सोनपेठ शहरातील दहा गाढव वॉटर फिल्टर येथे जेरबंद ; कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांची कारवाई
सोनपेठ शहरात नूतन कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी विठ्ठलजी केदारे सर यांनी सूत्रे हाती घेताच प्रथम सोनपेठ शहर कॅरीबॅग मुक्त केले तसेच सर्वसामान्य नागरिकांचे काम तत्परतेने तडीस जाऊ लागले असाच एक प्रश्न सोनपेठ शहरातील मोकाट गाढवांचा या गाढवांचा व्यापारी वर्गाला भयानक त्रास होता व्यापारी वर्गाने मांडून ठेवलेला बाजार त्यामध्ये ही मोकाट गाढवे तोंड घालत होती याच कारणाने एका वृत्तवाहिनीने नुकतीच "सोनपेठ शहरात गाढवांचा सुळसुळाट" या मथळ्याखाली बातमी लावली त्या बातमीचा परिणाम सोनपेठ शहरातील दहा गाढव वॉटर फिल्टर येथे जेरबंद करण्यात आले ही कारवाई कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनात सफाई कर्मचारी बांधवांनी पार पाडली या कारवाईमुळे व्यापारी वर्ग आनंद व्यक्त करत आहे व या गाढवांच्या मालकाला दंड आकारणी करून पुन्हा अशी गाढव मोकाट सोडणार नाहीत याची तंबी देऊन सहकार्य करावे अशी भावना अनेक व्यापारी बांधवांनी सा.सोनपेठ दर्शन प्रतिनिधी जवळ व्यक्त केली या कारवाईबद्दल सर्वत्र नगरपरिषद प्रशासनाचे कौतुक होताना दिसत आहे.




No comments:
Post a Comment