Wednesday, July 31, 2019

मुंशी प्रेमचंद यांचे साहित्य आजही प्रासंगिक - प्रा. डॉ.वनिता कुलकर्णी

मुंशी प्रेमचंद यांचे साहित्य  आजही प्रासंगिक - प्रा. डॉ.वनिता कुलकर्णी

सोनपेठ (दर्शन):-

मुन्शी प्रेमचंद यांचे साहित्य सामान्य मानसाच्या व्यथा व जगन्याचा संघर्ष अधोरेखीत करणारे आहे, सामाजिक मानवी मुल्यांच्या कसोटीवर ते आजही प्रासंगिक असल्याचे मत प्रा. डॉ. वनिता कुलकर्णी यांनी व्यक्त केले, त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. शहरातील कै. र.व.महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने मुंशी प्रेमचंद यांची जयंती साजरी करण्यात आली प्रेमचंदाचे साहित्य सामान्य जनतेच्या भावना, समस्या व परिस्थितीचे वर्णन करणारे व विशाल विस्तृत समाजाचे साहित्य आहे आज ही ते प्रासंगिक आहे आशा महान थोर उपन्यासकार व कथाकार ज्यांनी तीनशे पेक्षा जास्त कहानी व 15 उपन्यास लिहून समाजाबद्दलची सहानुभूति दाखवली व जागृति केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.मुक्ता सोमवंशी या होत्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभाग प्रमुख प्रा.डॉ.वनीता कुलकर्णी,प्रमुख पाहुणे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.कल्याण गोलेकर, प्रा.अंगद फाजगे हे होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीपान रणदिवे यांनी केले तर आभार कु.रोहिणी कुऱ्हाडे यानी मानले या प्रसंगी हिंदी विभागाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

Tuesday, July 30, 2019

पाथरी विधान सभेतील मंचकराव बचाटे पाटलांची लोकउमेवारी भल्या भल्याना धडकी भरवणारी ठरेल

पाथरी विधान सभेतील मंचकराव बचाटे पाटलांची लोकउमेवारी भल्या भल्याना धडकी भरवणारी ठरेल

सार्वजनिक जिवनामध्ये माणुस म्हणून आपल्या कर्तव्याचे निर्वाह करत असतांना आपल्या सामाजिक,धार्मिक,अध्यात्मिक,कौटोंबीक व राष्ट्रीय  कर्तव्य व जबाबदार्‍या पार पाडणे आता थोडे कठिण होऊ लागले आहे. कारण मी माझे घर,माझी पत्नी व मुले म्हणजे माझा देश अस माणणार्‍या आत्मकेंद्रीत न होणार्‍या स्वकेंद्रीत राहणार्‍या वर्गाची वाढ आता झपाट्याने होत आहे.सर्व समावेशक भारतीय समाज हा शब्द लोकांना आता जुना वाटू लागला आहे. मी म्हणजे मी जन्माला आलेली जातच त्या पलिकडे मी व माझी जात म्हणजेच सर्वश्रेष्ठ इतर जातींची सतत अवहेना करणे म्हणजे आपण समाजामध्ये किती वजनदार आहोत असा भास निर्माण करणारी पिढी झपाट्याने वाढत आहे.
आपले जीवनमान उंचावत असतांना शेजारी पाजारी तर सोडाच नातेवाईकांनाही ढूंकून न बघणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे.आई बाबा म्हणजेच एक ओझे असे समजून गावाकडच्या जुन्या वाड्यामध्ये त्यांना खितपत ठेवणारी पिढी आता वाढू लागली आहे.आईच्या हातची मऊ-मऊ दुध पोळी खाणारी पिढी लयाला जाऊन आता पिझ्झा-बर्गर खाणारी पिढी वाढू लागली आहे. इंग्रज मालकांची इंग्रजी भाषेतली पप्पा-मम्मी माय-बापाच्या थोबाडीत मारु लागली आहे. धर्म म्हणजे निवडणुकांपुरता नाते-गोते, जात-पात, पोटजात-उपजात असे नानाविध प्रकारांना निवडणुकींच्या काळामध्ये रंग रंगोटी करण्यात येते. एके काळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अनोळखी इसम अथवा व्यक्ती गावात आली तर गावच्या पाटल्याच्या वाड्यावर हातात गुळाचा खडा व वंजळभर शेंगदाणे आणि तांब्या भरुन ताक पहिले त्याच्या पुढ्यात ठेवण्यात यायच म्हणून पाटील म्हणजे त्या गावचा पालक होता.हजारो वर्षापासून गावच्या आठरा पगड समाजाला सामाजिक,धार्मिक, कौटोंबीक सोहळ्यांमध्ये कुटूंबाचे सदस्य म्हणून सहभागी करुन घेणारा पाटीलच. गावच्या बारा बलुतेदारांच्या लेकी बाळींची सोयरिक पाटील स्वत; आपल्या वाड्यावर करुन द्यायचे. मुलगी भांडून घरी परत आली तर पाटलाच्या वाड्यावरची बैलगाडी त्या मुलाच्या घरी जायची त्याची समजूत काढायची. आपल्या पोटच्या गोळ्यागत ज्या वर्गाने आठरा पगड समाजाची जोपासणुक केली तो पाटीलकीचा वारसा या वारस्याने हजारो वर्ष देशाला सर्वोत्तम योध्दे दिले.आत्मबलिदान करणार्‍या पिढ्या आपल्या घरातच निर्माण केल्या. स्वातंत्र्यानंतर भारताने प्रजासत्ताक पध्दतीचा अंगिकार केला.मत स्वातंत्र्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीने गावच्या पोलीस पाटील म्हणजे निळू ङ्गुले सारखा असले चित्र उभे करुन भारतीय संस्कृतीचे कंबरडे मोडले. पाटीलकी मोडीस काढणार्‍या वर्गाने पुढे गावातली तालीम नष्ट केली. पाटीलकीच्या आश्रयाला असलेली तालीम ही उत्तम आरोग्य,बल संवर्धन, चारित्र्य निर्मीती गाव म्हणजे मेरा गाव मेरा देश या वचनाने प्रत्येक तालिमीमध्ये महाबली हनुमानाच्या साक्षीने राष्ट्र घडवणारी पिढी तयार व्हायची. समाज घडवणार्‍यामध्ये गाव पातळीवर पाटील,पटवारी,मुख्याध्यापक यांची ङ्गार मोठी मोलाची भूमीका होती. या भूमीकेपासून आधूनिकीकरणाच्या नावाखाली ङ्गारकत घेणार्‍या राज्य व्यवस्थेला गावच्या घराघरामध्ये भांडण लावून गावपातळीवर असलेले बंधुत्व संपवून नव्या जातीवादी व्यवस्थेला जन्म द्यायचा होता म्हणून एकेकाळी गावात कुणी दारु पिऊन आलाच आणि त्या दारुड्या समोर मी पाटलाला जाऊन सांगतो अस कोणी म्हणाला तरी दारुडे उसात जाऊन लपायचे हि नैतिक भिती मुल्यांकित समाजाची निर्मीती करणारी होती.मराठवाडा तर संतांची भूमी वारकरी संप्रदायाचा आत्माच मराठवाड्यात राहतो. मराठवाड्यातली माणसं ही सृजनशिल,आध्यात्मिक व परोपकारी आहेत. परंतू मागच्या 10 वर्षाच्या सार्वजनिक निवडणुकांमधून त्यांच्यामध्ये भेद निर्माण करत जातीपातीचे विष पेरण्याचे काम कुणी तरी करत आहे. परंतू समाजात पसरत असलेली अव्यवस्था आळस आणि एैतखाऊ पणा यांच्या एैशवर्यातून गलिच्छ राजकारणाची निर्मीती होते.त्यामुळे लक्ष्मीपुत्र धनाड्य लोकांची वर्णी लोकसभा व विधानसभेला लागत आहे.हे चित्र भयावह भविष्याची भिती निर्माण करत आहे. लोकशाहीचा जुवा खेळणार्‍या जुगार्‍यांना आता धडकी भरायला लावणार वारकरी संप्रदायात जन्माला आलेल,आयुष्यभर यशस्वीरित्या पोलिस खात्यात निष्कलंक नौकरी करत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याचे बाळकडू त्यांना पारंपारिक पाटीलकीच्या वाड्यावर जन्मानेच मिळाले होते.सामाजिक जबाबदारीचे भान आणि जाण आई वडीलांनी बालपणीच करुन दिले होते. वडील मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील विख्यांत किर्तनकार, दिंडी क्र.5 चे विणेकरी ज्ञानेश्‍वर माऊलींच्या सोहळ्यात आयुष्याची 50 वर्ष अखंड अनवाणी पायाने सेवा करणारे श्री ह.भ.प.सागरराव भिवराव बचाटे पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव श्री.मंचकराव सागरराव बचाटे पाटील(मुळ गाव वडगाव स्टे ता.सोनपेठ) हे आपल्या वडीलांचा समाजिक,धार्मिक व सांस्कृतीक वारसा अंगिकारुन आज घडीला सेवा निवृतीच्या नंतर समाजसेवाला वाहून घेतले आहे. त्यांच्या आप्तस्वकीयापासून विरोधकांमध्ये सुध्दा पाथरी विधानसभा मतदार संघातून संभाव्य उमेदवार म्हणून मोठ्या आशेने नाव चर्चिल्या जात आहे. हल्ली इव्हेंटमॅनेजमेंटचा जमाना आहे. मुंबई पुण्यात राहणारी माणस परभणी जिल्ह्याला राजकीय कुरण समजुन पैशाच्या जोरावर राजकीय पक्षाची उमेवारी मिळवत लोकप्रतिनिधी होऊ पहात आहेत. परंतू भूमीपुत्रांची  होत असलेली सततची अवहेलना व विश्‍वच माझे घर असे समजणार्‍या वारकरी संप्रदायाचे वारसदार मंचकराव बचाटे पाटील हे सर्वच जातीधर्माच्या धामिर्क भिंतीपलिकडे माणुस म्हणून माणुसकीचा धर्म जोपासणारे एक आर्दश व्यक्तीमत्व म्हणून सर्वांच्याच पसंतीस उतरत असून ग्रामीण भागामध्ये गावा गावात नातेवाईक आप्तस्वकीय सर्वच धर्मातील त्याचा व्यापक मित्रपरिवार यांनी श्री.मंचकराव बचाटे पाटील यांचा संभाव्य उमेदवार म्हणून प्रचारही सुरु केला आहे. मतदार संघातील लोक आता अशीही चर्चा करत आहेत की, पैशाच्या बळावर निवडणुन येणार्‍यांनी धंदा म्हणून पद स्वत:साठीच वापरले आम्हाला गावात जायला रस्ता नाही,स्वच्छ पाणी नाही,शेतात वीज नाही, पोलीस स्टेशनला आमचे कोणी एैत नाही, तहसीलला सातबारा मिळत नाही त्यामुळे आम्हाला कोणी वाली उरला नाही पण श्री.मंचकराव बचाटे पाटील या भूमीपुत्राच्या रुपाने 2019 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी मध्ये लोकांचा उमेदवार म्हणून आम्ही त्यांना उभ करु त्यासाठी लागणारा निधी म्हणून लोकवर्गणीतून उभारु व मातीचा स्वाभीमान, संस्कृतीची जाण,मानवधर्माच ज्ञान,भागवत धर्माची पताका आणि वारकरी संप्रदायाच वैभव जोपासणार्‍या लोक उमेदवार श्री.मंचकराव बचाटे पाटील यांना उमेदवारीची भाषा पाथरी विधान सभेतील बहुतांश गावामध्ये होऊ लागली आहे. या गोष्टीची कानोकान खबर न लागू देता गोपनिय संघटन बांधणी चालू आहे. धनाड्य उमेवाराविरुध्द हा गनिमीकावा येणार्‍या निवडणुक पाथरी विधानसभेत अचंबीत करणारा आहे.यावरुन पाथरी विधान सभेचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहे. हे सांगणे न लागे. तसेच या लोक उमेदवाराला कोणता पक्ष गळ घालतो व त्यांना उमेदवारी देत पाथरी विधानसभा मतदार संघातील लोकांचा सन्मान करतो हे पहाने यासाठी काही काळ वाट पहावी लागेल. परंतू एक गोष्ट नक्की ‘‘यह परभणी है मेरी जान‘‘ बनी तो बनी नही तो भल्या भल्या साठी सदा भनभनी’’
लेखन :- प्रकाशराजे साळवे (जील्हा प्रतिनीधी,परभणी)

Monday, July 29, 2019

मराठवाड्यात 191.88 मि.मी. पाऊस

मराठवाड्यात 191.88 मि.मी. पाऊस

औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- मराठवाड्यात मागील काही दिवसांत ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा जोर कमी आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यात अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे.  विभागात आज सकाळपर्यंत नोंदल्या गेलेल्या आजपर्यंतच्या पावसाच्या एकूण आकेडवारी नुसार सरासरी 191.88 मि.मी  आहे.
जिल्हानिहाय  आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. नांदेड 242.28 मि.मी, औरंगाबाद- 232.88 मि.मी, हिंगोली -223.87 मि.मी, जालना - 210.45 मि.मी, परभणी -178.62 मि.मी, लातूर 163.63 मि.मी, उस्मानाबाद 156.67 मि.मी. आणि बीड 126.66 मि.मी.
विभागातील आठही जिल्ह्यातील सकाळपर्यंत मागील चोवीस तासांतील तालुक्यानिहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी दि.1 जूनपासून आजवर पडलेल्या पावसाची सरासरी आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिणामात आहे.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 9.50 (200.00), फुलंब्री 10.75 (276.75), पैठण 9.60 (154.14), सिल्लोड 25.25 (315.94), सोयगाव 26.00 (328.33), वैजापूर 7.40 (203.90), गंगापूर 9.89 (185.89), कन्नड 13.75 (243.00), खुलताबाद 12.67 (188.00). जिल्ह्यात एकूण 232.88 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 5.50 (174.56), बदनापूर 7.20 (213.40), भोकरदन 18.50 (305.88), जाफ्राबाद 9.20 (238.40), परतूर 2.80 (190.28), मंठा 4.75 (199.50), अंबड 5.43 (189.14), घनसावंगी 4.71 (172.43), जिल्ह्यात एकूण 210.45 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 2.25 (157.42), पालम 3.67 (143.42), पूर्णा 4.60 (202.40), गंगाखेड 6.75 (165.75), सोनपेठ 4.00 (185.00), सेलू 3.80 (156.80), पाथरी 2.67 (174.33), जिंतूर 3.33 (192.33), मानवत 3.67 (230.00), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 178.62 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 4.86 (213.57), कळमनुरी 6.00 (258.75), सेनगाव 5.67 (218.50), वसमत 3.57 (136.29), औंढा नागनाथ 4.50 (292.25). जिल्ह्यात एकूण 223.87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

नांदेड जिल्हा- नांदेड 5.25 (226.75), मुदखेड 11.00 (295.00), अर्धापूर 3.33 (221.32), भोकर 11.50 (251.75), उमरी 8.33 (260.79), कंधार 7.50 (220.33), लोहा 5.00 (197.03), किनवट 17.71 (278.19), माहूर 11.25 (308.44), हदगाव 9.29 (222.56), हिमायत नगर 17.67 (252.66), देगलूर 12.00 (153.16), बिलोली 11.00 (302.00), धर्माबाद 14.67 (218.67), नायगाव 4.80 (261.60), मुखेड 7.14 (206.29), जिल्ह्यात एकूण 242.28 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 8.27 (117.64), पाटोदा 0.25 (147.00), आष्टी 2.43 (132.14), गेवराई 4.70 (103.00), शिरुर कासार 9.33 (94.33), वडवणी 10.50 (110.50), अंबाजोगाई 11.00 (115.00), माजलगाव 6.60 (180.73), केज 1.00 (127.57), धारुर 3.67 (113.33), परळी 15.40 (152.02), जिल्ह्यात एकूण 126.66 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 1.00 (115.88), औसा 1.71 (90.57), रेणापूर 5.50 (146.25), उदगीर 6.29 (180.29), अहमदपूर 12.00 (228.17), चाकुर 10.00 (137.60), जळकोट 11.00 (223.50), निलंगा 3.63 (157.25), देवणी 4.00 (186.50), शिरुर अनंतपाळ 0.00 (170.33), जिल्ह्यात एकूण 163.63 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 0.50 (144.50), तुळजापूर 0.29 (190.57), उमरगा 3.40 (186.40), लोहारा 0.00 (190.00), कळंब 0.50 (132.67), भूम 0.60 (170.10), वाशी 0.00 (148.33), परंडा 0.00 (90.80), जिल्ह्यात एकूण 156.67 मि.मी. पाऊस झाला आहे.

सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

Sunday, July 28, 2019

प्रथमच "इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड" व्हिजन पब्लिक स्कूल ची नोंद

प्रथमच "इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड" व्हिजन पब्लिक स्कूल ची नोंद

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील व्हिजन पब्लिक स्कूल येथे दिनांक 26 जुलै 2019 रोजी "कारगिल विजय दिवस" साजरा करून शहीद जवानांना "श्रद्धांजली" अर्पण करण्यात आली होती. या कार्यक्रमा निमित्त व्हिजन पब्लिक स्कूल येथे "कारगिल विजय दिवस" हे मराठी अक्षर मानवी प्रतिकृतीत साकारले होते.यामध्ये 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.या उपक्रमाची नोंद "इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये झाली आहे. यामुळे शाळेचे अध्यक्ष, सचिव शाळेचे प्राचार्य डॉ.पांडुरंग दुकळे ,संयोजक भगवान घाटुळ सर, विश्वभारती प्रायमरी स्कूल प्राचार्य रामेश्वर हुंबे, शिक्षक आदिंना पालकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या या उपक्रमात शाळेतील शिक्षक विठ्ठल राठोड, सुरज गायकवाड, मिलिंद जाधव, बाळासाहेब धोंडगे, केशव चव्हाण, अनिल पौळ, आशिष सर इत्यादी शिक्षक वृंदानी मार्गदर्शन केले. तहसीलदार, गट शिक्षन अधिकारी, रोटरी क्लब अध्यक्ष रो.किरन चौलवार, सचिव रो.बालमुंकुद सारडा व सर्व रोटरीयन सदस्य, जय भवानी मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष बळीराम काटे व सर्व सदस्य, मराठी पत्रकार परीषद तालुका संघ अध्यक्ष बाबासाहेब गर्जे व सर्व सदस्य पत्रकार बांधव, वृतपत्र विक्रेता तालुका संघ अध्यक्ष रामेश्वर पोटे व सर्व वृतपत्र विक्रेता सदस्य बांधव आदिंच्या वतिने शुभेच्छा व्यक्त करन्यात आल्या आहेत.

सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

Friday, July 26, 2019

प्रा.डॉ.मुकुंदराज पाटील यांच्याकडून विद्यार्थी दत्तक

प्रा.डॉ.मुकुंदराज पाटील यांच्याकडून विद्यार्थी दत्तक
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथिल कै.र.व.महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या जातात त्यापैकीच एक विद्यार्थी दत्तक योजना असून या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्राध्यापकांकडून आर्थिक मदत केली जाते.
  2019-20 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी दत्तक योजनेला सुरुवात झाली असुन या योजनेअंतर्गत कु. राजश्री ज्ञानेश्वर वायंगडे या बी.एस्सी.प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रा.डॉ.मुकुंदराज पाटील यांच्याकडून आर्थिक मदत करून या योजनेस सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते व विद्यार्थी दत्तक योजनेचे समन्वयक प्रा.डॉ.बालासाहेब काळे हे उपस्थित होते.

Thursday, July 25, 2019

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी २९ जुलै पर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी २९ जुलै पर्यंत मुदतवाढ

औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

शासनाने खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत २४ जुलै होती. तथापि २४ जुलैच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम २०१९ करिता योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यास २९ जुलै पर्यंत मुदत वाढविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.
योजनेत सहभागी  होण्यासाठी बँक व ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजिटल सेवा केंद्र) यांच्या मार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यास्तव विहित मुदतीपूर्वी नजीकच्या बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
अधिक माहितीसाठी तत्काळ नजीकच्या कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजिटल सेवा केंद्र) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.

Monday, July 22, 2019

सोनपेठ येथे सपोनि उस्मान शेख यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या मटक्यासह अवैध्य धंदे कायम


सोनपेठ येथे सपोनि उस्मान शेख यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या मटक्यासह अवैध्य धंदे कायम

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथे मागील काही महिन्या पासुन कल्याण व मुंबई नावाचा मटका जुगार व इतर अवैध्य धंदे शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कायम सुरू आहेत.कधी नव्हे ते सोनपेठकरांना माहित नसलेला हा मटका नव्याने रुजू तत्कालीन सपोनि उस्मान शेख यांच्या कार्यकाळात सुरू झाला व बघता बघता मटक्याला आज सुगीचे दिवस प्राप्त झाले. त्यातच उस्मान शेख यांची बदली झाली परंतू शहरासह तालुक्यात मटक्याची धग अजुनही सतत सुरू आहे या मटक्यामूळे अणेक गोरगरिबांचे संसार उध्वस्त होताना दिसत आहेत,हे अवैध्य धंदे बंद असताना मुला मुलींना घरो-घरी खाऊ जात असत आता व्यसनाधीण बाप व मुला मुलींना विनाकारण मार भेटत आहे, वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन शहरासह तालुक्यात सुरू असलेला कल्याण व मुंबई नावाचा मटका व इतर अवैध्य धंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी येथील सुजान नागरिकातून करण्यात येत आहे.शहरातील पोलिसांना माहिती असलेल्या विविध भागांमध्ये दिवसभर खेळला जाणारा कल्याण व रात्रीचा मुंबई नावाचा मटका तेजित सतत सुरू आहे शहरांमध्ये यापूर्वी मटका खेळणारांचे प्रमाण कमी होते तालुक्यातील हा खेळ खेळणारे नागरिक मटका खेळण्यासाठी पुर्वी इतरत्र जात असत परंतु मागील चार महिन्यापूर्वी शहरात मटका सुरू करण्यात आला आज रोजी शहरांमध्ये 15 ते 20 ठिकाणी मटका घेणारे आहेत तर दोन ठिकाणी मटक्याचे बुक्की धारक आहेत हा मटक्याचा खेळ खेळविणारावर स्थानिक पोलिस प्रशासन वचक न ठेवता आर्थिक जुमला जमवत आहेत.त्यामुळे मटका घेणारांना स्थानिक पोलिसांचे पाठबळ मिळत आहे परंतु तालुक्यातील विविध ग्रामीण भागातून येणारे नागरिक एक रुपयाचे नव्वद रुपये होतील या भाबड्या आशेने मटका खेळत आहेत शहरासह ग्रामीण भागातील अनेक नागरिक मटका या खेळाकडे आकर्षित होऊन स्वतःचे संसार उध्वस्त करून घेत आहेत यामध्ये ग्रामीण भागातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.शहरात सुरू असलेल्या मटक्या बद्दल स्थानिक पोलिस प्रशासनाकडून गरज पडल्यास ठरवून देऊन कारवाई केली जाते प्रत्येक महिन्याला एका मटका धारकांवर कारवाई करून वरिष्ठांची मने जिंकली जातात व पोलिसांनी मटक्यावर धाड मारली असल्याचा मोठा गाजावाजा केला जातो परंतु ही कारवाई ठराविक मटका धारकांवर पूर्व सूचना देऊन दोघांच्या सहमतीनेच केली जाते व पुढे मटक्याचा व्यवसाय दोघांच्या सलोख्याने तेजीत ठेवला जातो अशी चर्चा आहे या गंभीर बाबीकडे कर्तव्यदक्ष असणारे परभणी जिल्हा पोलिस अध्यक्ष कृष्णकांत उपाध्याय यांनी लक्ष दिल्यास शहरासह तालुक्यातील मटका व इतर अवैध्य धंदे बंद होऊ शकतात व त्यातून उद्ध्वस्त होणारे अनेक गोरगरिबांचे संसार पुन्हा उभा ठाकतील तसेच पुन्हा घरो-घरी मुला मुलींना खाऊ हि जाईल यात शंका नाही.

Friday, July 19, 2019

सोनपेठ रोटरी क्लबला जीएसटीचा महामंत्र देतो - रो. मोहन देशपांडे ; सोनपेठ रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न

सोनपेठ रोटरी क्लबला जीएसटीचा महामंत्र देतो - रो. मोहन देशपांडे ; सोनपेठ रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न

सोनपेठ (दर्शन):- सोनपेठ शहरातील मारवाडी बालाजी मंदिर येथे रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा थाटामाटात संपन्न झाला यावेळी अध्यक्षपदी माजी अध्यक्ष रो.प्रदीप गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक रो. मोहन देशपांडे (माजी प्रांतपाल), प्रमुख उपस्थिती इंजि.रो.चंद्रकांत लोमटे (उपप्रांतपाल व माजी सचिव), रो.संजय आढे (जिल्हा समन्वयक), नूतन अध्यक्ष किरन चौलवार, नुतन सचिव रो.बालमुकुंद सारडा आदी मान्यवरांनी वृक्षाला पाणी घालून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली प्रथम सर्व उपस्थित व्यापारी बांधव व पत्रकार बांधवांचे शब्दसुमनांनी स्वागत करून, सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान कु.कृष्णाई राठोड व चिं.सुबोध रणेर यांचा करण्यात आला, या प्रसंगी सा.सोनपेठ दर्शन रोटरी विशेषांकाची सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते संपादक किरण स्वामी यांच्या उपस्थितीत विमोचन करण्यात आले.नवीन रोटरीयन  यांना रोटरी पीन  व पुष्पगुच्छ देऊन रो.मोहन देशपांडे यांनी स्वागत केले यामध्ये रो.माजी आमदार व्यंकटराव कदम, रो.केदार वलसेटवार, रो.भगवान मस्के, रो.अशोक धम्रे, रो.प्रशांत पांपटवार यांचे स्वागत करण्यात आले,  विशेष योगदाना बद्दल रोटरीयन यांचे स्वागत करण्यात आले यामध्ये रो.परमेश्वर कदम, रो.प्रा.रो.डॉ.वसंत सातपुते, रो.नागनाथ सातभाई रो.संतोष रणखांब, रो.विठ्ठल जायभाये आदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.मावळते अध्यक्ष रो.प्रदीप गायकवाड यांनी नूतन अध्यक्ष रो.किरण चौलवार यांना कॉलर चार्टर, हमर देऊन तर मावळते सचिव चंद्रकांत लोमटे यांनी नूतन सचिव रो.बालमुकुंद सारडा यांना पदभार सुपूर्त केला याच प्रसंगी सर्व रोटरीयन यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नुतन अध्यक्ष रो.किरन चौलवार यांनी मनोगत व्यक्त करताना पुढील वर्षी विविध उपक्रम राबवणार असल्याचा मानस व्यक्त केला. मावळते अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी मागील वर्षीचा अहावाल वाचन केले. प्रांतपाल यांचा संदेश उपप्रांतपाल चंद्रकांत लोमटे यांनी वाचन केला. माजी प्रांतपाल मोहन देशपांडे यांचा परिचय प्राचार्य वसंत सातपुते यांनी करून दिला. प्रमुख मार्गदर्शक रो. मोहन देशपांडे यांनी समारोप प्रसंगी रोटरी क्लब बद्दल सर्व स्वअनुभव कथन करुन प्रथम रोटरी क्लब सोनपेठचे रोपटे लावताना रफिक भाई शेख यांच्या नावाचा गौरव करून प्रथम अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर प्रेमाकर शेटे यांच्या आठवणीला उजाळा दिला व रोटरी क्लबला जीएसटी हा महामंत्र दिला जी म्हणजे गुड चागले म्हनायला शिका, एस म्हनजे होय म्हनायला शिका व टि म्हणजे थँक्स धन्यवाद व्यक्त करत राहा असे सांगुन सखोल मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन रो.प्रमोद गावरस्कर यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डाँ.विठ्ठल जायभाये यांनी केले या सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.