परभणी तालुकातील वजन काटा तपासणी करण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची मागणी....
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी तालुका वतीने निवेदन सादर करण्यात येते की , परभणी शहरातील भाजीपाला , फळे , हार्डवेअर , किराणा व इतर दुकानातील वजन काटा तसापसणी बऱ्याच दिवसांपासून झालेली नाही.या संदर्भात तक्रारी होत आहे.मुख्यत : हार्डवेअर दुकाने आणि फळ विक्रेते यांच्याबद्दल जास्त तक्रारी आहेत . तसेच पेट्रोल पंपाचे सुद्धा वजन काटा तपासण्यात यावे . एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमतीत माल विक्री करणाऱ्याची सुद्धा चौकशी करून कार्यवाही होणे ही जरूरी आहे.करिता आपणास विनंती की , आपण लवकरात लवकर परभणी शहरातील वरील सर्व दुकानातील वजन काटा तपासणी करावी तसेच आमच्या तालुका कार्यालयास केलेल्या कार्यवाही बाबत अवगत करावे .
माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना अब्दुल रहीम परभणी तालुकाध्यक्ष,के.बी शिंदे,भानुदासराव शिंदे,विजय चट्टे,गोपाल कचवे,स.रफिक पेडगावकर,योगीराज वाकोडे, बाबासाहेब भोसले,मुजीब खान,लक्ष्मण पवार.

No comments:
Post a Comment