Thursday, October 31, 2019

श्री महालिंगेश्वर विद्यालयाच्या माझी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन वर्ग भरला तेवीस वर्षानंतर

श्री महालिंगेश्वर विद्यालयाच्या माझी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन वर्ग भरला तेवीस वर्षानंतर

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर विद्यालयात इसवी सन 1996 यावर्षी इयत्ता दहावी वर्गात असणाऱ्या एकूण 90 विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा नुकताच पार पडला.शहरातील नामांकित कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय येथे 23 वर्षांनंतर  अतिशय हर्षोउल्हासत संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी शामराव मोहरीर, नंदकुमार स्वामी, ज्ञानोबा गव्हाणे, वसंत चिलवंत,पंढरीनाथ जोशी तत्कालिन परिचर रविंद्र शेटे, सुधाकर तांदळे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीमाई व महात्मा फुले यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले.यानंतर दिवंगत सौ.श्रीदेवी माणिकराव निलंगे मॅडम व इतर मयतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यानंतर माझी विद्यार्थ्यांनी सर्वच मान्यवरांचा सत्कार 'एक झाड एक पुस्तक' देऊन केला.23 वर्षापूर्वीच्या आठवणीत रंगलेले सर्व विद्यार्थी त्यांच्या त्या वेळच्या शिक्षकांसह आनंदी दिसून आले. प्रत्येक मुलगा वर्गात असताना पुढे काय होईल?असं त्यांच्या गुरुजींनाही वाटलं नव्हतं.हेच विद्यार्थी आज याच वर्गातील विद्यार्थी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं कर्तव्य बजावत आहेत. यावेळी त्यांचे शिक्षकही या स्नेहमीलन मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,जीवनामध्ये शिक्षणाशिवाय आपल्या उद्धाराचे दुसरे कोणतेच साधन नाही. उत्तम शिक्षण वर्तनात आणल्यास आपले जीवनमान आनंदी बनवेल. या शिक्षणामुळे स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचे कुटुंब उभा करता आले. त्यानंतर सामाजिक जाणिवेच्या भावनेतून समाजातील गरजू व्यक्तींना ही मदत करता येते. माणसाने आयुष्यभर सतत शिकलं पाहिजे.आपल्या प्रगतीचा मार्ग ही आपल्या वर्गमित्रांत व्यक्त  केला. कदाचित येणाऱ्या पिढीलाही आपला संघर्ष जीवनाची नवी वाट दाखवेल असेही अनेक विद्यार्थ्यांनी मनोगतातून व्यक्त होताना सांगितले.याच वर्ग मित्रातील अनेक जण आज समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, कुणी वाहन निरीक्षक,कुणी शिक्षक, कुणी व्यापार क्षेत्रात, कुणी शैक्षणिक क्षेत्रात तर शेतीमध्ये नावलौकिक मिळवून आनंदी आयुष्य जगत आहेत. आपल्या वाट्याला आलेला संघर्ष येणाऱ्या पिढीला येऊ नये. म्हणून आज जमलेली 23 वर्षानंतर एकत्र आलेली ही मुलं त्यांच्या शिक्षकांसमोर  संघर्ष कहानी सांगत होते.या माझी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन कार्यक्रमाप्रसंगी सर्वांच्यावतीने ग्रंथवाचन चळवळ,सोनपेठ यांना ग्रंथदान करण्यात आले. वर्गमित्र महेश जाधव (ग्रंथवाचन चळवळ, उपाध्यक्ष) यांनी ग्रंथदान स्वीकारले. या वर्गमित्रांच्यावतीने त्यांची वर्गमैत्रिण कौसा राठोड हिच्यासाठी एक हात मदतीचा म्हणून आर्थिक मदत करण्याचेही ठरवण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता पवार तर आभार प्रदर्शन संदिप रेड्डी यांनी केले.याप्रसंगी प्रमुख परमेश्वर कदम, अशोक जाधव, शिवराज राऊत, शिवप्रसाद तापडिया,केदार वलसेटवार, निवृत्ती गव्हाणे, अनंता सोलापूरकर व सर्व माझी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन हे स्नेहमिलन 23 वर्षाने घडवून आणले.

Wednesday, October 23, 2019

स्ट्रॉगरुमच्या 100 मीटर परीसरात प्रवेशास निर्बंध ; 98 - पाथरी शासकीय तंत्र निकेतन ( ITI ) , विटा रोड पाथरी मतमोजणी

स्ट्रॉगरुमच्या 100 मीटर परीसरात प्रवेशास निर्बंध ; 98 - पाथरी शासकीय तंत्र निकेतन ( ITI ) , विटा रोड पाथरी मतमोजणी

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

भारत निवडणूक आयोगाने  विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केला असुन दिनांक , 21 सप्टेंबर 2019 पासुन आदर्श आचारसंहीता लागु केली आहे . परभणी जिल्हयात खालील ठिकाणी विधानसभा मतदार संघ निहाय सुरक्षा कक्ष ( Strong room ) स्थापन करण्यात आले आहेत , दिनांक . 21  ऑक्टोबर 2019 रोजी मतदान प्रक्रीया पार पडल्या नंतर सर्व मतदान यंत्र ( इव्ही एम ) सुरक्षित ठेवण्यासाठी 1 ) 95 - जिंतूर , शासकीय तंत्र निकेतन ( ITI )  औंढा रोड जिंतूर , 2 ) 96 -परभणी , कृषि अभियांत्रीकी महाविदयालय , वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी , 3 ) 97- गंगाखेड , संत जनाबाई महाविद्यालय , कोद्री रोड गंगाखेड 4 ) 98 - पाथरी शासकीय तंत्र निकेतन ( ITI ) , विटा रोड पाथरी या ठिकाणी दिनांक , 24 ऑक्टोबर , 2019 रोजी मतमोजणीची प्रक्रीया पार पडणार आहे . त्यामुळे सदरील स्ट्रॉगरुमचे 100 मिटरचे परीसरात कोणत्याही व्यक्तीस / वाहनास / फेरीवाल्यास प्रवेश करण्यास , तसेच तात्पुरती किरकोळ मालाची दुकाने / खादयगृह थाटण्यावर निबंध घालणे आवश्यक असल्याबाबत माझी खात्री झालेली आहे . त्याअर्थी परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी . शिवशंकर यांनी फौजदारी व्यवहार प्रक्रिया 1973 चे कलम 144 मधील प्राप्त अधिकाराचा वापर करुन उपरोक्त नमुद ठिकाणी स्थापन केलेल्या स्ट्रॉगरुमच्या 100 मिटरचे परीसरात कोणत्याही व्यक्तीस / वाहनास / फेरीवाल्यास प्रवेश करण्यास , तसेच तात्पुरती किरकोळ मालाची दुकाने / खादयगृह थाटण्यावर  तसेच सर्व सार्वजनिक टेलीफोन / एसटीडी / आयएसडी । भ्रमणध्वनी ( मोबाईल ) , फॅक्स केंद्र , झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके वापरास निर्बंध घालण्यात आले आहेत . आदेश दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 8  वाजेपासुन ते दिनांक 24  ऑक्टोबर 2019 रोजी रात्री 12 वाजेपावेतो लागु राहतील तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्याने या आदेशाची प्रसिध्दी दंवडीव्दारे / ध्वनीक्षेपकाव्दारे तसेच इतर सर्व प्रसिध्दी माध्यमाव्दारे पोलिसांनी करावी, असेही आदेशात नमूद आहे .
-

स्ट्रॉगरुमच्या 100 मीटर परीसरात प्रवेशास निर्बंध ; 98 - पाथरी शासकीय तंत्र निकेतन ( ITI ) , विटा रोड पाथरी मतमोजणी

स्ट्रॉगरुमच्या 100 मीटर परीसरात प्रवेशास निर्बंध ; 98 - पाथरी शासकीय तंत्र निकेतन ( ITI ) , विटा रोड पाथरी मतमोजणी

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

भारत निवडणूक आयोगाने  विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केला असुन दिनांक , 21 सप्टेंबर 2019 पासुन आदर्श आचारसंहीता लागु केली आहे . परभणी जिल्हयात खालील ठिकाणी विधानसभा मतदार संघ निहाय सुरक्षा कक्ष ( Strong room ) स्थापन करण्यात आले आहेत , दिनांक . 21  ऑक्टोबर 2019 रोजी मतदान प्रक्रीया पार पडल्या नंतर सर्व मतदान यंत्र ( इव्ही एम ) सुरक्षित ठेवण्यासाठी 1 ) 95 - जिंतूर , शासकीय तंत्र निकेतन ( ITI )  औंढा रोड जिंतूर , 2 ) 96 -परभणी , कृषि अभियांत्रीकी महाविदयालय , वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी , 3 ) 97- गंगाखेड , संत जनाबाई महाविद्यालय , कोद्री रोड गंगाखेड 4 ) 98 - पाथरी शासकीय तंत्र निकेतन ( ITI ) , विटा रोड पाथरी या ठिकाणी दिनांक , 24 ऑक्टोबर , 2019 रोजी मतमोजणीची प्रक्रीया पार पडणार आहे . त्यामुळे सदरील स्ट्रॉगरुमचे 100 मिटरचे परीसरात कोणत्याही व्यक्तीस / वाहनास / फेरीवाल्यास प्रवेश करण्यास , तसेच तात्पुरती किरकोळ मालाची दुकाने / खादयगृह थाटण्यावर निबंध घालणे आवश्यक असल्याबाबत माझी खात्री झालेली आहे . त्याअर्थी परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी . शिवशंकर यांनी फौजदारी व्यवहार प्रक्रिया 1973 चे कलम 144 मधील प्राप्त अधिकाराचा वापर करुन उपरोक्त नमुद ठिकाणी स्थापन केलेल्या स्ट्रॉगरुमच्या 100 मिटरचे परीसरात कोणत्याही व्यक्तीस / वाहनास / फेरीवाल्यास प्रवेश करण्यास , तसेच तात्पुरती किरकोळ मालाची दुकाने / खादयगृह थाटण्यावर  तसेच सर्व सार्वजनिक टेलीफोन / एसटीडी / आयएसडी । भ्रमणध्वनी ( मोबाईल ) , फॅक्स केंद्र , झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके वापरास निर्बंध घालण्यात आले आहेत . आदेश दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 8  वाजेपासुन ते दिनांक 24  ऑक्टोबर 2019 रोजी रात्री 12 वाजेपावेतो लागु राहतील तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्याने या आदेशाची प्रसिध्दी दंवडीव्दारे / ध्वनीक्षेपकाव्दारे तसेच इतर सर्व प्रसिध्दी माध्यमाव्दारे पोलिसांनी करावी, असेही आदेशात नमूद आहे .
-

Tuesday, October 22, 2019

विधानसभा सार्वत्रीक निवडणूक-२०१९ ; जिल्‍ह्यातील चार मतदारसंघात सरासरी ६७.८८ टक्‍के मतदान ;•मतमोजणी २४ ऑक्‍टोबरला

विधानसभा सार्वत्रीक निवडणूक-२०१९ ; जिल्‍ह्यातील चार मतदारसंघात सरासरी ६७.८८ टक्‍के मतदान ;•मतमोजणी २४ ऑक्‍टोबरला

