Wednesday, December 30, 2020

31 डिसेंबर, 2020 व. नुतन वर्ष मार्गदर्शक सूचना- जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर

31 डिसेंबर, 2020 व. नुतन वर्ष मार्गदर्शक सूचना- जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर 



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

करोना (कोव्हीड -19) मूळे उदभवलेल्या संसर्ग जन्य परिस्थितीचा विचार करता नुतन वर्षाचे अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या हृष्टीने खालील प्रमाणे मार्गदर्शन सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा प्रशासना तर्फ जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या वतिने सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे.
1. कोरोनाच्या अनुषंगाने दि.31.12.2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. 01 जानेवारी, 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरकिांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.
2. दि. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 
3. विशषतः जिल्हयातील नागरी भागात अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या ष्टीने
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या रस्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. 4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व 10 वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. 
5. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे अयोजन करु नये तसेच मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. 6. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळीगर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाय योजना कराव्यात.
7. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकारपणे पालन व्हावे.
8. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैदयकिय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस,स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
9. तसेच या परिपत्रकानंतर 31 डिसेंबर, 2020 व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

श्री शनेश्वर मंदिर सोनपेठ येथे दत्त जयंती उत्साहात साजरी

श्री शनेश्वर मंदिर सोनपेठ येथे दत्त जयंती उत्साहात साजरी



श्री दत्त पंचपदी व भजनात तल्लीन झालेले दत्त भक्त दिसत आहेत.


सोनपेठ (दर्शन) :- 

 सोनपेठ येथील श्री शनेश्वर मंदिरात नूतन गुरूवार भजनी मंडळाच्या वतीने दि.२९ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्म निमित्त श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी ९:३० वाजता गुरु पंचपदीला सुरुवात केली. दुपारी १२:०१ वाजता श्री दत्त जन्म व सामुहिक आरती करन्यात आली. त्यानंतर सर्व दत्त भगतांना प्रसादाचे वाटप व अल्पहार देउन श्री दत्त जयंती उत्साहात साजी करन्यात आली कोरोना च्या पार्श्वभूमीवर यावर्षी मोजक्या दत्त भक्तांचा समावेश होता. या प्रसंगी माजी. आमदार व्यंकटराव कदम,बालमुकूंद सारडा,मुक्तेश्वर अंबुरे ,महेश शर्मा,रामनिवास सारडा, गोपाळराव नाइक, राधाकिशन सोलापूरकर,सत्यनारायण शर्मा,सचिन देशपांडे,कृष्णा हाके,मुक्ताराम दळवे, सुनील बर्वे,वैद्यनाथ चौडे आप्पा, राजू जाधव, ज्ञानेश्वर गर्जे,सत्यप्रेम सातभाई, विष्णु डंमढरे, रामप्रसाद सारडा,राधेशाम वर्मा, मुकेश बाहेती,रमेश झंवर,शिवमल्हार वाघे, गोपाळ फुलारी,प्रदीप वांकर,मारोतराव बागडे,सागर महाजन,सुर्यकांत रेडे,गजानन देवरे,सचिन काळे,सोमनाथ रेडे,सुधाकरराव गुजराथी,महेश स्वामी,प्रदीप बारगजे,सखाराम कांदे, साहेबराव सोमोसे,सिंथ वादक दीपक मोटे,यासह शनिवर भजनी मंडळ व नुतन गुरूवार भजनी मंडळाचे सदस्य,श्री दत्त भक्त, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीती होते.

Tuesday, December 29, 2020

सोनपेठ तालुका ग्रामपंचायत निवडणूक खुशखबर ;ऑफलाइन नामनिर्देशन पत्र स्वीकारणे दिनांक 30 डिसेंबर 2020 वेळ 5:30 पर्यंत

सोनपेठ तालुका ग्रामपंचायत निवडणूक खुशखबर ;ऑफलाइन नामनिर्देशन पत्र स्वीकारणे दिनांक 30 डिसेंबर 2020 वेळ 5:30 पर्यंत



सोनपेठ (दर्शन):-

सोनपेठ तालुक्यातील 39 ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवाराचा अर्ज स्विकृती
मा.राज्य निवडणूक आयोगाने (offline) आँफलाईन अर्ज स्वीकारणेची परवानगी दिलेली आहे.तसेच जात पडताळनी चा अर्ज देखील आँफलाईन स्विकारली जानार आहेत.दि.30.12.2020 रोजी संध्याकाळी 5.30 pm वाजेपर्येंत ऑनलाइन किंवा (offiline) आँफलाईन फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी स्वीकारतील अशी खुशखबर दिली.तरी इच्छुकांनी वेळेत नामनिर्देशनपत्र आवशक त्या सर्व कागदपत्रसह दाखल करावे.अशी अधिक्रत माहीती डॉ.आशिषकुमार बिरादार, तहसीलदार सोनपेठ यांनी सा.सोनपेठ दर्शन प्रतिनीधी जवळ दिली.

पोलिसांनी मारहाण करून पैशांची मागणी केल्याची गुटखा विक्रेत्याची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

पोलिसांनी मारहाण करून पैशांची मागणी केल्याची गुटखा विक्रेत्याची पोलीस आयुक्तांकडे तक्रार


मीरारोड / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

आपण बंदी असूनही गुटखा विकत असल्याचे कबूल करतानाच पोलिसांनी १० हजारांचा मासिक हप्ता घेऊन देखील दुकानातून २ गोणी गुटखा सापडला म्हणून मारहाण केली व गुन्हा दाखल न करण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी केली अशी तक्रार भाईंदर मधील गुटखा विक्रेत्याने पोलीस आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 
शहरात पान टपऱ्यांपासून सर्वत्र बेधडक गुटखा विकला जात असल्याचे आरोप नवीन नाहीत आणि तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली असता गुटखा सापडलेल्याच्या घटना देखील आहेत. त्यातच भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांवर मुनीब गुप्ता याने लेखी तक्रारी द्वारे केलेल्या गंभीर आरोपांनी खळबळ उडाली आहे . 
 भाईंदर पूर्वेच्या नवघर रोड येथे मुनिब गुप्ता ह्याचे जनरल स्टोअरचे दुकान आहे. त्याने २५ डिसेंबर रोजी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, तो राज्यात बंदी असूनही दुकानात गुटखा विकतो. गुटखा विक्री आपण करत असल्याची माहिती नवघर पोलिसांना असून दरमहा १० हजार रुपयांचा हप्ता त्यासाठी दिला जातो. गुरुवार २४ डिसेम्बर रोजी नवघर पोलिस ठाण्यातील कर्मचारी वाघ, गिरगावकर यांनी आपल्या दुकानात येऊन झडती घेतली असता  त्यांना दुकानात २ गोणी भरून गुटखा सापडला. त्यानंतर पोलिसांनी आणखी तपासा करीत आपल्याला घरी नेले. तेथे पत्नी व मुलांसमोर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ३२८ कलमानुसार  गुन्हा दाखल केल्यास तुरुंगात राहावे लागेल आणि सुटण्यास खूप खर्च करावा लागेल. अडीज ते तीन लाख रुपये दे मग गुन्हा दाखल करणार नाही असे धमकावत पैशांची मागणी केली.सदर रक्कम शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दे असे सांगून दे असे पोलिसांनी बजावले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी गुप्ता ह्याने मीरा-भाईंदर व वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे लेखी तक्रार करून मारहाण व लाच मागणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. समाज माध्यमावर देखील त्याने स्वतःचा व्हिडीओ टाकून कारवाई करा असे म्हटले आहे . कारवाई न केल्यास आत्महत्येचा इशारा त्याने  दिला आहे.सदर प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांना चौकशी करून ५ - ६ दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तर २ गोणी गुटखा सापडल्या नंतर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने अडचण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे . 

Monday, December 28, 2020

ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशन केंद्रावर इच्छुक उमेदवार व प्रतिनिधी यांनी त्यांची आर टी पी सी आर तपासणी करणे आवश्यक

ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशन केंद्रावर इच्छुक उमेदवार व प्रतिनिधी यांनी त्यांची आर टी पी सी आर तपासणी करणे आवश्यक



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

करोना ( COVID-19 )विषाणू संसर्गजन्य आजार असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकी करिता उमेदवाराकडून गावात सभा, कॉर्नर सभा, प्रत्यक्ष भेटीगाठी द्वारे मतदारांशी संपर्क साधण्यात येत असतो. त्यामुळे कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब उमेदवारी अर्ज भरण्यात येत असलेल्या नामनिर्देशन केंद्रावर इच्छुक उमेदवार व प्रतिनिधी यांनी त्यांची आर टी पी सी आर तपासणी करणे आवश्यक आहे.                  
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत असलेल्या गावातील निवडणुकीस उभे राहणाऱ्या इच्छुक उमेदवार व प्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत निवडणुकी करिता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याच नामनिर्देशन केंद्रावर किंवा संबंधित उपजिल्हा रुग्णालय/ प्राथमिक आरोग्य केंद्र येथील उपलब्ध वैद्यकीय पथकाकडून आर टी पी सी आर चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.
       

Saturday, December 26, 2020

देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची आज 132 वी जयंती विनम्र अभिवादन !

देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची आज 132 वी जयंती विनम्र अभिवादन !



सोनपेठ (दर्शन) :-

आज आपल्या देशाच्या कृषी क्षेत्रातील भरारीचा भक्कम पाया पंजाबराव देशमुख यांच्या कृषी धोरण आणि विचारांमुळे घातला गेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय शेती आणि कृषी क्षेत्राला नवा आकार देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान राहिलं. त्यातूनच राज्यातील एक अग्रगण्य समजल्या अमरावती येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचा पाया त्यांनी घातला. देशाच्या आणि राज्याच्या कृषी आणि शिक्षण क्षेत्राला नवी ओळख देणाऱ्या या नेत्यांचं कार्य राज्याच्या विकासासाठी महत्वाचं ठरलं आहे.
 
देशाच्या सध्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीत देशाचे प्रथम कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा सिंहाचा वाटा आणि मोलाचे स्थान आहे. शेती आणि मातीशी असलेले घट्ट नाते आणि या क्षेत्राचा सूक्ष्म अभ्यास. हीच गोष्ट लक्षात घेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख यांची निवड केली. 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील सध्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या पापळ या गावी डॉ. पंजाराव देशमुख यांचा जन्म झाला. वडील शामराव देशमुख हे हाडाचे शेतकरी. त्यामुळेच बालपणापासून पंजाबरावांना शेतीविषयी विशेष प्रेम.
 
उच्च शिक्षीत नेता :
प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर ते पुढे माध्यमिक शिक्षणसाठी कारंजा लाड आणि अमरावतीत येथे गेले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्याच्या 'फर्ग्युसन कॉलेज' येथून पूर्ण केलं. पुढे 1921 मध्ये इंग्लंडच्या जगप्रसिद्ध कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी 'बॅरिस्टर पदवी' मिळवली. तेथेच त्यांनी संस्कृतमध्ये एम.ए. आणि पी.एच.डी.ची पदवी घेतली. 'Origin and development of religion in vedic literature' हा विषय घेऊन त्यांनी पीएचडी मिळवली. पण शिक्षणासोबतच त्यांना देशातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचा कळवळा होताच. त्यातूनच त्यांनी आपले पुढचे जीवन देशातील जनतेला समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
 
अस्पृश्यता निवारणाचं कार्य :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्य निवारण चळवळीत पंजाबराव देशमुख यांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लववून काम केलं. यातूनच अमरावतीच्या 'आंबा मंदिरा'त दलितांना प्रवेश मिळविण्यासाठी त्यांनी सत्याग्रहही केला. त्यांच्या आंदोलनामुळेच हे मंदिर दलितांसाठी खुलेही झाले. पण, हे करताना त्यांना समाजातील प्रस्थापितांचा मोठा विरोध सहन करावा लागला. पुढे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या संविधान सभेचे सदस्य म्हणून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलं.
 
