Thursday, December 10, 2020

नागरिकांनी आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदवावे

नागरिकांनी आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदवावे 


नरवाडी (पांडुरंग शिंदे) :-

जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी येथे बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे ( बी.एल.ओ.नरवाडी ) यांनी केली नविन मतदारांची नाव नोंदणी जि.प. कें.प्रा.शाळा नरवाडी येथे 98 - पाथरी नरवाडी - 352 व 353 येथे नविन मतदार नोंदणी विशेष पुनरीक्षण मोहीमे अंर्तगत आता पर्यंत नविन 30 महिला व 32 पुरुष एकुण 62 नविन मतदारांची नोंदणी दि.10 डिसेंबर 2020 गुरुवार पर्यंत झाली असून 1 जानेवारी 2021 पर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या नागरिकांनी आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदवावे असे नरवाडी येथील बी.एल.ओ. बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे व अमोल शिवाजीराव जोशी यांनी नागरीकांना आवाहन केले आहे. याप्रसंगी मुख्याध्यापक व नागरीक चागला प्रतिसाद देत आहेत.

No comments:

Post a Comment