राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि विचारक मा. गो. वैद्य यांचं आज प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. संघाचे पहिले प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नागपूरच्या स्पंदन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संघाते बौद्धिक प्रमुखही होते. प्रचंड व्यासंग, चौफेर लिखाण आणि देशभर त्यांचा प्रचंड जनसंपर्क होता. संघाचं मुखपत्र असलेल्या ‘तरुण भारत’ या दैनिकाचे ते दीर्घकाळ संपादक होते.पत्रकारितेत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मराठी पत्रकार परिषदेने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती खालावतच गेली. गेली अनेक दशकं ते संघ विचारांचा जोरदार किल्ला लढवत होते. देशभरातल्या अनेक वृत्तपत्रांमध्येही त्यांनी लेखमाला लिहिल्या आहेत. दैनिक तरुण भारतमध्ये त्यांनी अनेक वर्ष लिहिलेलं ‘भाष्य’ हे सदर चांगलच गाजलं होतं.यांना मराठी पत्रकार परीषद आणि सर्व स्तरातुन तसेच सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

No comments:
Post a Comment