पंजाबराव देशमुखांचा राजकीय प्रवास :
पंजाबराव देशमुख तीन वेळा लोकसभेवर निवडून आले होते. देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून त्यांनी अनेक दूरगामी निर्णय घेतले. आज अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या भारताची ओळख त्यांच्या त्यावेळच्या निर्णयामुळे पूर्णत्वास आली. 1955 मध्ये त्यांनी 'भारत कृषक समाजा'ची स्थापना केली. पुढे शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आलेल्या अमरावती येथील 'श्री. शिवाजी शिक्षण संस्थे'चा पाया त्यांनी घातला. या संस्थेने विदर्भातील गरीब आणि बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यांच्या कामाचा तेव्हाच्या अनेक जागतिक नेत्यांनी गौरवही केला.
 
10 एप्रिल 1965 रोजी पंजाबराव देशमुख यांचं निधन झालं. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुढे महाराष्ट्र सरकारने 20 ऑक्टोबर 1989 रोजी त्यांच्या नावानं अकोला येथे 'डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना केली. कृषी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर त्यांचे जवळचे सहकारी पी.पी.देशमुख हे विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल झाले. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे विचार, व्यक्तिमत्व, 'व्हिजन' अगदी जवळून पाहणारे पी.पी.देशमुख यांच्याकडे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या असंख्य आठवणी आहेत.
 
स्मृती संग्रहालय :
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 'डॉ. पंजाबराव देशमुख' यांचे समग्र जीवनपट आणि कार्य उलगडून दाखविणारे स्मृतीकेंद्र विद्यापीठाने 10 मे 2003 रोजी उभारले. यामध्ये भाऊसाहेबांच्या वस्तू, त्यांचे कार्य, दुर्मिळ फोटोज आणि इतर महत्वाच्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. या स्मृतीकेंद्रात एकूण चार मुख्य दालनांचा समावेश.
यातील पहिले दालन पूर्णतः भाऊसाहेबांना समर्पित आहे. त्यांची दुर्मिळ छायाचित्रे, त्यांनी वापरलेल्या खाजगी वस्तू आणि इतर साहित्य या दालनामध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये त्यांचे कपडे, झोपण्याची खाट, त्यांच्या आयुष्यातील महत्वाची छायाचित्रे यांचा समावेश आहे.
 
दोन दालनांमध्ये कायमस्वरूपी कृषी प्रदर्शनीचे आयोजन, यामध्ये विद्यापीठाचे संशोधन आणि विविध उपलब्धी याबाबत विस्तृत माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. तर चौथ्या दालनाचे सभागृहात रुपांतर करण्यात आले असून त्याची आसनक्षमता 100 एवढी आहे. मान्यवर आणि अभ्यागतांच्या बैठकीसाठी येथे एक स्वतंत्र्य कक्ष आहे. ज्याची क्षमता 40 जणांची आहे. या स्मृती केंद्राची उभारणी सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या ऐच्छिक आणि उत्स्फूर्त सहभागातून आणि देणगीतून करण्यात आली आहे.
 
आतापर्यंत अनेक मान्यवरांनी या स्मृती केंद्राला भेट दिली आहे. ज्यात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी राज्यपाल के. शंकरनारायण, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबतच राज्य आणि देशातील अनेक मोठ्या विद्यापीठांच्या कुलगुरु आणि परदेशी पाहुण्यांचा समावेश आहे.
 
कृषी आणि शिक्षण क्षेत्रात भरघोस कार्य करणाऱ्या आणि आपल्या डॉ.पंजाबराव देशमुख यांना त्यांच्या कामाच्या योग्य सन्मान देण्यात शासन आणि समाज कमी पडल्याचं खंत त्यांना मानणाऱ्यांना आणि अभ्यासकांना वाटते. पण, असं असलं तरी, आजही कृषीक्षेत्रातील समस्यांची उत्तरे 'डॉ.पंजाबराव देशमुख' यांच्या चिरतरुण विचारांमध्ये दडलेले आहेत हे तेवढेच सत्य आहे. त्यामुळं पंजाबराव देशमुख यांना भारतरत्नचा सन्मान मिळावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. असं घडलं, तर त्यांच्या कार्याचा आणि त्यांचा विचारांचा योग्य सन्मान होईल असं त्यांना वाटतं.

श्री साई हॉस्पिटलमध्ये एकाच महिन्यात एका पाठोपाठ दोन Killips Class 4 (हार्ट अॅटॅक व हार्ट फेल) पेशंट ला मिळाले नवजीवन

श्री साई हॉस्पिटलमध्ये एकाच महिन्यात एका पाठोपाठ दोन Killips Class 4 (हार्ट अॅटॅक व हार्ट फेल) पेशंट ला मिळाले नवजीवन

 



परळी / सोनपेठ (दर्शन) :- 

परळी वैजनाथ नाथ चित्र मंदिर रोड वरील डॉ शैलेंद्र गरकळ यांच्या श्री साई हॉस्पिटल हार्ट केयर सेंटर व आय सी यू मध्ये विविध दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रोगी नागरिकांना जीवन दान मिळत असून अक्षरशा मृत्यूच्या दारातुन रुग्ण बाहेर काढले जात आहेत. असाच एका पाठोपाठ एक आव्हान कारक रुग्णांना खूप गंभीर अवस्थेतून बाहेर काढले जात आहे गुरुवारी सकाळी (3 डिसेंबर 2020) सकाळपासून छाती मध्ये वेदना होत असलेल्या मांडेखेल येथील श्री दिगांबर नागरगोजे 49 वर्षीय पुरुष खूप मोठा अश्या हार्ट अटॅक मुळे श्री साई हॉस्पिटल हार्ट केयर व आयसीयु मध्ये सकाळी 10 वाजता अतिशय गंभीर अशा अवस्थेत दाखल झाले. तात्काळ उपचार केल्यानंतर सुद्धा रोज दारू पिण्याच्या सवयीमुळे त्यांना रात्री पुन्हा हार्ट अॅटॅक आला आणि सिरियस झाले.
नातेवाईकांना आजाराचे गांभीर्य समजावून सांगितल्यावर त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे डॉक्टर व स्टाफ यांनी रात्रभर मेहनत करून हार्ट अटॅक कंट्रोल मध्ये आणला, त्यानंतर पुन्हा संपूर्ण आत्मविश्वासाने साई हॉस्पिटल टीमने आपली प्रामाणिक सेवा आणि मेहनत चालू ठेवली, 14 डिसेंबर 2020 ला पेशंटची अंजिओग्राफी झाली. रीपोर्ट मध्ये संपूर्ण ब्लॉक निधून गेला व पेशंटला अॅन्जिओप्लास्टीचि गरजच नाही पडली.अल्कोहोल Withdrawal मध्ये असल्याने त्याला पुनः अॅडमिट करून ट्रीटमेंट सुरू केली. सर्व गुंता गुंती मुळे रुग्णाला १० दिवस ventilator / oxygen आणि इतर अनेक ICCU सुविधा देऊन अहोरात्र हॉस्पिटल डॉक्टर व नर्सिंग स्टाफ ने घेतलेल्या मेहनती नंतर शेवटी आम्ही आयुष्य आणि मृत्यू मधली लढाई जिकली आणि रुग्णाला (22 डिसेंबर 2020) सुट्टी देण्यात आली. रुग्णाच्या नातेवाईकांना संपूर्ण आजाराचे गांभीर्य समजावून सांगितल्यावर त्यांनी दाखवलेली श्रद्धा, धेर्य, योग्य सल्ला आणि आयुष्यासाठी कार्य करण्यासाठी समर्पण आणि आमच्या रुग्णालयातील कर्मचान्यांचा नम्रतेची आणि आपलेपणाची वागणूक ज्याचे सर्व कौटुंबिक सदस्य आणि नातेवाईकांनी कौतुक केले तसेच डॉ शैलेंद्र गरकळ सरांचा सत्कार करुन विठुरायाची प्रतिमा भेट देवून पुढील वाटचाली साठी आशीर्वाद दिले.

Friday, December 25, 2020

जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यावर कोरोनाचे सावट ; जिजाऊ जयंती घरा घरात साजरी करणार !- म.से.सं.सोनपेठ

जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यावर कोरोनाचे सावट ; जिजाऊ जयंती घरा घरात साजरी करणार !- म.से.सं.सोनपेठ         

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुका मराठा सेवा संघ व 32 कक्षाच्या वतिने माँ जिजाऊ जयंती ही दि.12 जानेवारी 2021 मंगळवार रोजी पंचक्रोशित घराघरात साजरी करण्याचे आवाहन सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांच्या या माध्यमातून करण्यात आले आहे.राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती आपन "एकच वारी बारा जानेवारी, चलो सिंदखेड राजा" यावर सर्व सना वारावर कोरोना महामारीचे सावट असुन आपन दर वर्षी प्रमाणे होणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यावर सुध्दा यावर्षी कोरोनाचे संकट दिसत आहे.त्यामुळे यावर्षी जिजाऊ सृष्टीवर सिंदखेडराजा येथे होणारे सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत व ते गर्दि न करता पुढीलप्रमाणे असतील.सर्व जिजाऊ भक्तांना कळविन्यात येते की या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता दि.12 जानेवारी 2021 मंगळवार ला संपन्न होनारा माँ जिजाऊ जन्मोत्सव आपल्याला घरीच साजरा करायचा आहे.जिजाऊ स्रुष्टी वर संपन्न होनारे कार्यक्रम आपल्याला मराठा सेवा संघाचे प्रचार, प्रसार माध्यमे फेसबुक, यु ट्युब, न्युज चँनल्स व इतर प्रकारच्या माध्यमाद्वारे घरीच पहावयास मिळनार आहेत.या वर्षीचे कार्यक्रम खालीलप्रमाणे असतील - 1) दि.3 जानेवारी 2021 रविवार रोजी "सावित्री-जिजाऊ" दशरात्रौत्सव सोहळा उदघाटन समारंभ सकाळी 11 वाजता.2) दि.3 जानेवारी 2021 रविवार ते 11 जानेवारी 2021 सोमवार फेसबुक पेज द्वारे आँनलाईन प्रबोधन कार्यक्रम वेळ व विषय नंतर कळविन्यात येईल.3) दि.11 जानेवारी 2021 सोमवार रोजी जिजाऊ जन्मोत्सवाच्या पुर्व संध्येवर राजवाड़ा येथे दीपोत्सव सायं 6 वाजता होईल.4) दि.11 जानेवारी 2021 सोमवार रोजी.रात्री 8 वाजता जिजाऊ स्रुष्टी येथे महीलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.5) जिजाऊ जन्मोत्सव सोहळा दि.12 जानेवारी 2021 मंगळवार रोजी.सकाळी 6 वाजता राजवाडा येथे प्रमुख जोडप्यासह महापुजा होईल.6) दि.12 जानेवारी 2021 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता जिजाऊ स्रुष्टी येथे शिवधर्मध्वजारोहण होईल.7)दि.12 जानेवारी 2021 मंगळवार रोजी .सकाळी 9 ते 11 शाहिरांचे पोवाडे होतील.8) दि.12 जानेवारी 2021 मंगळवार रोजी.जन्मोत्सव सोहळा मुख्य कार्यक्रम सकाळी 11 वाजता.कार्यक्रमाचे अध्यक्ष "शिवश्री अँड.पुरुषोत्तमजी खेडेकर", प्रबोधन पुरस्कार वितरण व समारोपीय मार्गदर्शन "शिवश्री अँड.पुरुषोत्तमजी खेडेकर"हे करतील.9) दि.14 जानेवारी 2021 गुरुवार रोजी सकाळी 10 वा.संत चोखा मेळा महाराज जन्मोत्सव सोहळा व महापुजा मेहुणाराजा ता.देऊळगावराजा येथे होईल. दि.26 डिसेंबर 2020 शनिवार रोजी मराठा सेवा संघ व सर्व कक्ष प्रमुख यांची बैठक परांडे काॅम्पलॅक्स,सिरसाळा चौक,सोनपेठ येथे संपन्न झाली. बैठकित खालील विषयावर चर्चा होऊन सर्वानुमते ठराव पास करण्यात आला.1) मराठा सेवासंघ सदस्य नोंदणी करण्याचे ठरले.2) सोनपेठ तालुक्यातील प्रत्येक गावात म.से.सं.शाखा स्थापन करणे.3)   वार्षिक वर्गणी पंधरवाडा राबवणे. 4)साविञीबाई फुले जयंती ते राष्र्टमाता जिजाऊ जयंती पर्यंत दशराञ महोत्सव साजरा करणे.5) परिचय मेळावा आयोजन करणे.कोरोना च्या कारणाने आपल्याला सिंदखेडराजा येथिल सर्व कारेक्रमाचे मराठा सेवा संघाचे प्रचार, प्रसार माध्यमे फेसबुक, यु ट्युब, न्युज चँनल्स व इतर प्रकारच्या माध्यमाद्वारे घरीच पहावयास मिळनार आहेत.यामुळे सोनपेठ तालुका मराठा सेवा संघ व 32 कक्षाच्या वतिने माँ जिजाऊ जयंती ही दि.12जानेवारी 2021 मंगळवार रोजी पंचक्रोशित घराघरात साजरी करण्याचे आवाहन सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांच्या या माध्यमातून करण्यात आले आहे.

