मा.शरदचंद्र पवार साहेबांच्या 80 व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सोनपेठ येथे रक्तदानाचे राजेशदादा विटेकर यांचे आवाहन !
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा मोठाच तुटवडा भासत असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. केवळ काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा महाराष्ट्रातील रक्तपेढ्यांकडे आहे. महाविद्यालये बंद आहेत.अनेक आस्थापनांचे 'वर्क फ्रॉम होम' सुरू आहे. त्यामुळे रक्तसंकलनात मोठीच अडचण निर्माण होत आहे.
रक्तपेढ्यांना रक्तपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे हे आव्हान आपण पक्षाच्या पातळीवर निर्धाराने पेलण्याचे ठरवले आहे.यासाठी तुमची साथ हवी आहे.आदरणीय मा.शरदचंद्र पवार साहेबांच्या 80 व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर शनिवार 12 डिसेंबर 2020 रोजी आपण सोनपेठ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन " कृषि उत्पन्न बाजार समिती " नवीन ईमारत येथे केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह तमाम इच्छूक रक्तदात्यांना मनपूर्वक आवाहन आहे की महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या या हाकेला आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊया व आपल्या सोनपेठ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून सर्वसामान्य रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करूया ! आत्ताच आपली नाव नोंदणी करा संपर्क:- पद्मरसिंह देशमुख मो.9764905555.राम बेत्रे मो.9922448241 .गोपाळ इंगळे मो. 9075909977.दिपक रोडे मो.9850258503.गोकुळ आरबाड मो.9860188839राष्ट्रवादी काँग्रेस युवक, विध्यार्थी तसेच पदाधीकारी यांच्या जवळ. रक्तदान म्हनजे जीवन दान ! रक्तदान हेच श्रेष्ठदान ! असे आवाहन मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेशदादा विटेकर यांनी केले आहे.
झटपट न्युज फटाफट न्युज केवळ आणि केवळ सा.सोनपेठ दर्शन मधेच संपादक किरण रमेश स्वामी.
संपर्क मो.9823547752.आपल्या जाहीरातीसाठी एक वेळ आवश्य भेट द्या .वाट्सप,फेसबुक अकाऊन्ट व पेज व्दारे तसेच इंन्स्टाग्राम व टुटर व्दारे वृतपत्रातुन देखील.







No comments:
Post a Comment