भारत बंद मध्ये सहभागी होण्यासाठी सोनपेठ येथिल अनेक पक्षासह संघटनांचे आवाहन ; राज्यातील बाजार समित्या उद्या बंद,शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने उद्या मंगळवार 8 डिसेंबर 2020 ला भारत बंद पुकारण्यात आला आहे.या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून अनेक पक्ष-संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा देत भारत बंद मध्ये सहभाग नोंदवलेला असतानाच आता राज्यातील बाजार समित्यांनीही उद्या मार्केट बंद ठेवून बंद मध्ये सहभाग नोंदवला आहे.परभणी जिल्ह्यासह सोनपेठ तालुक्यातील अनेक पक्षासह संघटनांनी भारत बंदमध्ये सहभाग नोंदवून तमाम लहान मोठ्या व्यापारी बांधवांना या शेतकऱ्यांच्या आदोलनास पाठिंबा म्हनुण 100% भारत बंद ला सहभाग नोंदवण्याचे आवाहन सा.सोनपेठ दर्शन च्या माध्यमातून केले आहे.



No comments:
Post a Comment