Saturday, November 16, 2019

बाल दिनानिमित्त बालकामगार विरोधी जनजागृतीपर रॅली संपन्न

बाल दिनानिमित्त बालकामगार विरोधी जनजागृतीपर रॅली संपन्न 
                                                               
परभणी / सोनपेठ (दर्शन)  :- 
14 नोव्हेंबर बाल दिनाच्या निमित्ताने जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समिती परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार विरोधी जनजागृती रॅली उत्साहात संपन्न झाली.
 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शेख अकबर व जिल्हा सरकारी कामगार अधिकारी आर.टी.रुमाले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली. रॅलीस जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सुरुवात होवून जिल्हा परिषद कन्या प्रशालेत समारोप करण्यात आला. यावेळी सरकारी कामगार अधिकारी श्री.रुमाले यांनी लहान वयात काम केल्याने बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासावर परिणाम होत असतो त्यामुळे बालकांनी शिकावे व कोणत्याही कामावर जाऊ नये असा अमुल्य संदेश यावेळी दिला. कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री.घुले, श्रीपाद देशपांडे, बाल हक्क समितीचे अध्यक्ष ॲङ केकान, चाईल्ड लाईनचे समन्वयक  संदिप बेंडसुरे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालकन कार्यक्रम व्यवस्थापक जयश्री पत्रे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प संचालक आर.एस.पठाण, अफसर पठाण, संतोष पवार, जावेद इनामदार, किशोर बहिरट आदिंनी प्रयत्न केले.
-*-*-*-*-

No comments:

Post a Comment