Wednesday, November 20, 2019

ग्राहकांनी तक्रारी न्याय मंचाकडे दाखल कराव्यात - श्रीमती अनुराधा सातपुते

ग्राहकांनी तक्रारी न्याय मंचाकडे दाखल कराव्यात - श्रीमती अनुराधा सातपुते                                      
 परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

डिजीटल युगात प्रत्येक ग्राहकांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर करून ग्राहक तक्रार न्याय मंचाकडे जास्तीत जास्त  तक्रार दाखल करुन न्याय मिळवावा. असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार न्याय मंचाच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा सातपुते यांनी केले.

            परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जागो ग्राहक जागो या मोहिमेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील अधिकारी -कर्मचारी आणि अशासकीय सदस्यांना एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती ज्योत्स्ना धुळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे, पुरवठा विभागाचे श्री. पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे डॉ.विलास मोरे, धाराजी भुसारे, अब्दुल रहिम आदि प्रमुख उपस्थित होते. सुरुवातीस  मान्यवरांनी दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.

            याप्रसंगी अन्नभेसळ सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे यांनी अन्नभेसळ कायदा व ग्राहकांमधे जागरुकता निर्माण करण्यासाठी करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच वैधमापन प्रशासनाचे सहाय्यक नियंत्रक प्र.र.परदेशी यांनी वैधमापन प्रशासनाचे कायदे व अधिकाराची माहिती दिली. तर जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली.  अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डॉ.विलास मोरे यांनी ग्राहक परीषदेच्या शासकिय व अशासकिय सदस्यांच्या समन्वय ठेवून प्रत्येक शंकेचे निरसन करावे याबाबत व इतर सर्व विषयांवर  मार्गदर्शन करुन कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी ग्राहक परिषदेचे  किरण स्वामी, के.बी.शिंदे  आदिसह इतर सदस्य, सदस्या व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                                        -*-*-*-*

No comments:

Post a Comment