गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव प्रथम वर्धापन दिन वत्कृत्व स्पर्धा घेऊन साजरा स्पर्धेत प्रथम स्नेहल कदम व सानिया शेख
सोनपेठ (दर्शन) :-
गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव प्रथम वर्धापन दिन व म.फुले यांच्या १२९व्या स्मृती दिनानिमित्त गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव च्या वतीने भव्य दिव्य खुल्या वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन २८नोव्हेंबर२०१९ गुरुवार रोजी, जि.प.प्रा.शा. थडीउक्कडगाव येथे आयोजित करण्यात आले होते.
लहान गट ४थी ते ७वी व मोठा गट ८वी ते १०वी अशा गटामध्ये स्पर्धा होती.लहान गटा मध्ये प्रथम पारितोषिक थडी पिपंळगाव येथील कु.स्नेहल कदम L.R.K स्कुल सोनपेठ हिने पटकावले तर व्दितीय पारितोषिक विटा(खु) येथील संघप्रिया तुपसमिंद्रे व्हिजन स्कुल सोनपेठ हिने, तर तृतीय पारितोषिक लासीना येथील प्रथमेश कदम लाल बहादुर शास्ञी विद्यालय लासीना यांनी पटकावले. मोठ्या गटामध्ये प्रथम पारितोषिक शेळगाव येथील सानिया शेख -व्हिजन स्कुल सोनपेठ, व्दितीय पारितोषिक थडीउक्कडगाव येथील हर्षदा धोपटे (पोहंडुळ) जि.प.प्रा.शा.थडीउक्कडगाव तर, तृतीय पारितोषिक थडीउक्कडगाव येथील रुपाली भंडारे हिने पटकावले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.महेश चांदवडे हे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.नागेश पाचांळ सर व पांडुरंग धोपटे हे होते.स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणुन श्री.कोलते सर यांनी कामकाज पाहिले तर सर्व विजेताचे शालेय साहित्य व रोख रक्कम व बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव च्या वतिने पौळ सर,गुरव सर सोनपेठ , नरहरी जाधव सर, मुन्ना रोडे, सुभाष कदम थडी पिपंळगाव या सर्व पाहुण्यांचे व तसेच शालेय समिती अध्यक्ष श्री. महेश चांदवडे व उपअध्यक्ष श्री.पांडुरंग धोपटे यांचे विशेष सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री.शशिकांत बिराजदार सर यानीं केले तर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव चे श्री. रणजीत भंडारे यांनी केले .व कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री. कुभांर सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव चे श्री. रणजीत भंडारे,गोविंद चांदवडे, परमेश्वर वासुंबे, हानुमान कारकर, अशोक सोपान चांदवडे, राजेश तेलभरे, ऋषिकेश कारकर, सचिन कारकर, अशोक गव्हाणे इ.कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच मुलांचे पालक व विद्यार्थी व विद्यार्थीनिंची कार्यक्रमा साठी प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment