क्रीडा सप्ताहमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व संबंधित एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.12 /12/ 2020 ते दि.18/12/2020 या कालावधीत खालील ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा सप्ताह निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.दि.12/12/2020 रोजी जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे सकाळी क्रीडा सप्ताहचे उद्घाटन व बॉक्सिंग स्पर्धा (17 वर्षांखालील मुले व मुली), दि.13/12/2020 रोजी सायंकाळी 05.00 वा. बॅडमिंटन स्पर्धा (17 वर्षाखालील मुले व मुली) व प्रशिक्षण, दि.14/12 / 2020 रोजी सायंकाळी 05.00 वा. धनलक्ष्मीनगर, परभणी येथे तायक्वांदो स्पर्धा (17 वर्षाखालील मुले व मुली ) प्रशिक्षण, दि. 15/12/2020 रोजी सकाळी 09.00 वा. सुमनताई गव्हाणे माध्यमिक विद्यालय, परसावत रोड,परभणी येथ खो - खो स्पर्धा (17 वर्षाखालील मुले व मुली ) प्रशिक्षण तसेच याच ठिकाणी सकाळी 11.00 वा. शारीरिक शिक्षण शिक्षकांचे चर्चासत्र दि. 16/12/2020 रोजी सकाळी 11.00 वा. याच शाळेत बुध्दिबळ स्पर्धा व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 17/12/2020 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे स्काऊट व गाईड चळवळी बाबत मार्गदर्शन करण्यात येईल. दि. 18/12/2020 रोजी दुपारी 12 वा. सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल लोकमान्यनगर, परभणी येथे स्वसंरक्षण प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखविण्यात येईल याच दिवशी दुपारी 04.00 वा.बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न होईल. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी आवाहन केले आहे.

No comments:
Post a Comment