स्व.अरुन टेकाळे यांच्या कुटुंबास नैसर्गिक आपत्तीची शासनाची आठ लाखाची मदत सुपूर्द
सोनपेठ (दर्शन) :-
पाथरी तालुक्यातील विटा बुद्रुक येथील रहिवासी असणारे व्यवसाया साठी सोनपेठ शहरात राहुन मोटार रिवायडींगचे काम करत आपला उदरनिर्वाह भागवणारे स्व.अरुण टेकाळे व त्यांचा मुलगा स्व.मंदार टेकाळे यांचा परतीच्या अवकाळी पावसाने भिंत अंगावर पडून दुर्दैवी अंत झाला होता.या दुर्घटनेमुळे टेकाळे कुटुंबीय उघड्यावर पडले होते.त्यांना आर्थिक मदत मिळणे महत्त्वाचे असल्याने सोनपेठ येथील तहसीलदार डाँ.आशिषकुमार बिरादार यांनी सर्व गोष्टीची माहिती घेऊन मा.जिल्हाधिकारी पि.शिव शंकर यांच्या कडे शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निधीतुन मदत मिळावी या साठि पाठपुरावा केला या कुटुंबातील सदस्यांंना आठ लाख रुपयाच्या नैसर्गिक आपत्तीची मदत शासनाच्या वतीने दि.11 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात दिली.ही घटना दीवाळीच्या सणात ही घडल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली होती.स्व.अरुन टेकाळे यांच्या पत्नी कस्तूर टेकाळे ह्या अजूनही गंभीर असून त्या लातूर येथील एमआयटी रुग्णालयात उपचार घेत आहेत.तर त्यांची मुलगी अभियांंत्रीकीचे शिक्षण घेत असून ती चंद्रपूर येथे असते.यावेळी या मदतीच्या धनादेशाचे वितरण कांचन टेकाळे व दीपक टेकाळे यांना करण्यात आले.यावेळी तालुक्यातील सर्वस्तरांतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment