्देश्वर आत्माराम मुंडे व डॉ.विलास गोवर्धन जगदाळे यांनी प्रत्येकी 02 उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविली आहे.

सोनपेठ पंचक्रोशितील बातम्या व जाहीरातीसाठि संपादक किरण रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

निवडणूक प्रचारासाठी सोशल मिडियाचा गैरवापर करणाऱ्यावर होणार कारवाई - जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर

निवडणूक प्रचारासाठी सोशल मिडियाचा
गैरवापर करणाऱ्यावर होणार कारवाई - जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर
 
परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

05-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाकरीता निवडणूकीत भाग घेतलेल्या  उमेदवार  व  राजकीय पक्षांच्या पेड न्यूजवर चोख लक्ष ठेवून दैनंदिन प्रसिध्द होणाऱ्या मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि समाज (सोशल मिडिया) माध्यमातील संशयित पेड न्यूज किंवा इलेक्ट्रॉनिक आणि समाज (सोशल मिडिया) माध्यमातील प्रमाणित करुन न घेतलेल्या जाहिराती प्रसिध्दी झाल्याचे निदर्शनास आल्यास कार्यवाही करुन संबंधितास नोटीस देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दी. म.मुगळीकर यांनी दिले.
     मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 05-औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक -2020 च्या अनुषंगाने आदर्श आचार सहिंतेचा भंग होवू नये, यासाठी  माध्यम  प्रमाणन  व  सनियंत्रण  समिती  (मिडीया  सर्टिफिकेशन  ॲन्ड मॉनीटरींग कमिटी) स्थापन करण्यात आली आहे. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि समाज (सोशल मिडिया) माध्यमाचा प्रचार-प्रसिध्दी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या गैरवापरावर आणि पेड न्यूजवर ही समिती लक्ष ठेवणार आहे. याकरीता 05-औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक-2020 कालावधीत समितीचे सदस्यांची वेळोवेळी बैठक बोलवून मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल माध्यमातील प्रसिध्द होणाऱ्या वृत्त आणि जाहिरातींबाबत वेळोवळी आढावा घेवून आचार संहितेचा भंग करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिल्या आहेत.
    निवडणूकीतील सर्व उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमात (सोशल मिडिया) सर्व प्रकारच्या जाहिराती प्रसिध्दी करण्यापूर्वी सदर जाहिराती माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती (मिडीया सर्टिफिकेशन ॲन्ड मॉनीटरींग कमिटी) यांच्यामार्फत प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच प्रमाणित न करता प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीबाबत संबंधितावर कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्‌ह्यातील वर्तमान पत्रामध्‍ये प्रसिध्द होणाऱ्या बातम्या, लेख तसेच समाज माध्‍यमांतील व्हॉट्स अॅप ग्रुपवरील विनापरवानगी पोस्ट, मोबाईलद्वारे बल्क एस.एम.एस. अथवा प्रचार करणाऱ्या तसेच सेवा पुरवणाऱ्या संस्थावर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्‍हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दी. म.मुगळीकर यांनी दिल्या.