परभणी / सोनपेठ (दर्शन) :- जिल्हयातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती , विमुक्त जाती , भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांनी सन २०१९ - २० या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर योजनेचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरावयाची अंतिम तारिख १५ नोव्हेंबर २०१९ असून मुदतीत अर्ज करावेत.असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.
सन २०१८ - १९ पासुन महाराष्ट्र शासनतर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी https://mahadbtmahait.gov.in हे एकत्रित संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आलेले आहे . महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व विमुक्त जाती भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग विभागाच्या शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क व परीक्षा शल्क / विद्या वेतन / निर्वाह भत्ता व इतर योजनाचा लाभ वितरीत करण्यात येतो .
तरी ज्या विद्याथ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावयाचे राहिलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी दिनाक १५ नोव्हेंबर २०१९ अखेर ऑनलाईन अर्ज भरुन महाविद्यालयाकडे सादर करावेत . विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास लाभापासुन पात्र विद्यार्थी वंचित राहिल्यास समाज कल्याण कार्यालय जबाबदार राहणार नाही .
तसेच जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयाचे लॉगिनवरील पात्र अर्ज दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत पडताळणी करुन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण परभणी यांच्या लॉग इनला पाठविण्यात यावे. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment