Thursday, December 10, 2020

वीरशैव लिंगायत स्मशानभुमीसाठी माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे यांच्या कडून बोअर प्रदान ; वीरशैव समाज बांधवांनी आभार केले व्यक्त

वीरशैव लिंगायत स्मशानभुमीसाठी माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे यांच्या कडून बोअर प्रदान ; वीरशैव समाज बांधवांनी आभार केले व्यक्त




परळी / सोनपेठ (दर्शन) :-

परळी शहरातील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभुमीसाठी वीरशैव समाजाचे जेष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सोमनाथअप्पा हालगे यांनी आपल्या स्वतःच्या खर्चातून वीरशैव लिंगायत समाज  स्मशानभूमीसाठी बोअर घेवून दिला आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना हात-पाय धुण्यासाठी अथवा विधीसाठी पाण्याची अडचण येत होती. सदरची अडचण त्यांनी दुर केली असून यापूर्वीही स्मशानभूमीला उद्यानाचे स्वरूप देत असतांना त्यांनी आपल्या मंगल कार्यालयातून पाणी उपलब्ध करून दिले होते हे येथे उल्लेखनिय आहे.
परळी शहरात वैद्यनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या वीरशैव सार्वजनिक स्मशानभूमीसाठी वीरशैव समाजाचे जेष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सोमनाथअप्पा हालगे यांनी पाण्यासाठी स्वःखर्चातून बोअर उपलब्ध करून दिला आहे. मागील काही वर्षापासून येथे बोअर नसल्याने नागरिकांना येणारी अडचण लक्षात घेवून त्यांनी स्वःखर्चातून येथे बोअर उपलब्ध करून दिला आहे. यामुळे विधी झाल्यानंतर इतर विधीसाठी लागणार्‍या पाण्याची अडचण आता दुर झाली आहे. यापूर्वीही सोमनाथअप्पा हालगे यांनी आपल्या मंगल कार्यालयातून पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. आता त्यांनी बोअर घेवून दिल्याने पाण्याची अडचण दुर झाली आहे. उद्यानाला पाणी पुरवठा यापूर्वी त्यांनी आपल्या मंगल कार्यालयातून केला होता. दरम्यान बोअर घेवून पाण्याची अडचण दुर केल्याबद्दल समाज बांधवांनी सोमनाथअप्पा हालगे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a Comment