पालम तालुक्यातील सिरपूर ग्रामपंचायत बिनविरोध....
गाव विकासासाठी व्यक्तीगतसह जातीय मतभेद बाजूला सारून एकत्र आलेल्या ज्येष्ठ मंडळीनी पालम तालुक्यातील सिरपूर ग्रामपंचायत बिनविरोध काढली. सर्वांनी एकमताने ७ ग्रामपंचायत सदस्यांची नावे सुचवत त्यांच्यावर नियंत्रण करणाऱ्या कमिटीची निवड देखील केली. हा निवड कार्यक्रम सिरपूर येथील महारुद्र मंदिरासमोर २० डिसेंबर २०२० रोजी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
कर्मचाऱ्यांचे गाव म्हणून शिरपूरची ख्याती पालम तालुक्यात आहे; परंतु विकासाबाबत गाव मागे होते. ही गोष्ट लहान थोरांना खटकत होती. म्हणून गावातील सुशिक्षित ज्येष्ठ मंडळी एकत्र आली. त्यांनी पाठीमागील व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून गाव विकास हाच प्रमुख मुद्दा समोर केला. सर्वांनी सुट्टीचा दिवस म्हणून रविवारी महारुद्र मंदिरासमोर एकत्र बसून सर्वानुमते निवड केली. पहिल्यांदा सात ग्रामपंचायत सदस्यांची नावे एकमताने ठरविली. त्यात प्रा. सुधाकर शेवटे, पत्रकार भास्कर लांडे, उद्योजक राहुल आवरगंड, हभप धोंडीबा कुरे, विजयकुमार कदम, कृष्णा बचाटे,धनंजय गायकवाड यांचा समावेश आहे. या सदस्यांवर नियंत्रण ठेवणारी अथवा गाव विकासासाठी मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठ मंडळीची निवड नियंत्रण कमिटीत करण्यात आली. कमिटीत अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त शिक्षक तथा हभप जयवंतराव लांडे, संस्थाचालक गोपीनाथ कदम, शालेय पोषण आहार संघटनेचे राज्याध्यक्ष बाबाराव आवरगंड, माजी सरपंच सुधाकर हनवते, दिलीप शेवटे, संतोष पुयड, रामराव दुधाटे यांचा समावेश आहे. या कमिटीच्या मार्गदर्शनाखाली गावाला विकासाचा आराखडा तयार करून गाव सुजलाम-सुफलाम व सर्वांगीण विकास साधण्याची शपथ ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदस्यांनी घेतली. बिनविरोधसाठी शिक्षक भाऊसाहेब आवरगंड, सेवानिवृत्त शिक्षक नागनाथराव शेवटे, प्रा. रामराव लांडे, देवराव महाराज दुधाटे, माणिकराव कदम, विश्वनाथ शेवटे, माजी सरपंच भाऊराव लांडे, हभप गंगाधर लांडे, दत्तराव आवरगंड, डॉ. मारुती आवरगंड, माणिकराव लांडे, माजी उपसरपंच विष्णू आवरगंड, महेश लांडे, शिक्षक बालाजी लांडे, शिक्षक रामचंद्र दुधाटे, ज्ञानोबा दुधाटे, माजी सरपंच सुभाषराव देशमुख, माजी उपसरपंच बालासाहेब बीडकर, शिक्षक मारुती लांडे, भागवत लांडे, बबनराव लांडे, भानुदास बचाटे, सेवानिवृत्त शिक्षक डीगाजी लांडे यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

No comments:
Post a Comment