कै.राजकुमार मव्हाळे याची २१ वी पुणयतिथी राजीव गांधी महाविद्यालयात साजरी

कै.राजकुमार मव्हाळे याची २१ वी पुणयतिथी राजीव गांधी महाविद्यालयात साजरी




सोनपेठ (दर्शन) : -

भाजप जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण) शिवाजीराव मव्हाळे यांचे कनिष्ठ बंधू कै.राजकुमार मव्हाळे यांची पुण्यतिथी आज राजीव गांधी महाविद्यालयात साजरी करण्यात आली.
      महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक शिवाजीराव पवार यांनी यावेळी उपस्थितांना राजकुमार मव्हाळे यांच्या व्यक्तित्व व कार्याबद्दल माहिती दिली.कार्यक्रमास महिला आघाडी भा.ज.प. जिल्हा सरचिटणीस  मीनाताई सावंत यांची प्रमुख उपसथिती होती. 
       प्र.प्राचार्य चंद्रशेखर किरवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास दिक्षा शिरसाठ, विजय राजभोज, गोपाळ लोंढे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Wednesday, December 23, 2020

परभणी जि.प.,आरोग्य विभागातर्फे आरटीपीसीआर तपासणीबाबत जनजागृती

परभणी जि.प.,आरोग्य विभागातर्फे आरटीपीसीआर तपासणीबाबत जनजागृती




परभणी / सोनपेठ (दर्शन)  : -

जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासणीचे प्रमाण अत्यंत कमी आहे.  जनतेमध्ये जनजागृती व्हावी या  जिल्हा परिषदेचे अधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या वतीने जिल्हा परिषद ते शिवाजी चौकापर्यंत  आज सायंकाळी 5.00 वाजता शहरातून रॅली काढण्यात आली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी जनजागृती संदर्भात आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांची कार्यशाळा घेतली.या कार्यशाळेमध्ये आरटीपीसीआर चाचणी वाढवण्याबाबत विचार विनिमय केला. यावेळी महापालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.बी.एस. नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकर देशमुख, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.डी.खंदारे, डॉ.किशोर सुरवसे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी त्यांनी परभणी जिल्हा हा आरटीपीसीआर तपासणीत कमी आहे. मात्र, त्या तुलनेत मृत्यूदर जास्त असल्याने नागरिकांना आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत टाकसाळे यांनी  यावेळी व्यक्त केले.  यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणार्‍या प्रत्येक रुग्णाची तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांची आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही यावेळी श्री.टाकसाळे यांनी केले. या रॅलीस उपस्थित असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी हातात जनजागृतीचे फलक घेऊन जिल्हा परिषदेपासून शासकीय रुग्णालय मार्गे शिवाजी चौकापर्यंत फेरी काढण्यात आली. यात नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणीस घाबरू नये, आपली तपासणी करून घ्यावी, नागरिकांनी मास्क वापरावा, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, आदी फलके सोनपेठ तालुका आरोग्य अधिकारी डाँ.सुभाष पवार तसेच इतर आधिकारी व कर्मचार्‍यांच्या हातात होती.

Tuesday, December 22, 2020

24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन 
    



                                      
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

नविन ग्राहक संरक्षण कायादा 2019 याबाबत ग्राहकांना अधिकाधीक माहिती व्हावी. या दृष्टीने आम्ही विविध उपक्रमाचे नियोजन केले आहे. येत्या 24 डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनापासून आम्ही विशेष उपक्रम हाती घेत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी सांगितले. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात पूर्वतयारी आढाव बैठक संपन्न झाली यावेळी त्यांनी माहिती दिली.
या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा कापसे, सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन ना.रा. सरकटे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. आर. हट्टेकर, कार्यकारी अभियंता दुसंचार विभाग अनिल आठवले, कार्यकारीक अभियंता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपणी विवेक लांडगे, सहायक नियंत्रक वैधमापण शास्त्र पी.आर. परदेशी यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 या कायद्याची जास्तीत जास्त ग्राहकांना माहिती होण्यासाठी तसेच ग्राहकाच्या अडचणी, समस्या या विषयावर जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष मार्गदर्शन करणार असल्याचेही मंजुषा मुथा यांनी सांगितले. तसेच सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन, सहायक नियंत्रक वैधमापण शास्त्र, सहायक प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी कार्यालय हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर तालुकास्तराव जिल्हयातील प्रत्येक तहसिल कार्यालयात वेबीनारद्वारे आयोजित केला जाणार असून सर्व विभागांनी तसेच ग्राहकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. 
तत्पूर्वी बैठकीत उपस्थित सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्याशी चर्चा करुन संबंधित विभागांना ग्राहक दिन यशस्वी साजरा करण्याबाबत सुचना दिल्या. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.   

Monday, December 21, 2020

परभणी तालुकातील वजन काटा तपासणी करण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची मागणी....

परभणी तालुकातील वजन काटा तपासणी करण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची मागणी....



 परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

अखिल भारतीय ग्राहक पंचायत  परभणी तालुका वतीने निवेदन सादर करण्यात येते की , परभणी शहरातील भाजीपाला , फळे , हार्डवेअर , किराणा व इतर दुकानातील वजन काटा तसापसणी बऱ्याच दिवसांपासून झालेली नाही.या संदर्भात तक्रारी होत आहे.मुख्यत : हार्डवेअर दुकाने आणि फळ विक्रेते यांच्याबद्दल जास्त तक्रारी आहेत . तसेच पेट्रोल पंपाचे सुद्धा वजन काटा तपासण्यात यावे . एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमतीत माल विक्री करणाऱ्याची सुद्धा चौकशी करून कार्यवाही होणे ही जरूरी आहे.करिता आपणास विनंती की , आपण लवकरात लवकर परभणी शहरातील वरील सर्व दुकानातील वजन काटा तपासणी करावी तसेच आमच्या तालुका कार्यालयास केलेल्या कार्यवाही बाबत अवगत करावे .
  माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना अब्दुल रहीम परभणी तालुकाध्यक्ष,के.बी शिंदे,भानुदासराव शिंदे,विजय चट्टे,गोपाल कचवे,स.रफिक पेडगावकर,योगीराज वाकोडे, बाबासाहेब भोसले,मुजीब खान,लक्ष्मण पवार.

Sunday, December 20, 2020

पालम तालुक्यातील सिरपूर ग्रामपंचायत बिनविरोध....

पालम तालुक्यातील सिरपूर ग्रामपंचायत बिनविरोध....

परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

गाव विकासासाठी व्यक्तीगतसह जातीय मतभेद बाजूला सारून एकत्र आलेल्या ज्येष्ठ मंडळीनी पालम तालुक्यातील सिरपूर ग्रामपंचायत बिनविरोध काढली. सर्वांनी एकमताने ७ ग्रामपंचायत सदस्यांची नावे सुचवत त्यांच्यावर नियंत्रण करणाऱ्या कमिटीची निवड देखील केली. हा निवड कार्यक्रम सिरपूर येथील महारुद्र मंदिरासमोर २० डिसेंबर २०२० रोजी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
कर्मचाऱ्यांचे गाव म्हणून शिरपूरची ख्याती पालम तालुक्यात आहे; परंतु विकासाबाबत गाव मागे होते. ही गोष्ट लहान थोरांना खटकत होती. म्हणून गावातील सुशिक्षित ज्येष्ठ मंडळी एकत्र आली. त्यांनी पाठीमागील व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून गाव विकास हाच प्रमुख मुद्दा समोर केला. सर्वांनी सुट्टीचा दिवस म्हणून रविवारी महारुद्र मंदिरासमोर एकत्र बसून सर्वानुमते निवड केली. पहिल्यांदा सात ग्रामपंचायत सदस्यांची नावे एकमताने ठरविली. त्यात प्रा. सुधाकर शेवटे, पत्रकार भास्कर लांडे, उद्योजक राहुल आवरगंड, हभप धोंडीबा कुरे, विजयकुमार कदम, कृष्णा बचाटे,धनंजय गायकवाड यांचा समावेश आहे. या सदस्यांवर नियंत्रण ठेवणारी अथवा गाव विकासासाठी मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठ मंडळीची निवड नियंत्रण कमिटीत करण्यात आली. कमिटीत अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त शिक्षक तथा हभप जयवंतराव लांडे, संस्थाचालक गोपीनाथ कदम, शालेय पोषण आहार संघटनेचे राज्याध्यक्ष बाबाराव आवरगंड, माजी सरपंच सुधाकर हनवते, दिलीप शेवटे, संतोष पुयड, रामराव दुधाटे यांचा समावेश आहे. या कमिटीच्या मार्गदर्शनाखाली गावाला विकासाचा आराखडा तयार करून गाव सुजलाम-सुफलाम व सर्वांगीण विकास साधण्याची शपथ ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदस्यांनी घेतली. बिनविरोधसाठी शिक्षक भाऊसाहेब आवरगंड, सेवानिवृत्त शिक्षक नागनाथराव शेवटे, प्रा. रामराव लांडे, देवराव महाराज दुधाटे, माणिकराव कदम, विश्वनाथ शेवटे, माजी सरपंच भाऊराव लांडे, हभप गंगाधर लांडे, दत्तराव आवरगंड, डॉ. मारुती आवरगंड, माणिकराव लांडे, माजी उपसरपंच विष्णू आवरगंड, महेश लांडे, शिक्षक बालाजी लांडे, शिक्षक रामचंद्र दुधाटे, ज्ञानोबा दुधाटे, माजी सरपंच सुभाषराव देशमुख, माजी उपसरपंच बालासाहेब बीडकर, शिक्षक मारुती लांडे, भागवत लांडे, बबनराव लांडे, भानुदास बचाटे, सेवानिवृत्त शिक्षक डीगाजी लांडे यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

Saturday, December 19, 2020

तरूण भारतचे भूतपूर्व संपादक मा.गो.वैद्य यांचं निधन

तरूण भारतचे भूतपूर्व संपादक मा.गो.वैद्य यांचं निधन
नागपूर / परभणी / सोनपेठ (दर्शन)  :- 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि विचारक मा. गो. वैद्य यांचं आज प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. संघाचे पहिले प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नागपूरच्या स्पंदन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संघाते बौद्धिक प्रमुखही होते. प्रचंड व्यासंग, चौफेर लिखाण आणि देशभर त्यांचा प्रचंड जनसंपर्क होता. संघाचं मुखपत्र असलेल्या ‘तरुण भारत’ या दैनिकाचे ते दीर्घकाळ संपादक होते.पत्रकारितेत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मराठी पत्रकार परिषदेने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती खालावतच गेली. गेली अनेक दशकं ते संघ विचारांचा जोरदार किल्ला लढवत होते. देशभरातल्या अनेक वृत्तपत्रांमध्येही त्यांनी लेखमाला लिहिल्या आहेत. दैनिक तरुण भारतमध्ये त्यांनी अनेक वर्ष लिहिलेलं ‘भाष्य’ हे सदर चांगलच गाजलं होतं.यांना मराठी  पत्रकार परीषद आणि सर्व स्तरातुन तसेच सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Friday, December 18, 2020

भिमाकोरेगाव विजय स्तंभ शौर्य दिन भिमाकोरेगाव विजय स्तंभाला घरातुनच अभिवादन करण्याचे राहुल डंबाळे यांचे आवाहन

भिमाकोरेगाव विजय स्तंभ शौर्य दिन भिमाकोरेगाव विजय स्तंभाला घरातुनच अभिवादन करण्याचे राहुल डंबाळे यांचे आवाहन


भिमाकोरेगाव / सोनपेठ (दर्शन) :-
 
जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्याही समाना, जाहिर कार्यक्रमांना तसेच स्टॉलसाठी कोणतीही परवानगी देण्यात येत असल्याचे सुतोवाच.
दरवर्षी अत्यंत उत्सवाने व उच्चांकि गर्दीत साजरा होणारा १ जानेवारी भिमाकोरेगाव विजयस्तंभ अभिवादनाचा शौर्य दिन सोळा कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर परानुजय साजरा करण्याचे अवाहन भिमाकोरेगाव विजय शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष राहुल डंबाळे यानी राज्यातील देशभरातील आबेडकरी अनुयायांना केलेले आहे.कोरोनाचा देशातील प्रादुर्भाव  पुणे परिसरात असून आजरोजी पुणे परिसरात तब्बल १४ हजार पेक्षा जास्त ॲक्टिव कोरोना रुग्ण आहेत तसेय वैदयकिय क्षेत्रातील तज्ञांनी डिसेंबर व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका वर्तविला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिसरातील सर्व प्रकारचे गर्दिने साजरे होणारे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम ज्यामध्ये जेजुरी, आळंदी व इतर ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. भिम अनुयायांनी भिमजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूर व महापरिर्वाण दिन चैत्यभुमी प्रमाणे आंबेडकरी अनुयायांनी भिमाकोरेगाव लढ्यातील शुरविरांना घरुनच अभिवादन करुन भिमाकोरेगाव येथे येण्याचे टाळावे असे अवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.समितीच्या व आयोजक कार्यकर्ते, पक्ष संघटना यांच्या समवेत पुणे जिला महसूल व पोलीस प्रशासनाने १० ऑक्टोबर व ९ डिसेंबर रोजी दोनदा बैठका घेतल्या असून यावेळी जवळपास सर्वानुमते यंदाचा उत्सव हा केवळ अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तसेच यंदाच्या वर्षी १ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्याही सभांना, जाहिर कार्यकमांना तसेच स्टॉलसाठी कोणतीही परवानगी देण्यात येत नसल्याचे सुतोवाच करण्यात आलेले आहे.तसेच प्रमुख राजकिय पक्ष व सामाजिक संघटना यांनी देखील यावेळी नागरिकांनी याठिकाणी येण्याचे टाळून आपली काळजी घेण्याचे अवाहन केले आहे.दरम्यान समितीच्या वतीने तसेच स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वतत्ररित्या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विविध समाज माध्यमे व ऑनलाईन पोर्टल मार्फत तसेच दुरदर्शन व इतर वाहीन्यांच्याद्वारे करण्यात येणार आहे. व यासाठी नागरिकांना वेळोवेळी माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी यंदाच्या वर्षी देखील 7820966966 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.दरम्यान समस्त आंबेडकरी समुदायाने माझा समाज माझी जवाबदारी या अन्वये भिमजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूर व महापरिवर्वाणदिन चैत्यभूमी अभिवादना प्रामणेच भिमाकोरेगावचे देखील अभिवादन घरच्या घरी करून एक आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा समितीच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.


Wednesday, December 16, 2020

जिल्हा माहिती अधिकारीपदी विनोद रापतवार रुजू

जिल्हा माहिती अधिकारीपदी विनोद रापतवार रुजू


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

नांदेडचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी जिल्हा माहिती अधिकारी परभणी या पदाचा अतिरिक्त कार्यभार दि.16 डिसेंबर 2020 बुधवार रोजी स्विकारला आहे.








झटपट न्युज फटाफट न्युज केवळ आणि केवळ सा.सोनपेठ दर्शन मधेच संपादक किरण रमेश स्वामी.
संपर्क मो.9823547752.आपल्या जाहीरातीसाठी एक वेळ आवश्य भेट द्या .वाट्सप,फेसबुक अकाऊन्ट व पेज व्दारे तसेच इंन्स्टाग्राम व टुटर व्दारे वृतपत्रातुन देखील.




जिल्हा माहिती अधिकारीपदी विनोद रापतवार रुजू

जिल्हा माहिती अधिकारीपदी विनोद रापतवार रुजू


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

नांदेडचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी जिल्हा माहिती अधिकारी परभणी या पदाचा अतिरिक्त कार्यभार दि.16 डिसेंबर 2020 बुधवार रोजी स्विकारला आहे.











गंगाखेडातील प्रस्तावीत ‘जनाई नगरी’ चे टोटल सर्वेक्षण सुरू ; मंत्रोच्चाराच्या जयघोषात शुभारंभ 
गंगाखेड / सोनपेठ (दर्शन) :-
शहरासाठी महत्वपूर्ण ठरू शकणाऱ्या ‘जनाई नगरी’ प्रकल्पाच्या कामाने आता वेग घेतला आहे. प्रकल्पासाठीच्या टोटल सर्वेक्षणाचा शुभारंभ आज कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, नगर परिषदेचे माजी ऊपनगराध्यक्ष राधाकृष्ण शिंदे, जेष्ठ मार्गदर्शक रंगनाथराव भोसले, माणिकराव आळसे यांच्या प्रमुख ऊपस्थितीत करण्यात आला. अत्याधुनीक यंत्रणेद्वारे हा सर्वे केला जात आहे. 

गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या प्रशासकीय बैठकीत या संदर्भात आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार आज दि. १६ डिसेंबर रोजी गोदाघाट परिसरातून टोटल सर्वेक्षणास सुरूवात करण्यात आली. ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रोच्चाराच्या जयघोषात श्रीफळ वाढवून कामाची सुरूवात करण्यात आली गोविंद यादव, राधाकृष्ण शिंदे यांचेसह  बाजार समिती संचालक तथा खंडोबा मंदीर समितीचे माणिकराव आळसे मामा, भगवती मंदीर समितीचे अभिजीत पुरणाळे, संत नरहरी महाराज मंदीर समितीचे सचीन दहीवाळ, माजी नगरसेवक वैजनाथ टोले, मोहन खोले, गजानन जोशी, ऊमेशगुरू जोशी, सोनू जोशी, शंकर भरणे, गजानन पाठक, अभिजीत जोशी, आदींची या प्रसंगी ऊपस्थिती होती. मुख्य सल्लागार अभियंता नागेश पैठणकर, नागनाथ कापुसकरी, अमिन सिद्दीकी यांच्या नेतृत्वात हा सर्वे केला जात असून गंगाखेड बांधकाम ऊपविभागाचे कनिष्ठ अभियंता पौळ, नगर परिषदेचे कनिष्ठ अभियंता भोकरे, स्वामी त्यांना सहकार्य करत आहेत. परभणी येथील पारवेकर एजन्सी यांचेकडून अत्याधुनीक यंत्रणेचा वापर करत हा संपुर्ण सर्व्हे केला जात आहे. यातून संपुर्ण परिसराच्या अतिशय सुक्ष्म नोंदी ठेवल्या जाणार असून प्रकल्पाच्या सुरूवातीचा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो. 
गंगाखेड शहराचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या प्रकल्पाच्या कामास आता प्रत्यक्ष सुरूवात झालेली असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tuesday, December 15, 2020

बीड परळी महामार्गावर अपघातात युवक गंभीर जखमी ; सोनपेठ तालुक्यातील शेळगावचा युवक ऋषिकेश विटकर

बीड परळी महामार्गावर अपघातात युवक गंभीर जखमी ; सोनपेठ तालुक्यातील शेळगावचा युवक ऋषिकेश विटकर 


माजलगाव / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 
बीड परळी महामार्गावर अपघातात युवक गंभीर जखमी झाल्याची घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस हद्दीत मंगळवारी सायंकाळी घडली. या अपघातात  मोटार सायकल स्वार गंभीर जखमी झाला.ऋषिकेश विटकर रा.शेळगांव ता सोनपेठ जखमी युवकाचे नाव असुन माजलगाव ला काकांना सोडून परत स्वगावी शेळगांव कडे निघाला असतांना बीड परळी महामार्गावर तेलगाव नजिक मोटार सायकल एम एच 22 एक्यु 5145 ची धडक चारचाकी वाहनास पाठीमागून झाली. या अपघातात ऋषिकेश च्या पायाला गंभीर दुखापत झाली  असुन अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले.
पत्रकार आले धावुन
दिंद्रुड येथिल पत्रकार संतोष स्वामी व नागेश वकरे आणि राजाभाऊ कटारे बीड कडुन दिंद्रुड कडे येतांना रस्त्यावर अपघातग्रस्त वाहन व जखमी ऋषिकेश विटकर हतबल अवस्थेत आढळून आला असता तात्काळ स्वतःच्या वाहनात बसवत जखमीला दिंद्रुड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.विटकर परिवाराने पत्रकार बांधवांचे आभार मानले.