तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी विटभट्टीवर जाऊन मजुरांना केले रेशनकार्ड वाटप
सेलु / सोनपेठ (दर्शन) :-
सेलु तालुक्यातील वालुर येथिल प्रतेक तहसीलदारांनी अनुकरण करण्यासारखी घटना अतिवृष्टी चे संकट शेतकऱ्यांच्या पाठीमागे असतानाच शेतकऱ्यांना धीर देऊन,शेतावर जाऊन प्रत्यक्ष भेट व कृतीतून आधार देण्याचे काम करीत असतानाच , विटभट्टीवर अतिश्रमाचे काम करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबाना रेशनकार्ड वितरित करून, त्यांना हक्काचे रेशनवरील धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे वालूर शिवारातील चार-पाच विटभट्टीवर स्वतः तहसीलदार बालाजी शेवाळे पोहंचले, विटभट्टीवर च रेशनकार्ड तयार करून घेतली व त्या ठिकाणी वाटपही केले, याप्रसंगी मजुरांना आनंदाश्रू अनावर झाले होते,त्यांच्या स्वप्नात ही माहित नव्हते की या प्रकारे मजूरांना तहसीलदार लाभ मिळवून देतील.
यावेळी वाळूर तलाठी हनुमान बोरकर,चिखलथानाचे तलाठी सचिन नवगिरे, ड्रायवर लक्ष्मण पानझडे यांनी मजुरांची यादी करणे, रेशनकार्ड वर माहिती भरणे करिता सहाय्य केले.
No comments:
Post a Comment