गंगाखेडातील प्रस्तावीत ‘जनाई नगरी’ चे टोटल सर्वेक्षण सुरू ; मंत्रोच्चाराच्या जयघोषात शुभारंभ
गंगाखेड / सोनपेठ (दर्शन) :-
शहरासाठी महत्वपूर्ण ठरू शकणाऱ्या ‘जनाई नगरी’ प्रकल्पाच्या कामाने आता वेग घेतला आहे. प्रकल्पासाठीच्या टोटल सर्वेक्षणाचा शुभारंभ आज कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, नगर परिषदेचे माजी ऊपनगराध्यक्ष राधाकृष्ण शिंदे, जेष्ठ मार्गदर्शक रंगनाथराव भोसले, माणिकराव आळसे यांच्या प्रमुख ऊपस्थितीत करण्यात आला. अत्याधुनीक यंत्रणेद्वारे हा सर्वे केला जात आहे.
गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या प्रशासकीय बैठकीत या संदर्भात आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार आज दि. १६ डिसेंबर रोजी गोदाघाट परिसरातून टोटल सर्वेक्षणास सुरूवात करण्यात आली. ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रोच्चाराच्या जयघोषात श्रीफळ वाढवून कामाची सुरूवात करण्यात आली गोविंद यादव, राधाकृष्ण शिंदे यांचेसह बाजार समिती संचालक तथा खंडोबा मंदीर समितीचे माणिकराव आळसे मामा, भगवती मंदीर समितीचे अभिजीत पुरणाळे, संत नरहरी महाराज मंदीर समितीचे सचीन दहीवाळ, माजी नगरसेवक वैजनाथ टोले, मोहन खोले, गजानन जोशी, ऊमेशगुरू जोशी, सोनू जोशी, शंकर भरणे, गजानन पाठक, अभिजीत जोशी, आदींची या प्रसंगी ऊपस्थिती होती. मुख्य सल्लागार अभियंता नागेश पैठणकर, नागनाथ कापुसकरी, अमिन सिद्दीकी यांच्या नेतृत्वात हा सर्वे केला जात असून गंगाखेड बांधकाम ऊपविभागाचे कनिष्ठ अभियंता पौळ, नगर परिषदेचे कनिष्ठ अभियंता भोकरे, स्वामी त्यांना सहकार्य करत आहेत. परभणी येथील पारवेकर एजन्सी यांचेकडून अत्याधुनीक यंत्रणेचा वापर करत हा संपुर्ण सर्व्हे केला जात आहे. यातून संपुर्ण परिसराच्या अतिशय सुक्ष्म नोंदी ठेवल्या जाणार असून प्रकल्पाच्या सुरूवातीचा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो.
गंगाखेड शहराचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या प्रकल्पाच्या कामास आता प्रत्यक्ष सुरूवात झालेली असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment