सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ शहरात प्रतिवर्षी प्रमाणे वर्ष 28 वे दिनांक 6 नोव्हेंबर बुधवार रोजी श्री गुरु 108 ष.ब्र.करबसव शिवाचार्य महाराज वसमत यांच्या पवित्र सानिध्यात सिद्धेश्वर मंदिर लासीन मठ वसमत ते कपिलधार पदयात्रा हजारो भक्तगणांनी पाऊल खेळत "गुरुराज माऊली" च्या जयघोषात शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात आगमन झाले या ठिकाणी शैलेश महाजन यांच्या निवासस्थानी प्रथम चहापाणी घेत पदयात्रा संपूर्ण शहरभर भव्य मिरवणूक काढत श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे श्री गुरु 108 ष.ब्र. करबसव शिवाचार्य महाराजांचे स्वागत श्री गुरु 108 ष.ब्र. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांनी करून या ठिकाणी दोन्ही गुरुवर्य यांच्या शुभहस्ते सा.सोनपेठ दर्शन दिपावली अंकाचे विमोचन करण्यात आले याप्रसंगी प्रथम गुरूंची आरती व दर्शन संपन्न झाले व गुरुंनी विश्रांती घेतली तर पदयात्रा वाजत गाजत श्री महालिंगेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात समस्त विरशैव समाज बांधवांनी पदयात्रेचे स्वागत करून प्रसादाची सोय करण्यात आली यावेळी या ठिकाणी विरशैव समाज बांधवांनी पदयात्रे करुना "आरोग्य सुविधा" माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेशदादा विटेकर यांनी मंजूर केलेले मोफत आरोग्य शिबिराचा लाभ हजारो गरजु पदयात्रेकरुंनी घेतला यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल जवंजाळ, डॉ.मन्मथ महाजन, आजेगावकर, आशुतोष दुबे, बडेकर, धीरज गोदाम व रमेश आण्णा आदींनी सहभाग घेऊन सहकार्य केले तर पोलिस प्रशासनाच्या वतीने तीन कर्मचारी संरक्षणासाठी रात्रपाळी वर ठेवण्यात आली होती या पदयात्रेचे प्रस्थान दिनांक 7 नोव्हेंबर गुरुवार रोजी पहाटे 5 वाजता तपोवन, तेलगाव, ढेकनमोहा, बिड मुक्काम घेत कपिलधार येथे दिनांक 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुख्य मार्गदर्शक शिराळे गुरुजी, नाईकवाडे हनुमंत व बाळू मोटे यांच्या मार्गदर्शनात पदयात्रा पुढे चालत आहे.
सोनपेठ (दर्शन) :- श्री गुरु 108 ष.ब्र.करबसव शिवाचार्य महाराज वसमत यांना साप्ताहिक सोनपेठ दर्शन दिपावली विशेषांक 2019 भेट देताना संपादक किरण स्वामी दिसत आहेत.
No comments:
Post a Comment