बीड परळी महामार्गावर अपघातात युवक गंभीर जखमी ; सोनपेठ तालुक्यातील शेळगावचा युवक ऋषिकेश विटकर
बीड परळी महामार्गावर अपघातात युवक गंभीर जखमी झाल्याची घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस हद्दीत मंगळवारी सायंकाळी घडली. या अपघातात मोटार सायकल स्वार गंभीर जखमी झाला.ऋषिकेश विटकर रा.शेळगांव ता सोनपेठ जखमी युवकाचे नाव असुन माजलगाव ला काकांना सोडून परत स्वगावी शेळगांव कडे निघाला असतांना बीड परळी महामार्गावर तेलगाव नजिक मोटार सायकल एम एच 22 एक्यु 5145 ची धडक चारचाकी वाहनास पाठीमागून झाली. या अपघातात ऋषिकेश च्या पायाला गंभीर दुखापत झाली असुन अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले.
पत्रकार आले धावुन
दिंद्रुड येथिल पत्रकार संतोष स्वामी व नागेश वकरे आणि राजाभाऊ कटारे बीड कडुन दिंद्रुड कडे येतांना रस्त्यावर अपघातग्रस्त वाहन व जखमी ऋषिकेश विटकर हतबल अवस्थेत आढळून आला असता तात्काळ स्वतःच्या वाहनात बसवत जखमीला दिंद्रुड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.विटकर परिवाराने पत्रकार बांधवांचे आभार मानले.


No comments:
Post a Comment