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्‍ह्यातील चार मतदारसंघात एकुण सरासरी मतदान ६७.८८ टक्‍के एवढे झाले आहे. यामध्‍ये ९५-जिंतूर विधानसभा मतदारसंघात ७२.८८ टक्‍के, ९६-परभणी विधानसभा मतदारसंघात ६२.२१ टक्‍के मतदान, ९७-गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ६९.०१ टक्‍के मतदान तर ९८-पाथरी मतदारसंघात ६६.५९ टक्‍के मतदान झाले आहे. चार मतदारसंघासाठीची मतमोजणी दि.२४ ऑक्‍टोबर २०१९ रोजी होणार आहे.
९५-जिंतूर मतदारसंघात ३ लाख ५० हजार ८३४ एवढे मतदार होते त्‍यापैकी २ लाख ५५ हजार ६८७ मतदारांनी मतदान केले यामध्‍ये १ लाख ३५ हजार ४९३ पुरुष, १ लाख २० हजार १९३ महिला व १ इतर यांचा समावेश आहे. ९६-परभणी मतदारसंघामध्‍ये एकुण ३ लाख ६ हजार २९९ एवढ्या मतदारापैकी १ लाख ९० हजार ५४० मतदारांनी मतदान केले. यामध्‍ये १ लाख २हजार ६४० पुरुष व ८७ हजार ९०० महिला मतदारांचा समावेश आहे. ९७-गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकुण ३ लाख ८८ हजार ६६२ एवढया मतदारांपैकी २ लाख ६८ हजार २२० मतदारांनी आपल्‍या मतदानाचा हक्‍क बजावला यामध्‍ये १ लाख ४२ हजार ९५३ पुरुष व १ लाख २५ हजार २६७ महिला यांचा समावेश आहे. तसेच ९८-पाथरी विधानसभा मतदारसंघात एकुण ३ लाख ५३ हजार ७६७ मतदारांपैकी २ लाख ३५ हजार ५८४ मतदारांनी मतदान केले. यामध्‍ये १ लाख २६ हजार ११० पुरुष तर १ लाख ९ हजार ४७४ महिला यांचा समावेश आहे.

Saturday, October 19, 2019

मतदार ओळखपत्र नसल्यास 11 पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी ग्राह्य

मतदार ओळखपत्र नसल्यास 11 पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी ग्राह्य

मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन)  :-

येत्या सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (ईपीक) नसल्यास 11 पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.

            मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी 11 पुरावे :  पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज (पीपीओ), खासदार,आमदार, विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणत्याही एका पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.

क्षेत्रिय अधिकारी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषीत

क्षेत्रिय अधिकारी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषीत

परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या कामाकरीता जिल्हादंडाधिकारी यांनी निर्देशित केलेल्या क्षेत्रिय अधिकारी यांना दि . 19 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी 6  वाजेपासुन ते दि . 21 ऑक्टोबर 2019 पर्यंत शासनाचे अधिसूचनेव्दारे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 21 नुसार विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषीत केले आहे.
     जिल्हादंडाधिकारी पी . शिवशंकर यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 ची प्रक्रिया सूरळीत पार पाडण्यासाठी , फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ( सन 1974 चा अधिनियम 2 ) कलम 21 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन परभणी जिल्हयातील जिंतुर - 95 , परभणी - 96 , गंगाखेड - 97 . पाथरी - 98 , विधानसभा मतदार संघात , विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या कामासाठी , निवडणुक निर्णय अधिकारी परभणी , गंगाखेड , जिंतुर , पाथरी यांनी नियुक्त केलेल्या क्षेत्रिय अधिकारी यांना दि . 19 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी 6  वाजेपासुन ते दि . 21 ऑक्टोबर 2019 पर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील हददीकरिता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असुन त्यांना फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 129 , 133 , 143 व 144 खाली शक्ती प्रदान करण्यात आली आहे. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
                         

Friday, October 18, 2019

वैयक्तिक वैफल्याचे बोथट हत्यार : नोटा

वैयक्तिक वैफल्याचे बोथट हत्यार : नोटा

माझ्या मतदारसंघात सगळे बेकार उमेदवार आहेत..मी नोटा वापरणार

पक्षाचे खोगीरभरतीचे धोरण मला पसंत नाही..मी नोटाचे बटण दाबणार

माझ्या इथे आयात उमेदवार आहे..मी नोटाचा सोटा मारणार.

मॉब लिंचिंग करतात..मी नोटाचा तडाखा देणार.

निवडणूक आली की हल्ली असे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे स्वाभिमानी आविष्कार नजरेस पडतात.

लोकशाहीच्या सदऱ्याला हे बटण कुणी शिवले ?

(पीयूसीएल) या डाव्या विचारसरणीच्या एका सामाजिक संस्थेने केंद्र सरकारविरुद्ध एक खटला दाखल केला होता. त्यात निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनवर नोटाचे बटण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली होती.सप्टेंबर २०१३ मधे सुप्रीम कोर्टात तसे आदेश दिले. निकालपत्रात खालीलप्रमाणे मत नोंदवले.

“If the right to vote is a statutory right, then the right to reject a candidate is a fundamental right of speech and expression under the Constitution.

राजकीय पक्षांनी तिकीट वाटप करताना योग्य उमेदवाराला तिकीट द्यावे ही अपेक्षा योग्यच आहे.उमेदवार गुन्हेगार नसावा,भ्रष्ट नसावा,चारित्र्यवान असावा यात दुमत असण्याचे कारण नाही. मी व्यक्तिशः नोटाच्या विरोधात आहे म्हणजे नोटाच्या मूळ हेतू मला अमान्य आहे असा अर्थ नाही.जे उमेदवारी अर्ज दाखल करतात ते प्रचलित कायद्याच्या चौकटीत राहून भरतात  इतके तरी मान्य आहे की नाही ? यावर खरा उपाय पात्रतेचे निकष बदलणे हा आहे ,नोटा नाही हे माझे ठाम मत आहे.

NOTA म्हणजे None of the above.म्हणजे उमेदवार की पक्ष. माझ्यामते उमेदवार. सुप्रीम कोर्टाने Candidate हाच शब्द वापरला आहे.पण पद्धतशीरपणे नोटाचा रोख विशिष्ट पक्षाच्या विरोधात वळवला जाताना दिसतो.

उमेदवार पक्षप्रतिनिधी असतो. नोटावाले एका व्यक्तिमुळे पक्षावर अन्याय करत असतात. तुम्हाला तुमच्या आवडत्या पक्षाचा तुमच्या मतदारसंघातील उमेदवार नालायक वाटला म्हणून जर नोटा दाबलात तर त्यामुळे त्या पक्षावर अन्याय होतो. कदाचित असा एक पक्ष ज्याचा तुम्ही सतत तिरस्कार करता त्याला फायदा होऊ शकतो.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष महत्वाचा मानावा. नोटा समर्थक एक गोष्ट विसरतात की ते फक्त उमेदवार डोक्यात ठेऊन नोटाच्या बाजूने वाद घालतात. देश आणि राज्य दुर्लक्षित करतात. मत पक्षाला असते, उमेदवार प्रतिनिधी असतो. नोटा दाबून तुम्ही पक्षाला नाकारता. राज्यासाठी, देशासाठी नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचे ,कोणाचे हात बळकट करायचे,कोणता पक्ष योग्य ते ठरवणे गरजेचे असते.

पहिला मुद्दा असा की ही निवडणूक आहे आणि इथे कोणालातरी निवडायचे असते. “उपलब्धांतून उत्तम” हा निवडणूकीचा मतितार्थ आहेत. तो पटण्यासारखा आहे.चांगला उमेदवार देणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची नैतिक जबाबदारी आहे हे पक्षांनी लक्षात घेऊन तिकीट वाटप करावे.

दुसरा मुद्दा असा की आता नोटाचा वापर राजकीय पक्षांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरला जातोय. हे करा नाहीतर नोटा दाबू ,ते करा नाहीतर नोटा दाबू असे हल्ली सर्रास लिहिले जाते. आज कमी प्रमाणात असले तरी उद्या एखादा मोठा जनसमूह किंवा मोठी वस्ती,गाव नोटाचा हक्क  राजकीय पक्षांच्या ब्लॅकमेलिंगचे साधन म्हणून वापरु शकतो. याचे दूरगामी परिणाम भयंकर असू शकतात.अशामुळे नोटांचा मूळ हेतूलाच खीळ बसू शकतो.

तिसरा मुद्दा म्हणजे काही लोकशाहीविरोधी लोक पद्धतशीरपणे सत्ताधारी पक्षाला अपशकुन करण्यासाठी नवमतदार आणि कुंपणावर बसलेले  मतदार या दोन घटकांना नोटा वापरण्यासाठी उद्युक्त करताना दिसून येतात.”सगळे राजकारणी चोर आहेत” ही यांची आवडती टॅगलाईन.लोक पटकन भुलू शकतात कारण काही राजकीय पक्षांची विश्वासार्हता लयाला गेली आहे.

चौथा मुद्दा म्हणजे (सुदैवाने) नोटाला कमीतकमी आज तरी धारच नाही. बोथट हत्यार आहे ते. कितीही मते नोटाला पडली तरीही निवडणूक रद्द होत नाही. वैयक्तिक वैफल्याला वाट करून घ्यायचे एक बटण यापलीकडे  त्याला किंमत नाही.निवडणूक प्रक्रियेत नोटाला काडीचीही किंमत नाही.

राजकारण बरबटलेले आहे हे जरी खरे असले तरी देश घटनेनुसार चालवावा लागणार आहे हे अंतिम सत्य आहे. निवडणूक होऊन सरकार स्थापन होते. निवडणूक राजकीय पक्ष लढवतात आणि त्यांचे नेतृत्व राजकारणी करतात.

NOTA may be good at law but bad in spirit.

नोटा हा लोकशाही विरोधी कन्सेप्ट आहे असे माझे स्पष्ट मत आहे. नोटाला एक उमेदवार समजायला काय हरकत आहे अशी अत्यंत घातक मागणी केली जात आहे. याचे परिणाम भयंकर आहेत.

लोकशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रचार याच्या आधारे मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ म्हणजे कमीतकमी ८५+ इतकी करण्याचा दृष्टीने प्रयत्न आणि राजकीय पक्षांनी चांगल्या लोकांना उमेदवारी देणे या दोन्ही गोष्टींच्या सहाय्याने लोकशाही मजबूत होईल नोटामुळे नव्हे.

मी , माझी आवड,माझा उमेदवार,माझ्या भावना हा संकुचित विचार झाला.तुम्ही पक्ष नाकारता हे लक्षात ठेवा. म्हणजेच पक्षाने दिलेले सर्व उमेदवार नालायक आहेत असे का समजायचे ? स्वच्छ शीर्षस्थ नेतृत्वाकडे बघून मतदान करता येत नाही ? स्वतःपलीकडे विचार नाही करता येत तुम्हाला ? तुमच्या नकारात्मकतेमुळे राज्य किंवा देश अस्थिर होऊ शकतो हे कळते की नाही ?

नोटा समर्थकांनी दोन वाक्प्रचार लक्षात ठेवाव्यात..

दगडापेक्षा वीट मऊ

आगीतून फुफाट्यात

आनंद विश्वनाथन.

Thursday, October 17, 2019

“राष्ट्रवादीच्या घड्याळात 10 वाजून 10 मिनिटं, त्यामुळे काॅंग्रेस-राष्ट्रवादीला 10-10 जागा मिळणार”

“राष्ट्रवादीच्या घड्याळात 10 वाजून 10 मिनिटं, त्यामुळे काॅंग्रेस-राष्ट्रवादीला 10-10 जागा मिळणार”

जालना |  राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह असलेल्या घड्याळात 10 वाजून 10 मिनिटं वाजली आहेत, त्यामुळे मोठा भाऊ आणि छोटा भाऊ दोघेही 10-10 जागा जिंकतील, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीची खिल्ली उडवली आहे.

नरेंद्र मोदी प्रचारासाठी जालन्यात आले आहेत. यावेळी सभेत बोलताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस-राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत चांगलाच धक्का मिळेल, असंही मोदींनी म्हटलं आहे.

370 वरुन विरोधकांनी केलेल्या टीकेवरही नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं आहे. मला विरोधक विचारतात 370 चा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संबंध काय? विरोधक आता शेजारी राष्ट्राची भाषा बोलत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत.

जिल्‍हयात 19 ते 21 ऑक्‍टोबर दरम्‍यान ; प्रतिबंधात्‍मक आदेश लागू

जिल्‍हयात 19 ते 21 ऑक्‍टोबर दरम्‍यान ; प्रतिबंधात्‍मक आदेश लागू

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्‍हयात विविध पक्ष्‍, संघटना यांचे उमेदवार, प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना सभा, बैठका, प्रचार,प्रसार करण्‍यास निवडणूक प्रचाराची मुदत संपल्‍यापासून म्‍हणजेच दिनांक 19 ऑक्‍टोबर 2019 रोजी सायंकाळी 6 वाजल्‍यापासून दिनांक 21 ऑक्‍टोबर 2019 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत कलम १४४ अन्‍वये  प्रतिबंध घालण्‍यात येत आहेत.

जिल्‍हयातील विधानसभा मतदार संघातील ९५-जिंतूर,  ९६-परभणी,९७-गंगाखेड, ९८-पाथरी या विधानसभा मतदार संघात लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम १९५१ चे कलम १२६ च्‍या तरतुदीनुसार मतदान बंद होण्‍याच्‍या वेळेपासून ४८ तास अगोदर संबंधित मतदार संघात प्रचाराचा कालावधी संपणार आहे. मतदार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व व्‍यक्‍ती व प्रचारा करीता आलेले स्‍टार प्रचारक हे कायदयानुसार निर्धारीत निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्‍यानंतर विधानसभा मतदार संघात राहील्‍यास त्‍यांचे कडून प्रचार मोहिम राबविली जाण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

फौजदारी प्र‍क्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्‍वये प्राप्‍त अधिकारा नुसार जिल्‍हयातील चारही विधानसभा मतदार संघात मतदार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व व्‍यक्‍ती व प्रचाराकीरता आलेले स्‍टार प्रचारक यांना परभणी जिल्‍हयाचे सिमेत उपस्थित राहण्‍यास मनाई करणे आवश्‍यक आहे. तसेच प्रचाराचीमुदत संपल्‍यानंतर मतदारांच्‍या गाठी भेटी घेऊन त्‍याना आकर्षित करण्‍यासाठी  रोख रक्‍कम भेट वस्‍तू दारु या सारख्‍या विविध प्रलोभणाद्वारे मतदाराना आकर्षित करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

हे आदेश निवडणूकीचे कामे हाताळताना आणि कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्‍हणून दिनांक 19 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी 6 वाजलेपासून अंमलात येईल. तसेच प्रत्‍येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्‍य नसल्‍याने हे एकतर्फी आदेश ध्‍वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्‍यास प्रसिध्‍दी द्यावी असे जिल्‍हाधिकारी पी. शिवशंकर यांनी आदेशित केले आहे.

मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या ; राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करुन घेणे बंधनकारक

मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या ; राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करुन घेणे बंधनकारक

मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान दि. 21 ऑक्टोबर रोजी होत असून त्या दिवशी आणि त्याच्या अगोदरच्या (दि. 20 ऑक्टोबर) दिवशी वृत्तपत्रे तसेच सर्व मुद्रित माध्यमांतून प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो. या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम 324 नुसार प्राप्त झालेल्या तसेच आयोगाला असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून हे आदेश काढले आहेत. त्यानुसार कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) करून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही.