सोनपेठ ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ; प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यात एकुण ६० गांवे वाडी तांडे आहेत. तालुक्यातील अजारी रुग्णांच्या उपचारासाठी सोनपेठ शहरात एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर शेळगांव, वडगांव, डिघोळ ई , शिर्शी बु, लासीना, कानेगांव, खडका, नरवाडी, आवलगाव, ऊखळी बु, धामोनी असे तालुक्यातील विविध गांवामध्ये दहा उपकेंद्र आहेत.या ठिकाणी सामान्य रूग्णांना प्राथमिक उपचार मिळतो तर गंभीर रूग्णांना मात्र आपल्या उपचारासाठी परळी, अंबेजोगाई व परभणी सारख्या ठिकाणी जावे लागले. तालुक्यासाठी शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत.यामुळे रुग्णाना उपचार वेळेत मिळत नाही.आरोग्य अधिकारी हे येथील प्रा. आरोग्य केंद्रात सातत्याने उपस्थित नसतात यामुळे यांचे कर्मचाऱ्यावर नियंत्रण राहिले नाही यामुळे येथील कर्मचारी रुग्णांना तुच्छ दर्जाची वागणूक देत असल्याचे रुग्णांकडून बोलल्या जात आहे.तर सोनपेठला ग्रामीण रूग्णालय मंजुर झाले आज मितीला रुग्णालय ईमारतीचे बांधकामही पुर्ण झाले आहे. आता सोनपेठकरांना प्रतीक्षा आहे ती नविन ईमारतीमध्ये रूग्णालय सुरु होण्याची. या ईमारतीच्या उदघाटणाचा मुहूर्त प्रशासनाला मिळत नाही. संपुर्ण बांधकाम पुर्ण होऊनही तिथे रुग्णसेवा सुरु होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. या नविन ईमारतीमध्ये लवकर रूग्णालय सुरु केले नाही तर शहराचे बाहेर अडवळणीस असलेल्या या सुंदर ईमारतीची दुरावस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चौकट:-
-------------------------------------------------------------------
:- औषधाचा तुटवडा व कर्मचाऱ्यांची मनमानी
उपकेंद्राची २४ तास सेवा असतांना येथे नेहमीच औषधांचा तुटवडा जानवतो.तालुक्यातील गावातील पुरवठा करणा-या विहीर, विंधन विहीरीच्या इत्यादी पाण्याचे नमूने जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेकडे पाठविले जातात. सद्ध्या आरोग्य विभागाला दक्ष रहाण्याची आवश्यक्ता असुन नागरीकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तालुक्यात रिक्त पदासह औषधांचा साठा पुरवण्याची संबंधितानी या अपु-या औषधी साठी त्वरित पाऊल उचलने महत्त्वाचे आहे.सद्या डेंग्यू, मलेरिया या सारख्या गंभीर आजाराची साथ सर्वदूर असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या दुर्लक्षामुळे औषधी साठा उपलब्ध नसल्याचे बोलल्याजात आहे.एकंदरीत तालुक्यासाठी एकमेव असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदासह अपु-या औषधी साठा उपलब्ध करण्याची मागणी नागरीकातून होतं आहे.
-------------------------------------------------------------------
चौकट
-------------------------------------------------------------------
सोनपेठची ग्रामीण रुग्नालयाची भव्य ईमारत उदघाटनाच्या प्रतिक्षेत
सोनपेठ तालुक्यातील सर्व प्रकारच्या अजारी रूग्णांसाठी तालुक्याचे ठिकाणी एक ग्रामीण रुग्णालय व्हावे या मागणीसाठी येथील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व नागरीकांनी अनेकवेळा शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवीले. अनेक अंदोलने व सततच्या पाठपुराव्यामूळे येथील जनतेची मागणी पुर्ण करुन शासनाने सोनपेठ तालुक्यासाठी शहराच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजुर केले. यासाठी तब्बल तीन कोटी सत्तर लाख रुपयेे खर्च करुन एक भव्य ईमारत उदघाटनाच्या प्रतिक्षेत उभी आहे. आता येथील नागरीकांना प्रतिक्षा लागलीय ती नव्या ईमारतीमध्ये ग्रामीण रुग्नालय सुरु होण्याची.
-------------------------------------------------------------------
चौकट
-------------------------------------------------------------------
ग्रामीण रूग्णालयातील २५ पदांना मान्याता
येथील ग्रामीण रूग्णालयासाठी २५ पदांना मंजुरी देण्यात आली असून त्यामध्ये नियमित दहा पदांना मंजुरी देण्यात आली असुन वैद्यकीय अधिक्षक एक, वैद्यकीय अधिकारी तीन , अधिपरिचारीका तीन , भांडारपाल, मिश्रक व कनिष्ठ लिपीक यांची प्रत्येकी एक पद तसेच काल्पनिक कुशल पदामध्ये अधिपरिचारिकांची चार पदे , क्ष किरण तंञज्ञ एक, प्रयोगशाळा सहाय्यक एक, प्रयोगशाळा तंञज्ञ एक, कनिष्ठ लिपीक एक, शिपाई एक व कक्ष सेवक चार व काल्पनिक अकुशल पदामध्ये सफाई कामगाराची दोन पदांना मान्यता देण्यात आली असून येथील ग्रामीण रूग्णालयासाठी २५ पदे मंजुर करण्यात आली आहेत. ग्रामीण रूग्णालयासाठी पदांना मान्यता दिली तरीही ही पदे लवकरात लवकर भरती करून व रूग्णालयासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करून ग्रामीण रूग्णालय चालू करण्याची मागणी नागरिका मधून करण्यात येत आहे.
-------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया:-
1)
तालुक्यात तापीची खबरदारी घेत ग्रामीण भागातील प्रत्येक गावात प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहे तसेच प्रत्येक घरी जाऊन रुग्णांवर उपचार, तपासण्या करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांना मुख्यालायस राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण रुग्णालय संदर्भात वरिष्ठांशी पाठपुरावा चालू आहे.
डॉ. सुभाष पवार
तालुका आरोग्य अधिकारी,सोनपेठ.
2)
वेळेवर उपचार मिळत नाही डॉक्टर वेळेत येत नाहीत सकाळी अकरा च्या नंतर दवाखान्यात कर्मचारी उपस्थित असतात सिस्टरला रुग्णांनाच्या उपचारासाठी विचारल्यानंतर त्या म्हणतात मी एकटी आहे. काय करू आणि कुठे कुठे पाहू प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणाचेच नियंत्रण नाही.
दीपक मोटे
नागरीक सोनपेठ.
No comments:
Post a Comment