सोनपेठ कार्यश्रेत्रातील कापुस खरेदीचे उदघाटन संपन्न
आता दर गुरुवार व शुक्रवार कापुस खरेदी होणार सुरु !
कापूस हंगाम २०२०-२०२१ या हंगामासाठी सोनपेठ कार्यश्रेत्रातील कापूस दत्पादक शेतकरी बांधवाना कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकन्यांना (sms) द्वारे कळविल्या नंतरच कापूस विक्रीसाठी जिनींगवर घेऊन यावे.आज दि.14 डिसेंबर 2020 रोज सोमवार रोजी भारतीय कापूस निगमची ( CCi ) खरेदी सुरूवात
जिल्हा परीषद अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर यांच्या शुभ हास्ते श्री मारोती मंदीर पुजन व आरती करुन तसेच धरमकाट्याचे पुजन करुन मिनाक्षी व राजेश्वर जीनींग येथे उदघाटन करण्यात आले.यावेळी पहील्या पाच शेतकऱ्यांचा सन्मान शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला तर कापसाला 5 हजार 725 रुपये भाव मिळाला.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिनींगचे संचालक,सर्व पक्षीय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत विटेकर,दशरथ सुर्यवंशी,काँग्रेसचे डाँ.प्रा.मुंजाभाऊ धोंडगे,राजाभाऊ अंबुरे,शिवसेनेचे मधुकर निरपणे,भाजपाचे जेष्ठ नेते रमाकांतदादा जहागीरदार, शिवाजीराव मव्हाळे आदि सह शेतकरी उपस्थीत होते.परीश्रम सय्यद हारुन,बळीराम भोसले, दत्तात्रय भोसले, गणेश घुले, विश्वभंर रोडे, शेख अजीम यांनी घेतले. आता कापुस खरेदी दर गुरुवार व शुक्रवार होणार असुन एक दिवसासाठी आहे.त्यामूळे (sms) आल्यानंतर कापूस विक्री साठी आपला माल घेवून त्याच दिवशी यावे दुसऱ्या दिवशी येणाऱ्या शेतकन्याचे मोजमाप होणार नाही.याची दक्षता घ्यावी.कापुस घेऊन येते वेळेस शेतकऱ्याने स्वत:हजर राहावे किंवा त्या कुटुंबातील दुसरा प्रतिनिधी पाठविण्यात येत असेल तर त्या प्रतिनधिचे नांव राशन कार्ड मध्ये असणे आवशक आहे.राशन कार्डची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन यावी. एफ.ए.क्यु दर्जाचा (चागल्या प्रतिचा) ओलावा नसलेला कापुस खरेदी केंद्रावर आनावा शेतकऱ्याने कापुस आणते वेळेस 40 क्विंटल किंवा 40 क्विंटलचे आतमध्ये कापुस घेऊन यावा कापुस खराब प्रतिचा आणू नये कापुस रीजेक्ट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्याची राहिल.कोरोणा विषाणुच्या प्रादूर्भाव टाळण्यासाठी बाजार समितीच्या आवारात व कापुस खरेदी केंद्रावर अनावश्यक गर्दी टाळून मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे.सोबत येते वेळेस 1) चालु वर्षातील पेरा असलेली सातबारा (8) अ उतारा. 2) आधार कार्डची झेरॉक्स. 3) बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स ,अद्यावत ( IFSC ) कोडसह,खाते क्रमांक जोडावा, जनधनचा खाते क्रमांक देऊ नये याची दक्षता घेण्यात यावी.असे अवाहन बाजार समिती सभापती श्री.राजेश उत्तमराव विटेकर, उपसभापती सौ.मिना दशरथराव सुर्यवंशी व प्र.सचिव आशोक भोसले यांचे कडून करण्यात येत आहे.





No comments:
Post a Comment